श्रीपाद
श्रीवल्लभ लीलामृत
अध्याय १ ला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे प्रकटीकरण
कृते जनार्दनो देवास्त्रेतायां रघुनन्दन: |
व्दापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ||
श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनास म्हटले होते “अरे
पार्था| दुष्टांचे हनन आणि सुष्टांचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी
प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो. या कथनानुसार कृतयुगात, अत्री आणि अनुसया या
अतिपावन दांपत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतानी त्यांचे पोटी
“श्रीदत्तात्रेय” या नांवाने अवतार घेतला. या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान
श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत
असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होउन भक्ताचे अभिष्ट पूर्ण
करतात.श्रीदत्तात्रेयांचा दुसरा अवतार “श्रीपाद श्रीवल्लभ’ या रुपात पूर्व गोदावरी
जिल्ह्यातील “पिठीकापुरम” (सध्याचे पिठापुरम) या क्षेत्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीस
(गणेश चतुर्थीस) इसवी सन १३२० या अति पावन दिवशी “चित्रा” नक्षत्रावर झाला.
श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. पिठापूर या पवित्र क्षेत्री ब्रह्श्री घंडीकोटा अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्य
लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्छील आणि
आचारसंपन्न दांपत्य निवास करीत होते. अप्पलराज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे,
भारव्दाज गोत्रीय होते. सौ महाराणी सुमती ही ब्रम्हश्री मल्लादि बापनाचार्युलू या विव्दान
ब्राम्हणाची कन्या होती. ती रुपाने आणि गुणांनी अतिसुंदर होती. तिचे चालणे एखाद्या
महाराणीस शोभेल असे असल्याने तिचे नांव महाराणी सुमती असेच पडले. तिला दोन
पुत्रांची प्राप्ती झाली होती, परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम
शर्मा पांगळा होता. अशा दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुःखी असे. एकदा महालया अमावास्येच्या दिवशी ब्राम्हण भोजनाची सर्व
तयारी झाली होती. याच वेळी पंधरा-सोळा वर्षाचा उत्तम देहयष्टीचा आणि तेज:पुंज
चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीत
म्हटले “ओम भिक्षांदेही” त्या आवाजाने
माता सुमती बाहेर आली. दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधुतास पाहून
क्षणभर दिपुनच गेली. नंतर तिने स्वतःस
सावरले आणि पाक-गृहात जाऊन सुग्रास
अन्नाने भरलेले एक ताट आणून त्या अवधुतास अर्पण केले. त्या अन्नाने त्या
अवधूताची क्षुधा शमन झाली आणि प्रसन्न
चित्ताने त्याने सुमतीस म्हटले “माते तू एका अवधुतास तृप्त केलेस. मी तुझ्यावर
प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे.माता सुमती म्हणाली “स्वामी मला दोन पुत्र
आहेत, परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे. मला आपणा सारखा दैदिप्यमान
आणि विव्दान पुत्र व्हावा. हीच माझी इच्छा आहे.” “तथास्तु” असा आशीर्वाद देऊन तो अवधुत क्षणभरातच निघून गेला. ते अवधूत रूपात आलेले
प्रत्यक्षात श्रीदत्त प्रभूच होते. त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने
माता सुमती अत्यंत आनंदित झाली. तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत
होती. ब्राम्हण भोजन, दान आदी होऊन महालया अमावास्येचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार
पडला. सुमती महाराणी अशा आनंदी अवस्थेत असतानाच अवधूताच्या आशीर्वचना प्रमाणे तिला
पुत्र प्राप्तीची लक्षणे दिसू लागली. या अवस्थेत तिला शंख,चक्र, गदा, पद्म, त्रीशुल
आदी धारण केलेल्या अनेक देवतेंची,ऋषींची, सिद्धपुरुषांची, योग्यांची अशी अनेक
दर्शने तिला स्वप्नात होत होती. कांही दिवसांनी तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा
दिव्य दर्शन होऊ लागले. नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटा प्रमाणे दिव्यकान्तिमय
तपसमाधीत मग्न असलेले योगी,मुनी, अदभूत दर्शन देत. दैनंदिन कामे करताना श्रीदत्तात्रेयांची
स्तोत्रे, भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत. ही सर्व लक्षणे
महापुरुषाच्या जन्माची शुभसूचक होती. या मातेचे हे आगळे वेगळे डोहाळे पाहून पती
अप्पलराज शर्मा, पिता बापन्नाचार्युलू , आणि माता राजमंबा अति आनंदित होत. नउ
मासांचा काळ जणू पंख लावून उडून गेला. दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल
चतुर्थीस (गणेश चतुर्थीस) सुमती महाराणीने एका अति सुंदर, दैदिप्यमान शिशुस जन्म
दिला. हा बाळ सामान्य बालका प्रमाणे न
जन्मता ज्योती रुपाने अवतरला. त्या क्षणीच माता सुमती मूर्च्छित झाली होती.प्रसुती
गृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि
सर्वाना प्रसुती कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला. सर्व जण बाहेर येताच त्या
बाळाच्या सानिध्यात चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतीरुपाने प्रकट झाले
आणि परम पावन वेद मंत्रांचा घोष सर्वाना ऐकू येऊ लागला.थोड्या वेळाने तो थांबला. या
मंगल समयी स्वर्गातील अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदाने नृत्य-गायन करू लागले. देवतांनी बाळावर
पुष्पवृष्टी केली. याच वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात
आनंदाने गाऊ लागल्या. पारिजात, मोगरा, चमेली, गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद, मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सूतिकागृहात पाठविला आणि नवजात
शिशूचे स्वागत केले. पुत्र प्राप्तीची वार्ता
कळताच अप्पलराज शर्मा आपली
पूजा-अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसुतीगृहाकडे निघाले. बाळाचे
मुखमंडळ अतिशय सुंदर होते. भव्य कपाळ,
धनुष्याकृती भुवया, त्याखाली मोठे, मोठे तेज:पुंज नेत्रव्दय, सुंदर नासिका,
प्रमाणबद्ध कर्णव्दय, गुलाबी पातळ ओठ, आणि या गोजिरवाण्या मुखचन्द्रमास साजेसा गौर वर्ण. हे दैवी सौंदर्य
पाहून सुमती महाराणीचे पिता बापन्नाचार्युलू
आणि माता राजमंबा या दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांचे
चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले. अप्पलराज शर्मांनी ब्राम्हणाकरवी वेदपठण करवून
जातकर्म केले. या असामान्य शिशुस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक तीन
फण्यांचा नाग आपली फणा उभारून बाळावर छाया करीत असे.यथा समयी बाळाचे नांव “श्रीपाद श्रीवल्लभ” असे ठेवले. शिशु
चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला. त्याच्या बाल लीलांचा आनंद घेत असताना दिवस कसा
जाई ते त्या वात्सल्यमूर्ती माता, पित्यास आणि आजी आजोबाना कळून येत नसे. श्रीपाद बाळ अन्य बालकापेक्षा
अगदी निराळा होता. तो सात-आठ महिन्यांचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू
लागले. याच वेळी तो बोबडया परंतु अतिमधुर शब्दात “नाना”, “अम्मा” असे शब्द बोलू लागला. पिता अप्पलराज शर्मा
देवपूजेसाठी बसले की रांगत, रांगत तेथे जाऊन श्रीदत्तप्रभूंच्या मूर्तीसमोर
शांतपणे बसून एक चित्ताने पूजा पहात बसे. आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी. पूजा
समाप्त होताच पिता त्यास वाटीतील नैवेद्याचे दुध देत, ते तो अत्यंत आनंदाने पिऊन
टाकी ||
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
************************************************************************ अध्याय २रा
नरसावधानीचे वृत्त
आता बालक श्रीपाद दोन वर्षाचा झाला होता. त्याच्या गोड बोलण्याने आणि
त्याचे दुड, दुड चालणे, पळणे पाहून आजी-आजोबाना कृत-कृत्य झाल्या सारखे वाटे.
श्रीपाद बाळ आजोबा बापन्नाचार्युलू यांचा अतिशय लाडका होता. ते त्यास पंडित
सभेमध्ये सुद्धा घेऊन जात. अप्पलराज शर्माच्या शेजारी नरसावधानी नांवाचे एक विव्दान परंतु अति
अहंकारी ब्राम्हण रहात होते. त्यांच्या कडे राजगीऱ्याच्या भाजीचे पीक येत असे.
परंतु ते ती भाजी कोणास ही देत नसत. श्रीपाद प्रभू स्वेच्छेने नरसावधानिच्या घरी
जात आणि त्यांच्या बरोबर विव्दान पुरुषा सारखी शास्त्राबद्दल चर्चा करीत. हे
असामान्य ज्ञान केवळ दोन वर्षाच्या बालकास असलेले पाहून नरसावधानीना वाटे की पिठापुरम मध्ये नुकत्याच मृत्यू पावलेल्या एका विव्दान
ब्राह्मणाचा आत्मा श्रीपादाच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे.
हीच धारणा पिठीकापुरमच्या समस्त ब्राम्हण
समाजात धृढ झाली होती. परंतु श्री बापान्नाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा याना मात्र
श्रीपाद दत्तावतारी असल्याचे निश्चित रुपाने ज्ञात होते. एकदा बालक श्रीपादास नरसावधानीच्या
शेतातील राजगीऱ्याची भाजी खाण्याची इच्छा
झाली. त्यांनी आईजवळ त्यासाठी हट्ट केला. त्यावेळी बापान्नाचार्युलू आजोबांनी
श्रीपादास नरसावधानिच्या घरी नेले. त्यांना पहातच श्रीपादानी दोन्ही हात जोडून
नमस्कार केला. परंतु नरसावधानिनी अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही. त्याच वेळी
बालक श्रीपादाचे लक्ष नरसावधानिच्या पाठीवर रुळणाऱ्या त्यांच्या अतिप्रिय शिखेकडे
गेले आणि काय आश्चर्य ती शिखा आपोआप गळून खाली पडली.ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची
भाजी न मागताच आजोबा बरोबर घरी परतले.
एकदा नरसावधानीच्या घरी त्यांच्या पित्याचे श्राद्ध होते.
ब्राम्हणांची जेवणे झाली होती, परंतु घरची मंडळी अजून जेवावयाची राहिली होती. याच
वेळी नरसावधानीची गाय आपला दोर तोडून पाकगृहात शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे
खाऊन टाकले. ती कोणालाच सावरली जात नव्हती. त्याच वेळी बालक श्रीपाद आपल्या
पित्यासह नरसावधानिच्या अंगणात आले. ती
गाय श्रीपादाना पहाताच पाकगृहातून बाहेर आली. तिने श्रीपादाना तीन प्रदिक्षणा
घातल्या आणि त्यांचे चरणी नतमस्तक झाली. त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली. तिने बालक
श्रीपादाना प्रदिक्षणा का घातल्या आणि
त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली? हे प्रश्न नरसावधानिसह
अनेक विप्राना सोडविता आले नाहीत.
एके दिवशी कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती
अचानक अदृश्य झाली. नरसावधानीवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिठीकापुरमच्या लोकांनी
लावला. या आरोपामुळे ते अगदी खचून गेले होते, त्यातच त्याना अनेक व्याधींनी
ग्रासले. यातच त्याचा मृत्यू झाला. नरसावधानिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी
श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह गेले होते. नरसावधनीच्या पत्नीने बालक
श्रीपदाचा हात आपल्या हातात घेवून म्हटले “ बाळा श्रीपादा| तू दत्तात्रेय आहेस तर
नरसावधनी आजोबाना जिवंत करणे तुला शक्य नाही काय? असे म्हणून ती माता रडू लागली.
नवनीतासम मृदू हृदय असलेल्या श्रीपादानी त्या मातेचे अश्रू पुसले. थोड्याच वेळात
सर्व तयारी होऊन अंतयात्रा निघाली. अप्पलराज शर्मा आणि बालक श्रीपाद सुद्धा त्यात
सामील झाले. शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसावधानिना लाकडाच्या चितेवर निजविण्यात
आले. त्यांचा पुत्र पित्यास अग्नी देणार तितक्यात श्रीपादानी त्यास थांबविले आणि
नरसावधानिच्या भूमध्यावर अंगुलीने स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने
नरसावधानिच्या अंगात चैतन्य स्फुरण पाउ लागले. कांही मिनिटातच ते चीतेवरून उतरून
खाली आले. त्यांनी श्रीपाद प्रभुना साष्टांग नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी
परत आले. त्याना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता.
त्या मातेने बालक श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले.
एकदा नरसावधनी भिक्षा मागण्यासाठी बापान्नाचार्युलु यांच्या घरी
गेले असताना बालक श्रीपाद त्यांना तेथे खेळत असलेले दिसले. त्यांनी
नरसावधनीकडे पाहून स्मित केले. त्या सात्विक, सुकुमार गोंडस बाळास आपल्या कडेवर
घेऊन त्याचे लाड करावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. तेथून ते नरसिंह
वर्माच्या घरी भिक्षेसाठी गेले. तेथे त्याना श्रीपाद, श्रीवर्मांच्या खांद्यावर
खेळत असलेले दिसले. ते नरसावधनीकडे पाहून मिस्कीलपणे हसले. एकाच वेळी दोन ठिकाणी
बाळ श्रीपादाना पाहून हे स्वप्न आहे का विष्णू माया याचा त्याना संभ्रम पडला.
भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले. तेथे श्रीपादाना
बसलेले पाहून त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. नरसावधानिनी आपल्या पत्नीस बोलावून
तिला घडलेली हकीगत सांगितली. त्या दोघांनी श्रीपादाना अनेक गहन विषयावर प्रश्न
विचारले आणि त्या अजाण बालकाने सर्व प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे
दिली. शेवटी ते म्हणाले “आजोबा| मी दत्त आहे. कोट्यांनी कोटी ब्रम्हांडात व्याप्त
असलेले एकमेव तत्व मीच आहे. जे कोणी त्रीकरण शुद्धीने “दत्त दिगंबरा| श्रीपाद
श्रीवल्लभ दिगंबरा| नृसिंह सरस्वती
दिगंबरा| असे माझे भजन करतील तेथे मी
सूक्ष्म रुपाने सदैव असतो. ते पुढे म्हणाले “माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घरची भिक्षा घेवून तुमचे
दारिद्र्य दूर करीन” इतके बोलून बालक
श्रीपाद आपल्या घरी परतले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय 3. बाळ श्रीपादाचा वर्धापन
दिन
श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी,
आजोळी श्री बापन्नाचार्युलू यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे. याप्रमाणे बाळ श्रीपादाच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिना निमित्त ते सर्व
आजोळी गेले होते. आजोबा श्रीपादाना
मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते. अशा प्रकारे त्यांनी पूर्वी सुद्धा अनेक
वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी त्याना
कोटी, कोटी सूर्याच्या तेजस्वीतेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहू शकले
नव्हते. परंतु आज असे घडले नाही. बापनाचार्युलूना श्रीपादांच्या तळपायावर शंख,
चक्र, आदी चिन्हांचे दर्शन झाले.बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार
आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती. आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या
कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास
अधिकच धृढ झाला. या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू
ओघळू लागले. ते बाळ श्रीपादाच्या गालावर
पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात मोत्याप्रमाणे चमकू लागले. आजोबांनी ते आपल्या
उत्तरीयाने हळुवारपणे टिपले. यावेळी बालक श्रीपाद आजोबास म्हणाले “आजोबा| तुम्ही
सौरमंडळातून शक्तिपात करून जी शक्ती श्रीशैल्यस्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती त्याच वेळी ती शक्ती,
गोकर्णमहाबळेश्वर आणि पादगया स्थित
असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचे ठायी सुद्धा आकर्षित झाली होती. श्रीपाद पुढे
म्हणाले “आजोबा| प्राणीमात्रातून जी
अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या
प्रती शुभ स्पंदनाचे प्रसारण होते. हे माझ्या संकल्पानुसारच घडते. गोकर्ण
महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्म लिंग आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनाने मुक्ती
प्राप्त होते. बालक श्रीपाद पुढे म्हणाले “आजोबा| मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत
आपल्या घरी राहीन. त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुना अनुग्रह
देण्यासाठी घराचा त्याग करीन. माझा या नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती या रुपात असेल.
हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य, सत्यरूप असे राहील. नृसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्रीशैल्याजवळ असलेल्या कर्दळी वनात तीनशे वर्षे तपस्या करीन. या नंतर “स्वामी
समर्थ” या नांवाने प्रज्ञापूर (सध्याचे अक्कलकोट) या स्थानी प्रकट होईन. या
अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी
प्राणशक्ती प्रवेश करवून, मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईन. केवळ दोन वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले
हे वक्तव्य ऐकून आजोबा बापन्नाचार्युलू अत्यंत आनंदित झाले. तसेच त्यांच्या
आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत. बाळ श्रीपादाचा वाढदिवस मोठ्या थाटात
साजरा झाला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपये. ||
*********************************************************************************
अध्याय
४था – श्रीपाद प्रभूंचे सर्वव्यापकत्व
एकदा बापन्नाचार्युलू श्रीपाद
प्रभुना म्हणाले “श्रीपादा| तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस
सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले “मी तीन वर्षाचा आहे
असे तुम्हास वाटते परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे. मी या
सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या
निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्या शिवाय
सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षिभुत होऊन सर्व
व्यवहाराचे अवलोकन करतो.” यावर
बापन्नाचार्युलू म्हणाले “श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत
असे होत नाही. प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्वज्ञान सर्वव्यापकत्व, सर्व
शक्तीतत्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे.”
यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे.
प्रसंगानुसार मी व्यक्त होतो. मी सर्वव्यापी आहे. ज्ञान, विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी
निर्माण झाली.. मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य के काय? यावर पिता अप्पलराज
शर्मा म्हणाले “बाळा श्रीपादा, बालपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस. तू वारंवार
मी दत्त प्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रुपाने पुन्हा एकदा प्रकट होईन
असे म्हणतोस. पीठिकापुरमचे ब्राम्हण या भाषणाला मनचांचल्य बुद्धीभ्रष्टता असे म्हणतात” पित्याचे
हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले “ तात, खरे सांगितले पाहिजे ना? नभोमंडळातील
सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश,
काळ अबाधित असते.” श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा, आजोबा
बापन्नाचार्युलू अगदी थक्क होऊन गेले.
एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्नीशमन श्रीदत्तांची
आराधना करीत होते. त्यावेळी बापन्नाचार्युलू आजोबांनी श्रीपादाना विचारले “बाळा,
तू दत्त आहेस का दत्तउपासक आहेस? तत्काळ श्रीपाद म्हणाले “आजोबा, ज्यावेळी मी दत्त
आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो. जेंव्हा मी दत्तउपासक आहे असे म्हणतो
त्यावेळी मी दत्तउपासकच असतो. मी ज्या वेळी “मी श्रीपाद वल्लभ आहे” असे म्हणतो,
त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो. मी जो
संकल्प करतो तेच होत असते. हेच माझे तत्व आहे.” श्रीपाद पुढे म्हणाले “आजोबा
तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन.” असे म्हणून
श्रीपादानी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला. ते कूटस्थ
चैतन्याचे स्थान आहे. कांही क्षणातच बापनाचार्युलुना हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले. कांही वेळातच ते प्रयाग
महाक्षेत्रतिल त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू
समोर उभे असल्याचे दिसले. हे स्वरूप कांही क्षणातच कुक्कटेश्वराच्या स्वयंभू
दत्तात्रेयात विलीन झाले. त्याच्यातून एक अवधुत स्वरूप निघाले आणि त्याना सुमती महाराणी भिक्षा घालीत
असल्याचे दिसले. त्या अवधूताचे रूप कांही क्षणातच, महाराणी सुमतीच्या मांडीवर
निजलेल्या तान्हया बाळात बदलले. पाहता,पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात
रुपांतरीत झाले. त्या युवकाने हुबेहूब बापन्नाचार्युले सारखेच परंतु संन्याशाचे रूप
धारण केले. त्यांनी दोन नद्यांच्या संगमात
स्नान केले आणि बापन्नाचार्युलूकडे पाहत म्हटले
“मला नृसिंहसरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे” असे सांगितल्यावर स्वामिनी एक वस्त्र नदीवर
पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्यास गेले. तेथून ते कर्दळी वनात गेले. तेथे अनेक
वर्षे तपस्या केल्यानंरार ते कोपिनधरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी
बापन्नाचार्युलू कडे पहात म्हटले “माझ्या या रुपाला स्वामी समर्थ असे म्हणतात.
थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राण शक्ती वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील
मल्लीकार्जुनाच्या स्वरूपात विलीन झाला. त्या
परम पवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला “
बापानार्या तू धन्य आहेस. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह
सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रुपात तुला अनुग्रहित करीत आहे.” हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्ये पाहून बापान्नाचार्युलू स्तब्धच
झाले. त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला,
त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत
गेले. या अवस्थेत किती वेळ गेला ते कळलेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी
अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून
नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित
होत असे. परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला
नाही. आजोबा घामाने ओले-चिंब झालेले श्रीपादानी पहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून
म्हणाले “ अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू
नकोस.” आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी
श्रीपाद प्रभू म्हणाले “माझ्या संकल्पा शिवाय, आजोबा सारखे महान तपस्वी सुद्धा
अग्नी निर्माण करू शकत नाहीत”
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय ५वा
नरसिंह
वर्मा यांच्या शेतास बालक श्रीपादांची भेट.
एकदा नरसिंह वर्मा, बालक श्रीपादास आपले शेत दाखविण्यासाठी घोडागाडीत
बसवून घेऊन गेले. त्या शेतातील जमिनीत अनेक प्रकारची पिके येत होती. त्यातील
दोडक्याच्या वेलीना फुले येत नसत. कधी-काळी आलीच तर ती सुकून जात त्या ठिकाणी फळ
येत नसे. एखादे वेळी फळ लागले तर ते एव्हढे कडू असे कि तोंडात घालवत नसत. ही गोष्ट
वर्मांनी श्रीपादाना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले “ वर्मा आजोबा, पूर्वीच्या
काळी येथे एका दत्तभक्ताने तपस्या केली होती. ही पवित्र भूमी साक्षात दत्तस्वरूप
असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती.तिची तळमळ तुम्हास कळावी म्हणून तिने
हा मार्ग पत्करला होता. माझ्या चरण स्पर्शाने या भूमीच्या भूमितत्वात परिवर्तन
घडेल.” एवढे बोलून बालक श्रीपाद घोडागाडीतून खाली उतरून त्या शेतात फिरू लागले.
त्याच वेळी तेथे कांही चंचू (आदिवासी) युवक, युवती आल्या. त्या
सर्वानी श्रीपाद प्रभुना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला. श्रीपादप्रभू, वर्मा आजोबाना सांगू लागले “आजोबा हे सर्व चंचू
लोक नरसिंह अवतारशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मिला आपली बहिण मानतात.” नरसिंह
वर्मा त्या चंचू युवकाना म्हणाले “आम्हाला भगवान नरसिंह आणि महालक्ष्मीचे दर्शन
होऊ शकेल काय?” ते चंचू युवक म्हणाले त्यात काय कठीण? आम्ही त्या दोघाना येथे घेऊन येतो. असे सांगून ते युवक निघून गेले. थोड्या वेळातच
ते नरसिंह भगवान आणि माता महालक्ष्मीस घेऊन आले. श्रीपाद प्रभुनी भगवान नरसिंहाना
प्रश्न केला “पूर्व युगातील नरसिंह तूच आहेस ना? ही चंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे
ना? हिरण्यकशिपुचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना? या प्रश्नांचे उत्तर
देण्यासाठी भगवान नरसिंह त्रिवार होय असे म्हणाले.या नंतर कांही क्षणातच त्या
उभयतांनी ज्योती रुपात श्रीपादप्रभूंच्या
अंतरंगात प्रवेश केला. चंचू मंडळी अंतर्धान पावली.अशा अनेक
अदभूत, अनाकलनीय लीला श्रीपादानी बाल्यावस्थेत असतानाच केल्या.
| || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
***********************************************
अध्याय ६वा कुलशेखर मल्लाचा गर्व हरण
श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिठापुरम
येथे कुलशेखर नांवाचा एक मल्ल आला होता. त्याने पिठापुरमच्या मल्लांना
“मल्लयुद्धाचे आव्हान केले होते.
पिठापूरमच्या मल्लांना आपण कुलशेखरकडून मार खावून अपमानित होणार याची खात्री होती.
येथील कांही मल्ल श्रीपाद प्रभूंचे भक्त होते त्यांनी प्रभुना आपली समस्या
सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले “अरे मल्लानो, तुम्ही मुळीच घाबरू नका. आपला भीम
आहे ना, तो कुलशेखर बरोबर मल्लयुद्ध करेल. प्रत्यक्षात भीम कुबडा असून आठ ठिकाणी
वाकडा होता. त्याची श्रीपाद प्रभूंवर नितांत श्रद्धा होती. ठरल्या प्रमाणे कुलशेखर
आणि भीम यांचे मल्लयुद्ध कुक्कटेश्वराच्या प्रांगणात सुरु झाले. कुलशेखराच्या
प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर अधिक, अधिक बलवान होत होते. तो ज्या ठिकाणी भिमास
मारीत होता, त्याच ठिकाणी त्यास तितक्याच जोराने मार लागत होता. अंती कुलशेखर थकून
हरला आणि भीमाचे कुबड आणि वाकडेपण जाऊन तो एक बलशाली युवक बनला. कुलशेखर श्रीपाद
प्रभुना शरण आला . प्रभू त्यास म्हणाले “तू आपल्या बलवत्तेवर अहंकाराने फुगला होतास त्यामुळेच तुझी
शक्ती भीमास मिळाली आणि त्याची
दुर्बलता तुला प्राप्त झाली. माझ्या कृपेने तुला अन्न, वस्त्रास कमी पडणार नाही.”
कुलशेखर श्री व्यंकटेश्वराचा भक्त होता. त्यामुळे क्षणभर श्रीपाद
प्रभूनी त्यास श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन दिले आणि कृतार्थ केले.
श्रीपाद प्रभूंची कृपा कोणावर आणि कशी होईल हे कोणीच जाणू शकत नाही.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
********************************************************************************************
अध्याय ७वा
महर्षी विद्यारण्याचे प्राकट्य
एकदा पिठीकापुरास एका अवधुतांचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले
सिद्ध पुरुष होते. पिठीकापुर वासीयांनी त्याना
अदृश्य झालेल्या कुक्कटेश्वरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या मूर्ती बद्दल विचारले.
त्यावेळी ते सिद्ध पुरुष म्हणाले “हे दत्तभक्तांनो, श्री दत्त सकळ पुण्यक्षेत्रात
स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी ती मूर्ती शोधण्यास आपले सर्व कौशल्य
पणास लाऊन ती मूर्ती शोधून काढली. मूर्तीच्या मिळण्याने समस्त पिठीकापुरवासी
अत्यंत आनंदित झाले. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना सर्वमंगल
अशा सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेल्या श्री अप्पलराज शर्मा या सच्छील
दाम्पत्याच्या करकमलाव्दारे झाली. यावेळी एक मोठा उत्सव करण्यात आला. त्याचे
अध्वर्यू श्री बापन्नाचार्युलू होते. मंदिरात
श्रीदत्तमूर्तीची पुन:प्रतिष्ठापना झालेल्या दिवशी
श्री बापन्नाचार्युलुनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची
विनंती केली. या ठिकाणी त्या सिद्धास बालक श्रीपादांचे दर्शन झाले. या गोंडस
बालकास पाहताच त्या सिद्धाच्या मनात पुत्र वात्सल्य उत्पन्न झाले. त्यावेळी
श्रीपाद मातुल श्री वेंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्याच्या शिखेशी खेळत होते.
त्यांनी त्या सिद्धाकडे पाहून स्मित हास्य केले. ते पाहून त्या सिद्धाची समाधीच
लागली. समाधीतून व्युथान झाल्यावर श्रीपाद त्यांना म्हणाले “माधवा, तुझ्या
इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना, माझे वय सोळा वर्षाचे झाल्यावर बुक्कराय
करतील. तू हरिहर-बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे. “विद्यारण्य महर्षी या
नावाने तुझी सर्वकडे ख्याती होईल. तुझे सहोदर सायन्नाचार्य यांच्या वंशात येणाऱ्या
शताब्दीत गोविंद दिक्षित जन्म घेणार आहेत. तो गोविंद दिक्षित अन्य कोणी नसून तूच
असशील. राजर्षी होऊन तंजावुर संस्थानात महामंत्र्याचा पदभार सांभाळून कृतकृत्य
होशील.” श्रीपाद प्रभूंच्या मुखातून हे वक्तव्य ऐकल्यावर, त्या सिद्धाच्या
नेत्रातून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने वात्सल्यभावाने श्रीपादास
आपल्या मांडीवर बसविले. त्यावेळी श्रीपादानी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले. त्या सिद्धाने आश्चर्य
व्यक्त करताच श्रीपाद म्हणाले “तू विद्यारण्य या नांवाने शृंगेरी पिठाधीपती होशील.
तुझ्या परंपरेत तिसरा शिष्य कृष्णसरस्वती या नांवाने तूच असशील. तुझ्या मनात
माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्याकारणाने, माझ्या पुढील नृसिंहसरस्वती अवतारात काशी
क्षेत्री कृष्णसरस्वती या नांवाने
सिद्धअवस्था प्राप्त करून तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उद्धार
करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा ह्यांची साक्ष असेल.” श्रीपादांच्या
या भविष्यातील घडणाऱ्या घटनाविषयीचे वक्तव्य ऐकून त्या सिद्धास कृतकृत्य झाल्या
सारखे वाटल
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
********************************************************************** अध्याय ८वा श्रीपाद
प्रभूंचा सद्गुरू श्री शिर्डी साईबाबांच्या रुपात अवतरित होण्याचा संकल्प.
तीरुमलदास नांवाचे श्रीपाद प्रभूंचे एक भक्त होते. एकदा ते श्रीपादाच्या
मातामहाच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेवून गेले होते. सुमती महाराणीचे मामा
श्रीधरावधानि, श्रीपादास कडेवर घेवून खेळवीत होते. ते “दत्त दिगंबर, “दत्त दिगंबर, दत्त दिगंबर, अवधूता” असा घोष
करीत होते. त्यावेळी श्रीपाद केवळ दोन वर्षाचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते नयन मनोहर दृश्य
पाहून तीरुमलदासाचे मुखातून अनायासेच
“श्रीपाद वल्लभ , दत्ता दिगंबरा” असे
शब्द निघाले. श्रीधरावाधानी यांनी तिरुमल दासाकडे वळून पहिले. त्याच वेळी श्रीपाद,
“नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा” असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ आणि पुढे
नृसिंह सरस्वती या रुपात अवतरित होणार याची सुचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीने
सांगितली होती. श्रीपाद म्हणाले “ आजोबा नृसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात
घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासास
सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे” श्रीधरावधानी अवाक झाले.
तिरुमल दास म्हणाले “कुठल्याही जन्मी, कोणत्याही रुपात असताना सदैव माझे रक्षण
करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रुपावर अतिशय प्रीती आहे” श्रीपाद म्हणाले “तिरुमलदासा| तू महाराष्ट्र
देशात “गाडगे महाराज” या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीन,दुबळ्यांची, दलित व
दुःखी जनांच्या सेवेने पुनीत होशील. धीशिला (सध्याच्या शिर्डी गावी) गावी
“साईबाबा” या नांवाने यवन वेषात माझा समर्थ सद्गुरू रुपात अवतार होईल. तुला त्या
अवतारात माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रुपावर अत्यंत
प्रीती असल्याने “गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला” या नाममंत्राचा जप करशील. तुझ्या या शरीराच्या
पतनानंतर अल्प काळ हिरण्यलोकी राहून नंतर गाडगे
महाराज या रुपात जन्म घेऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान आहे.” हा
सुसंवाद चालू असताना श्रीधरावधानी
मायेच्या आवरणात होते. त्यांना या संवादातील कांही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी,
त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले आणि श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी
त्यांची धारणा झाली.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
**********************************************************************
अध्याय ९वा
बाळ
श्रीपादाच्या दुग्ध समस्येचे निराकरण आणि श्रीपाद हे श्रीदत्त असल्याची पंच
महाभूतांकडून साक्ष
श्रीपाद प्रभूंच्या जन्मापासून त्याना पुरेसे दुध
मिळत नसे. सुमती महाराणी बाळास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक
गाय होती, परंतु ती त्यांच्या घरी असलेल्या काळाग्नीशमन दत्तांच्या नैवेद्यास
पुरेल एवढेच दुध देत असे. बाकीचे आपल्या वासरास पाजवित असे. आपण आपल्या दिव्य आणि अपूर्व शिशुस पुरेसे दुध देवू
शकत नाही या विचाराने त्या सच्छील माता-पित्यास वाईट
वाटे. वेंकटप्पय्या आणि नरसिंह वर्मा, यांनी भरपूर दुध देणारी गाय अप्पलराज याना
दान देण्याचा प्रयत्न केला परंतु ते सारे व्यर्थ झाले कारण दान स्वीकार न करण्याचे
अप्पलराजांचे व्रत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्री श्रेष्ठी बापन्नाचार्युलू
कडे आले. त्यांनी एक शुभलक्षणी गाय अप्पलराज शर्माना देण्याचा आपला मानस त्याना
सांगितला. श्री बापन्नाचार्युलुनि ती गाय आणून त्यांच्या गोठयात बांधण्यास श्रेष्ठीना सांगितले. बापन्नाचार्युलुनी ती गाय जावायास
गोदान देण्याचा प्रयत्न केला परंतु ते गोदान अप्पलराजांनी नाकारले. याच वेळी
हिमालयातील सतोपथ या गावातून श्री
सच्चिदानंद नावाचे एक महात्मा पिठापुरी आले. ते कैवल्यशृंगी येथे असलेल्या श्री
विश्वेश्वरप्रभूंचे शिष्य होते. “श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिठीकापुरी श्रीपाद
श्रीवल्लभ रुपाने असून त्यांच्या बाल्य रूपाचे दर्शन घेऊन, कृतार्थ व्हावे” असा
आदेश श्री सच्चीदानंदाना झाला होता. त्यानुसार ते पिठीकापुरी आले होते. बापन्नाचार्युलुनी
त्याचे उत्तम प्रकारे स्वागत केले. त्यांच्यापुढे बाळ श्रीपादांच्या दुधाची समस्या
आली . तेंव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की “अप्पलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ
साक्षात दत्तप्रभू असून, व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून त्याना गोक्षीर
अर्पण करण्याचे महद्भाग्य हातून दवडू नये.” ब्राम्हण सभेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री
दत्त असल्याचा पुरावा मागितला. श्री सच्चीदानंदानी “तुम्हास पंच महाभूतांची साक्ष
देतो” असे ब्राम्हण सभेस सांगितले. यानुसार यज्ञ प्रारंभ झाला आणि त्याच वेळी
भूमातेने साक्ष दिली. ती म्हणाली “श्रीपाद श्रीदत्त असल्याकारणाने श्री अप्पलराज
यांनी गोदान स्वीकारावे. श्वसुरापासून जावायास प्रीतीपुर्वक दिलेली वस्तू “दान”
होत नाही.” यज्ञ प्रारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडून इतर स्थळी पाउस पडत होता ही दुसरी साक्ष होती. यज्ञातील हविर्भाग घेण्यास
प्रत्यक्ष अग्निदेव आले आणि गोदान घेण्यात कांही
दोष नाही असे त्यांनी सांगितले. ही तिसरी साक्ष होती. यज्ञमंडपा
व्यतिरिक्त, इतर स्थळी, वायुदेवाने आपला प्रताप दाखविला. ही चवथी साक्ष होती. याच
वेळी आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत. ही पाचवी साक्ष
होती. पंचभूतांची साक्ष झाल्यानंतर पिठापुरची ब्राम्हण सभा मौन झाली आणि अप्पलराज
यांनी गोदानाचा स्वीकार केला. अशाप्रकारे बालक श्रीपादाच्या दुग्ध समस्येचे
निराकरण झाले त्यामुळे सर्वचजण आनंदित झाले. || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय १०वा
बालक
श्रीपादानी मोठ्या लीलेने आपल्या पित्यास ऋणमुक्त केले
पिठीकापुरम नगरीत सुब्बय्या श्रेष्ठी नांवाचे एक वैश्य गृहस्थ रहात
होते. त्यांचे वाण्याचे दुकान होते. एकदा
अप्पलराज शर्मा यांचे घरी आईनविली या गावाहून बरेच पाहुणे आले होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी
त्यांच्याजवळ पुरेसे धन धान्य नव्हते. ते
दानाचा स्वीकार करीत नसत. श्री वेंकटपय्या श्रेष्ठीच्या घरी, करीत असलेल्या
पौरुहीत्या बद्दल, मिळणारे धन कसाबसा उदरनिर्वाह करण्यापुरते असे. नाईलाजास्तव
अप्पलराज शर्मांनी सुब्बय्याच्या दुकानातून एक वराह एवढ्या किमतीचे धान्य उधार
नेले होते. बंधुगण परत गेल्यानंतर ही रक्कम परत करावी असे सुब्बय्याने अप्पलराज
शर्माना बजाविले होते. परंतु शर्मा त्याचे देणे देऊ शकले नाहीत आणि सुबय्याने त्या
एक वराह रकमेवर चक्री व्याज लाऊन खोटे हिशेब दाखवून दहा वराह देणे बाकी असल्याचे
शर्माना कळविले. सुब्बयाचा मानस अप्पलराज शर्मांचे राहते घर लुबाडण्याचा होता.
श्री नरसिंह वर्मा आणि वेंकटपय्या श्रेष्ठी यांनी असे होऊ दिले नाही. एकदा श्रीपाद
श्रेष्ठींच्या घरी असताना सुब्बय्या व्यंगाने म्हणाला राजशर्मा जर त्यांचे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी
एकास त्यांच्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे. किंवा स्वतः चाकरी करण्यास
यावे. सुब्बय्याचे हे बोलणे ऐकून श्रेष्ठींच्या डोळ्यात पाणी आले.
श्रीपादानी ते अश्रू आपल्या चिमुकल्या हातानी पुसले आणि सुब्बय्याकडे वळून म्हणाले
“अरे सुब्बय्या तुझे ऋण मी फेडीन. चल
तुझ्या दुकानात. दुकानात सेवा करून ऋण
फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही.” बाळ श्रीपादाना घेऊन वेंकटपय्या
श्रेष्ठी सुब्बयाच्या दुकानात आले. तितक्यात एक जटाधारी संन्यासी त्यांचे दुकानात
आला. तो सुब्बय्याचे दुकान शोधीत होता. त्याला एक तांब्याचे पात्र विकत घ्यावयाचे
होते. तो सुब्बयाला म्हणाला “मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे. किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल. सुब्बय्याच्या
दुकानात बत्तीस तशी तांब्यांची पात्रे होती. परंतु तो खोटेच म्हणाला “माझ्याकडे एकच पात्र शिल्लक आहे. त्याला दहा
वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल. तो संन्यासी चटकन कबुल झाला. त्याची केवळ एकच
अट होती ती अशी की वेंकटपय्या यांच्या
मांडीवर बसलेल्या श्रीपादानी ते पात्र आपल्या हातानी त्या संन्याशास द्यावे. या अटीनुसार श्रीपादानी ते पात्र त्या जटाधारी
संन्याशास दिले. पात्र देताना श्रीपाद हसत
म्हणाले “तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना? तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी
संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा. तुझ्यासाठी तुझी पत्नी, मुले वाट पहात आहेत.” तो संन्यासी अत्यंत आनंदित
होऊन निघून गेला. यावेळी सुब्बय्या म्हणाला “आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला.
अप्पलराज शर्मा यांचेकडून यावयाचे असलेले दहा वराहाचे ऋण मला फिटल्या सारखे वाटत
आहे. या क्षणी श्रीपाद ऋणातून मुक्त झाले” वेंकटपय्या म्हणाले “हे जे तू सांगतो
आहेस ते गायत्रीच्या साक्षिने सांग” सुब्बय्याने तसे केले. श्रीपाद प्रभू आणि
वेंकटपय्या घरी गेल्यानंतर सुब्बय्याने आत जाऊन पहिले त्यावेळी तेथे एकतीस पात्रांपैकी
केवळ एकच पात्र होते. श्रीपाद प्रभूंच्या
लीला अनाकलनीय,अगम्य आणि अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत
असे. साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता
आणि सुब्बय्या किती दुर्दैवी. अशा
अनाकलनीय लीलेने श्रीपाद प्रभुनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
*************************************************************
अध्याय ११वा
आनंद शर्मा याना श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह
आनंद शर्मा नांवाचे एक विव्दान, आचारसंपन्न आणि गायत्री मंत्राचे
अनुष्ठान करणारे ब्राम्हण होते. विद्येचे तेज त्याच्या मुखावर विलसत असे. ते
बाल्यावस्थेत असताना एकदा आपल्या पित्याबरोबर पिठापुरम क्षेत्री गेले होते.
त्यावेळी ते श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापन्नाचार्युलू यांच्या घरी उतरले होते.
या पिता, पुत्राचे बापन्नाचार्युलुंच्या घरी उत्तम प्रकारे स्वागत झाले. भोजनासाठी
मेजवानीचा बेत होता. यावेळी श्रीपाद
प्रभूंचे वय पाच वर्षाहून थाडे कमीच होते. सुकोमल, लहान वयाचा तो दिव्य बालक
तेजस्वी, सुंदर, अजानबाहू, आणि नेत्रव्द्यात अत्यंत प्रेम, करुणा भरून असलेला असा
होता. त्याचे वर्णन करीता वेद सुद्धा थकले. अशा या दिव्य बालकाला आनंद शर्मांनी
चरण स्पर्श करून नमस्कार केला. त्यावेळी श्रीपादानी आपला वरद हस्त आनंद शर्माच्या
शिरावर ठेवला आणि म्हणाले “जन्म जन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे. पुढील
जन्मी तू अवधूत होशील आणि तुझे नांव “वेंकय्या” असे असेल. दुष्काळ पडला असताना,
पाउस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल, तसेच सांसारिक लोकांचे कष्ट, क्लेश दूर
करण्याची सिद्धी तुला प्राप्त होईल”. असा दिव्य आशीर्वाद प्राप्त करून आनंद शर्मा
कृतकृत्य झाले.
याच आनंद शर्मांनी श्रीशंकरभट्ट यांचा सत्कार करून उत्तम भोजन दिले
होते. त्यांनी गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षराचा महिमा आणि त्याच्या उच्चार
करण्याने आपल्या शरीरातील कोणत्या शक्ती
प्रभावित होतात यांचे विस्तृत वर्णन करून सांगितले. तसेच अष्टम आणि नवम संख्येचे
वैशिठ्य विवरण करून सांगितले. ते असे -- नउ या संख्येस एकाने भागिले असता नउच्
येतात ९ ला,२ ने गुणिले असता १८ ही संख्या येते यातील १ आणि ८ यांची बेरीज ९ च
येते तसेच ९ ला ३ ने गुणिले असता २७ संख्या येते. यातील २ आणि ७ यांची बेरीज केली
असता ती ९ च येते अशा प्रकारे कोणत्याही संख्येने ९ ला गुणिले असता येणाऱ्या
संख्येच्या आकड्यांची बेरीज केली असता ९ हीच संख्या येते. यामुळे ९ ही संख्या
ब्रम्हतत्व सुचविते. याच प्रमाणे ८ ही संख्या मायास्वरूप आहे. या संख्येचे
वैशिष्ठ्य असे की ८ ला १ ने गुणीले असता ८ येतात, ८ ला २ ने गुणील्यास १६ येतात
यातील १ आणि ६ मिसळल्यास ७ येतात हे आठ पेक्षा कमी आहेत. ८ ला ३ ने गुणिले असता २४
येतात या संख्येतील २ व ४ ची बेरीज केल्यास ६ येतात हे सात पेक्षा कमी आहेत. या
प्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशी मधील शक्ती हरण करण्याचे सामर्थ्य जगन्मातेत
आहे. अशा प्रकारे आनंद शर्मांनी अनेक
माहितीपूर्ण गोष्टी श्री शंकरभट्टाना सांगितल्या होत्या.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय
१२वा
श्रीदत्तानंद स्वामींना श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद
श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्तभक्त होते. त्यांना बालपणी स्पष्ट बोलता येत नसे.
शब्द तोतरे येत त्यामुळे मित्र मंडळी त्याची थट्टा करीत. त्याना एक अनामिक आजार
झाला होता. पाच वर्षापासून तो वाढू लागला. एक वर्ष लोटल्यावर दहा वर्षे
उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता. ज्यावेळी ते दहा वर्षाचे झाले त्यावेळी
त्यांच्या शरीरात पन्नास वर्षे झाल्यासारखी लक्षणे दिसू लागली होती. त्यावेळी बापन्नाचार्युलू पिठीकापुरात यज्ञ
करीत होते. त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्याना पिठीकापुरात
नेले. यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सहा वर्षाचे होते. यज्ञासाठी लागणारे तूप एका
वयस्क ब्राम्हणाच्या स्वाधीन केले होते. तुपाचा एकत्रीतीअंश (१/३) भाग घरी लपवून
ठेऊन दोनत्रितीअंश (२/३) भाग तो ब्राम्हण प्रतिदिन यज्ञासाठी आणीत असे. यामुळे
थोड्या वेळातच तूप संपत आले. त्यावेळी तूप
तयार करणे कठीण काम होते.हा चिंतेचाच विषय
होता. यावेळी बापान्नाचार्युलुनी श्रीपादप्रभूंकडे हेतू पुरस्सर पहिले. श्रीपाद
म्हणाले “ कांही चोर माझे धन अपहरण करीत आहेत. परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ
देणार नाही. योग्य वेळीच त्याना शिक्षा देईन.त्याच्या घरी पत्नी बरोबर शनीदेवाने
रहावे अशी आज्ञा करतो आहे.” एवढे बोलून
श्रीपादानी त्या वृद्ध ब्राम्हणास बोलावून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले “आई गंगामते|
यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे धृत द्यावे. तुझी बाकी माझे आजोबा वेंकटपय्या
देऊन टाकतील. ही श्रीपादांची आज्ञा आहे.” हे पत्र त्यांनी श्रेष्ठीना दाखविले. त्यांनी ते
मान्य केले. त्या वृद्ध ब्राम्हणा समवेत चार अन्य ब्राम्हण पादगया तीर्थावर गेले.
ते पत्र तीर्थराजास समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून
घेतले आणि वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञ स्थळी आणले. जल आणीत असतानाच सर्वांच्या
समोरच त्या जलाचे तूप झाले. त्या धृताचा आहुतिने यज्ञाची सांगता झाली. सर्वजण
आनंदित झाले. वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित
केले. धृत ओतत असतानाच त्याचे पाण्यात रुपांतर झाले होते.
दत्तानंदाच्या पित्याने आपल्या पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद
प्रभुना सांगितले. ते म्हणाले “थोडा वेळ थांबा, रोगाचे निवारण होईल. तोतरेपणा
निघून जाईल. एक घर जळणार आहे.” प्रभूंची वचने अनाकलनीय होती. त्याच वेळी तो वृद्ध ब्राम्हण तेथे आला.
तूप चोरल्यामुळे कांही हानी झाली काय ते पाहण्यासाठी तो आला होता. श्रीपाद प्रभू
त्यास म्हणाले “आजोबा, परम पवित्र अशा यज्ञासाठी जमविलेले तूप एका धुर्ताने चोरून
नेले. अग्नीदेवाला भूक आवरली नाही. धर्मानुसार त्यांना मिळावयाला हवे असलेले तूप न
मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवीत आहेत.” श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर
त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला. श्रीपाद पुढे म्हणाले “तुझे घर भस्मसात झाले आहे. त्याचे थोडे भस्म घेऊन ये.”
प्रभूंच्या सांगण्या प्रमाणे तो ब्राम्हण आपल्या भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन
आला. ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी श्रीपाद प्रभुनी दत्तानंदास पिण्यास दिले.
अशाप्रकारे भस्ममिश्रित पाणी तीन दिवस पिल्यानंतर दत्तानंदाचा तोतरेपणा पूर्णपणे
नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले. श्रीपाद प्रभुनी आपला दिव्य हात दत्तानंदाच्या
शिरावर ठेउन शक्तिपात केला. ज्याच्या योगाने ते ज्ञानसंपन्न झाले. त्यानंतर प्रभू
म्हणाले “आज पासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील. गृहस्थाश्रमाचा स्वीकार
करून लोकांना तारशील, धर्मबोध करशील. तू आणि हा ब्राम्हण मिळून गेल्या जन्मी
व्यापार करीत होता. व्यापारात वैषम्य आल्याकारणाने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे
प्रयत्न करीत होता. एके दिवशी तू या वृद्ध ब्राम्हणास घरी बोलावून प्रेमाने खीर
खाऊ घातलीस. त्या खिरीत विष कालविलेले होते. ती खीर खाताच तो ब्राम्हण अल्पावधीत
मरण पावला. तुला न कळू देता त्या ब्राम्हणाने तुझे घर, अन्य लोकांकरवी, जाळून
टाकले होते. त्यात तुझी पत्नी जळून मेली. तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला
पाहून त्या धक्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास. पूर्वजन्मात विषप्रयोग
केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र व्याधीस बळी पडावे लागले. तुझे घर या ब्राम्हणाने
पूर्वजन्मी जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले. या लीलेने मी तुम्हा
दोघाना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले आहे.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले.
त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्र संपन्न पंडित झाले. तो वृद्ध
ब्राम्हण श्रीपाद प्रभुना शरण गेला आणि त्याने आर्त भावाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली. दयाघन प्रभुनी
त्यास बोध करून क्षमा केली. नरसिंह वर्मांनी त्या वृद्ध ब्राम्हणास नवीन घर बांधून
दिले. अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंच्या कृपा प्रसादाने दोघांच्या कर्म बंधनाचा
विच्छेद होऊन दोघांचे भले झाले. प्रभूंच्या लीला अगम्य,अनाकलनीय आणि दिव्य
स्वरूपाच्या आहेत हेच खरे.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
*******************************************************************************************
अध्याय १३वा
श्रीपादप्रभू सात वर्षाचे झाले त्यावेळी त्यांचा
वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला. त्या काळी संपन्न गृहस्थांच्या घरी असे मंगल
कार्य असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापन्नाचार्युलूच्या
आनंदास तर सीमाच नव्हती. त्यांनी आपल्या जातीबांधवाना श्रीदत्त चरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित
केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र श्रवण करण्यास आले होते.
दत्तदास नांवाच्या एका श्रीपाद प्रभूंच्या भक्ताने श्री दत्तचरित्र सांगण्यास प्रारंभ केला. ते
म्हणाले “ पूर्वयुगात अनसूया आणि महर्षी अत्री या अति पावन दाम्पत्यास एका
पुत्राची प्राप्ती झाली. त्यांचे नांव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परम ज्योती
दत्तात्रेय सध्या कलीयुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रुपाने पिठीकापुरम क्षेत्रात
अवतरले आहेत. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य, तेजस्वी असे आपले
प्रभू अधिकच तेज:पुंज दिसत आहेत. अशा दीनजन
उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे,” हीच कथा दत्तदास सारखी सांगत होते आणि श्रोतेजन तन्मय
होऊन ऐकत होते. असे त्रेपन वेळा कथन झाले. दत्तदासावर श्रीपाद प्रभूंची अमृत
दृष्टी पडली. उपनयन झाल्या नंतर तेथे असलेल्या ब्राम्हणांना ते म्हणाले “मी आता
तत्काळ मालदासरीच्या घरी जाणार आहे.” तेथे जाण्याचे कारण ज्यावेळी तेथील विप्रानी
विचारले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले “विशुद्ध अंत:करण असलेला दत्तदास माझे
चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेली कथा एक अध्याय असे समजल्यास त्रेपन
अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील त्रेपन अध्याय श्रद्धाभावाने पूर्ण
करणाऱ्या दत्तभक्तास देण्यासाठी असलेले सद्य:फलीत लगेच त्यास द्यावयाचे आहे.”
श्रीपाद प्रभुना दत्तदासाकडे जाण्याची परवानगी
विप्रानी दिली नाही. त्यावेळी श्रीपाद प्रभू क्रोधावेशाने म्हणाले “तुम्ही
नीच जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात.परंतु त्यांच्यावर माझा
कृपाकटाक्ष अधिक असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत असतील आणि तुमचे
ब्राम्हणत्व, तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट
होतील. तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्रीदत्त भक्ती करतील त्यांची मी
डोळ्यात तेल घालून रक्षा करीन.” श्रीपाद प्रभूंच्या क्रोधावेशाला माता, पित्यांनी
शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळातच ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण
केले. नेमके त्याच वेळी श्रीपादानी दत्तदासाच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाने दर्शन दिले.
दत्तदासांनी अर्पण केलेली फळे श्रीपाद
प्रभुनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी दिलेले दुध प्रेमाने प्राशन केले. श्रीपाद प्रभुनी आपल्या हातानी मिठाईचा प्रसाद तेथे जमलेल्या सर्व भक्तांना दिला आणि
आशीर्वादहि दिला, नंतर ते प्रसन्न चित्ताने घरी परतले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
श्रीपादप्रभूंची भक्तांना सांगितलेली
बारा अभय वचने
१)
माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक
स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
२)
मनो वाक् काया कर्मणा मला समर्पित असलेल्या
साधकांचा मी डोळ्यात तेल घालुन संभाळ करतो.
३)
श्री पिठीकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यान्ह काळी
भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
४)
सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही
जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
५)
(अन्न हेच परब्रम्ह-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी
तळमळणाऱ्याना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
६)
मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी
महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
७)
तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव
तुमच्यावर असतो.
८)
तुम्ही ज्या देवता स्वरुपाची आराधना कराल, ज्या
सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
९)
तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा
अनुग्रह / आशीर्वाद तुम्ही आराधीलेल्या देवतेच्या स्वरुपा व्दारे, तुमच्या सद्गुरू
व्दारा तुम्हाला प्राप्त होतो.
१०)
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल
देवता स्वरूप, समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठाना व्दारेच
तुम्हाला समजू शकेल.
११)
श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार
आहे. जे महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
१२)
तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला
धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे
रक्षण करतो.
|| श्रीपाद राजम
शरणं प्रपद्ये. ||
अध्याय १५वा
श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासकास शिक्षा.
बंगारप्पा नांवाचा योगविद्या आणि मंत्र,तंत्र जाणणारा एक क्षुद्र उपासक होता. त्याला कोणत्याही
व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्र विद्या अवगत होती. भूत,पिशाच्यांच्या सानिध्यात
राहिल्याने त्याच्या मुखावर भूत,प्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून
येत असे. एकदा बंगारप्पा पिठीकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट
लोकांनी श्री
बापन्नाचार्युलूना मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले. त्याने एका
ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी पिले. बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्यांचे
ज्ञान होते.त्यापैकी एक होती, ज्या व्यक्तीचा अंत करावयाचा असेल तिचे ध्यान करून
पाणी पिले कि ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. बंगारप्पाने
श्रीबापन्नाचार्युलू यांचे ध्यान
करून खूप पाणी पिले ते त्यांच्या पोटात जात होते ,परंतु त्यांच्या
शेजारी बसलेल्या श्रीपादानी आजोबाच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते.
बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला परंतु त्याचा कांहीच अनिष्ट परिणाम बापन्नाचार्युलुंवर न होता ते पूर्वी
सारखे स्वस्थच राहिले. त्या क्षुद्र उपसाकास एक सर्प मंत्र येत होता. त्या
मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत. त्याने बापन्न्नाचार्युलुंचे
ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या
घरी असलेल्या वेलावर पडवळा प्रमाणे लोंबकळू लागले. ते बापन्नाचार्युलुना कांहीच
करू शकले नाहीत. दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले.
अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला. त्याच्या अंकित असलेले भूत,प्रेत
बापन्नाचार्युलुच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत. इतके झाले तरी त्या दुष्टाची
राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही .त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणीकेची
बाहुली करून त्यास बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या
शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या विषाचा
फैलाव होऊन, त्याने प्रभूंचा अंत व्हावा असा दुष्ट बेत बंगारप्पाने केला होता.
परंतु हा बेत सुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत
असल्याचे जाणवले. त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापन्नाचार्युलूच्या
घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास चाउ लागले. श्रीपाद प्रभूंच्या
पिठाच्या बाहुलीला ज्या, ज्या ठीकांणी सुया
टोचविल्या होत्या त्या,त्या ठिकाणी
बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या. त्या नरक यातनापासून सुटका
मिळविण्यासाठी बंगारप्पा श्रीपाद प्रभुना
अंतर्मनाने शरण गेला. त्यावेळी त्याच्या अंत:दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन
झाले. प्रभू म्हणाले “बंगारप्पा, तू केलेल्या महापापास अनेक वर्षे इहलोकात दुःख
भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा
करून एका रात्रीत झालेल्या यातनांव्दारे कर्मांचा नाश करीत आहे. तुझ्या क्षुद्र
विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरीपण, कोणी तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या
अंत:दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील.” श्रीपाद प्रभू
पुढे म्हणाले “तू आपल्या क्षुद्र विद्येने अनेक निष्पाप लोकाना अकाली मृत्यू
दिलास. त्या पापाचे फळ तुला माझा भक्त
शंकरभट्ट नांवाचा कन्नड ब्राम्हण भेटेपर्यंत राहील. नंतर निःशेष होईल.”
श्रीपाद प्रभूंच्या वचना प्रमाणे यथा समयी बंगारप्पा आणि शंकरभट्टाची भेट झाली आणि
त्याच्या पापांची निवृत्ती झाली. ही घटना
घडली त्यावेळी प्रभू केवळ आठ वर्षाचे होते. बंगारप्पा सारख्या अति दुष्ट व्यक्तीस सुद्धा श्रीपाद प्रभुनी क्षमा करून
त्यास भविष्यात भोगाव्या लागणार असलेल्या नरक यातनेपासून सुटका केली. त्यांच्या
करुणामय दृष्टीला सीमाच नाहीत हेच खरे.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
अध्याय १६वा
वेलप्रभू महाराजांचा गर्व हरण
पिठापुरम नगरीत “वेलप्रभू” नावाचे महाराज राज्य करीत होते. एकदा
त्याना श्रीपाद प्रभुना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास श्रीअप्पलराज
शर्मा यांचे घरी पाठविले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभाना तत्काळ राजदरबारी
घेऊन यावे. सेवकांनी महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत बसलेल्या बापन्नाचार्युलू
यांना सांगीतला. श्रीपाद प्रभुनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले “आजोबा| राजांच्या मनात
भक्तीभाव नाही. तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण
महाराज आहोत, आपली सत्ता चोहीकडे चालते. आपण म्हणू तसे झाले पाहिजे. परंतु माझे
दर्शन इतके सोपे नाही. हे तो राजा जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार
नाही.” श्रीपाद प्रभू राजाच्या सेवकाकडे पाहून म्हणाले “तुमचे महाराज केवळ पिठापुरमचे
राजा आहेत, परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना
सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमचे घरी यावे. येताना, गुरुदक्षिणा आणि महाराजाना शोभेल असा नजराणा घेवून
यावे.” प्रभूंचे वक्तव्य ऐकून
बापन्नाचार्युलू आणि अप्पल राज
शर्मा यांनी आपसात विचार विनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले. सेवकांनी प्रभूंचा
निरोप महाराजाना सांगीतला. तो ऐकून
महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले “मी या नगरीचा राजा आहे. माझ्या आज्ञेचे
उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पहातो.”
एवढे वाक्य बोलताच ते भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले. सारे सेवक
सिंहासनाजवळ धावतच गेले आणि त्यांनी महाराजाना उठवून बसविले. त्यांना पाणी पाजवून
सावध केले. परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्याना भयंकर
वेदना होऊ लागल्या. राजपुरोहीताना बोलावण्यात आले. त्यांनी महाराजांची ती अवस्था
पाहून, आपल्या घरी जाऊन श्रीदत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थ, प्रसाद
महाराजाना आणून दिला. महाराज म्हणाले “श्रीपाद
वल्लभानी कांही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. आपण यावर कांही
उपाय सुचवावा.” राजपुरोहित म्हणाले “महाराज आपण विव्दान ब्राम्हणाकडून श्रीदत्तपुराणाचे पारायण करवून घेवून त्यांना भूदान, अन्नदान आणि सुवर्णदान
करावे. तसेच कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू
श्री दत्तात्रेयांची आराधना करावी. राजपुरोहीताच्या सांगण्याप्रमाणे
श्रीदत्तपुराणाच्या पारायणास प्रारंभ झाला. परंतु आश्चर्य असे की पारायण प्रारंभ
होताच गावात चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्याला आळा घालणे राजास अति कठीण झाले.
राजे महाराजांच्या स्वप्नात त्यांचे पितर
येऊन म्हणू लागले “ अरे वेलू, आम्हास श्राद्धभोजन देत नाहीस, आमची या प्रेतयोनीतून
सुटका करण्यास कांही करीत नाहीस.” महाराज त्या पितराना म्हणाले “तात, मी
शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना?” पितर म्हणाले “आम्हाला कांहीच मिळत नाही.
ब्राम्हण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने आणि ब्राम्हणांनी श्रद्धापूर्ण अंत:करणाने
मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल.” पितरांचे हे
वक्तव्य ऐकून महाराजाना रात्री निद्रा लागली नाही. याच वेळी महाराजांची कन्या
भूत-बाधेने पिडीत होऊन, केस मोकळे सोडून. घरातील भांडी फेकून देऊ लागली. ती
जेवणाकरिता बसताच, तिला अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे. तिच्या
कपड्यांना एका-एकी आग लागे आणि तिचे अंग भाजले जाई.अशा प्रकारे महाराजाना चोही
बाजूंनी संकटांनी घेरले होते. महाराजाना
सहाय् करणाऱ्या राजपुरोहिताची शांत, सोज्वळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या
शिरावर भांडे आपटू लागली. पारायण करणारे ब्राम्हण पारायण संपवून घरी जाताच त्यांना
घरात धुमाकूळ घालणारी भुते, प्रेते दिसू
लागत. ती पाहून ते बिचारे ब्राम्हण घाबरून जात. ती भुते ब्राम्हणांना म्हणत
“तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पतीदेवापासून दूर करून
अतोनात छळ केला. तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाम मार्गाने मिळविलेले
असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत.” वेलप्रभू महाराजाना आपल्या करणीचा
पश्चाताप झाला.ते स्वत: राजपुरोहित आणि अन्य ब्राम्हणासह श्रीपाद प्रभूंच्या
दर्शनास गेले. त्या सर्वानी प्रभूंच्या शरणागतीची आर्त स्वरात प्रार्थना केली आणि
श्रद्धा भावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. क्षमाशील आणि दयाघन श्रीपाद
प्रभुनी मोठ्या उदार अंत:कारणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले “मंदिरातील
स्वयंभु दत्तात्रेय मीच आहे. काळाग्नी स्वरुपात असलेले श्रीदत्तस्वरूप माझेच आहे. मी जीवांच्या
उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतरलो आहे. मी माझ्या पुढील नृसिंह
सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री
बापन्नाचार्युलू सारखाच दिसेन. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्त
भावाने “श्रीपाद वल्लभा, दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारताच मी तुमच्या सर्व
पापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करतो.” श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर
महाराज वेलप्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रसन्न चित्ताने राजदरबारी
परतले. || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
***************************************************************
अध्याय १७वा
श्रीपाद
प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामानंदास अनुग्रह.
श्रीनामानंदस्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूंचे
शिष्य आणि त्यांचे समकालीन होते. संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नांव
सायन्नाचार्युलू असे होते आणि ते भारव्दाज गोत्रीय होते. संन्यासोत्तर त्यांनी
अनेक तीर्थ यात्रा केल्या आणि सदगुरुंच्या शोधात निघाले. फिरत,फिरत के पिठीकापुरम
क्षेत्री येऊन पोचले. ते वैष्णव असून भगवान विष्णूंची आराधना करीत असत. त्यांचे
सोवळे कडक आणि आचार विचार उच्च व शुद्ध होते. ते पिठीकापुरातील कुंतीमाधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले
असताना त्यांच्या समोर एक चांडाळ वर्णातील
पुरुष आला आणि म्हणाला “आमची दक्षिणा देऊन पुढे जा” नामानंद आश्चर्याने तो
प्रकार पहातच राहिले. नंतर ते त्यास म्हणाले “अरे चांडाळा तू कोण आहेस? मी एक
वैष्णव ब्राम्हण आहे, माझे नांव नामानंद आहे तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत
नाही.” नामानंदाच्या या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला “ तू
सद्गुरूंच्या शोधात वेड्यासारखा वण-वण फिरत आहेस. तू मला ओळखत नाहीस. मीच तुझा
सद्गुरू आहे.मीच तुला संन्यासोत्तर नामानंद हे नांव दिले आहे. तुझ्या जवळ असलेली
संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर
आणि सर्वासमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. जर तू असे
केले नाहीस तर मी तुझा सर्व नाश करीन. तुझ्या शरीराचे तुकडे,तुकडे करून मरणप्राय
यातना देईन. मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे.” नामानंदाच्या मनांत नसताना केवळ
अन्य पर्याय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले,आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती
गुरुदक्षीणेच्या स्वरुपात अर्पण केली. तितक्यात तो चांडाळ आपल्या दिव्य मंगल अशा स्वरुपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदाना
झाली. त्यांच्या दिव्य नेत्रातून अनंत
द्या, करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते. दिव्य, मंगलमूर्ती भगवंतांनी
म्हटले “मी श्रीदत्तात्रेय आहे. मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभाचे स्वरुपात
पिठीकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू
आहे. तू माझे सर्वस्व झाला आहेस. मीच सत् चित् आणि आनंद आहे. तू उद्यापासून “नामानंद” हे नांव धारण करून धर्म प्रचार कर.
तुला सुख, शांती, प्राप्त होईल अंती माझ्या पदास येशील.” असे सांगून चांडाळाच्या
वेशात असलेले श्रीदत्त प्रभू अंतर्धान पावले. अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद
प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले. त्यांचा जीव भुकेने व्याकुळ होत होता. परंतु
पिठापुरमच्या लोकांनी त्याना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अप्पलराज शर्मा
यांच्या घराजवळ आले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्दहि फुटत नव्हता. कसे बसे ते “ओम
भिक्षान्देहि” म्हणाले तितक्यात दार उघडून
घरातून श्रीपाद प्रभू अन्नाचे भरलेले ताट घेवून आले. नामानंदाना ओसरीवर बसवून
त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले. केवढे हे भाग्य| विश्वनियंता आपल्या भक्ताला
स्वहस्ते जेवण भरवीत होता. धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त. जेवण झाल्यावर त्या
अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि
आशीर्वाद दिला. प्रभू म्हणाले “ तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठीही तुला
हात पसरावा लागणार नाही. तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रुपाने असेन
आणि तुझी डोळ्याच्या पापणी प्रमाणे रक्षा करीन.”
यानंतर धर्म प्रसारासाठी नामानंद
स्वामिनी देशभर यात्रा केल्या
शंकर
भट्ट, श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी जात असताना एका
गावी त्यांना एका असाह्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची आर्त स्वरात विनंती केली. दोन बलिष्ठ पुरुष तिच्या मागे काठ्या घेऊन येत होते. त्यावेळी शंकर भट्ट त्या महिलेस म्हणाले “माते तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उभी रहा.” शंकरभट्टाचे ते आत्मविश्वासाने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते दोन राकट पुरुष आश्चर्य चकित झाले. ते म्हणाले “अरे ब्राम्हणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू बऱ्या बोलाने दूर हो.” त्या दुष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर भट्टाच्या अंतरंगात एका अद्भूत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले “अरे ब्राम्हण कुलात जन्म घेऊन निर्ल्लज्जपणे गायीचा वध करून, गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनाना माझ्या सारख्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे कांहीच कठीण नाही. परंतु तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ट रोगाने त्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा महाभयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात.” शंकर भट्टाचे हे वक्तव्य ऐकून ते दोन दुष्ट आपले सर्व धाडस हरवून बसले आणि निस्तेज झाले. शंकर भट्टाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्याने केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा धृढ विश्वास झाला. त्यांनी आपल्या चुका कबुल करून शंकर भट्टाची क्षमा मागितली. शंकर भट्ट म्हणाले “बाबानो, तुम्हाला आपल्या वाईट कर्मांचा पश्चाताप झाला आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु एक शुभ वार्ता सांगतो,त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले श्री दत्तप्रभू सध्या मानव रुपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील.” त्या असाह्य स्त्रीचे नांव सुशीला होते आणि तिला तिच्या सासू, सासऱ्यांनी एका दुष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरुन घरातून घालवून दिले होते. शंकरभट्ट, ते दोन पुरुष आणि सुशीला असे चौघेजण कुरुगड्डीस जाण्यास निघाले. मार्गात त्याना नामानंद स्वामींचा आश्रम लागला. तेथे या चौघाजणांनी प्रवेश केला. स्वामिनी सर्वांचे स्वागत करून त्याना खाण्यास फळे दिली. फलाहार झाल्यानंतर सर्वानी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले. नानानंदानी श्रीपाद प्रभूंच्या अनेक दिव्य लीलांचे वर्णन करून सांगितले. शेवटी “सिद्ध मंगल स्तोत्राचे” गायन होऊन प्रभूंची आरती केली. त्या परम मंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि उष:काळ केव्हा झाला हे कळलेच नाही. नामानंद स्वामी प्रात:कालच्या साधनेत मग्न झाले. थोड्याच वेळात अन्न सामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली, गाडीवान खाली उतरला त्याने सर्व भांडी पात्रे, खाद्य सामुग्री, खाली उतरवून आत आणून ठेवली. तो गाडीवान सुशीलेस म्हणाला “ बाईसाहेब, थोड्याच वेळात तुमचे पती, सासू, सासरे, दुसऱ्या बैल गाडीने येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक आगळे-वेगळे माधुर्य होते. तो इतर गाडीवाना प्रमाणे नव्हता, त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विलसत होते. सर्वाना त्याच्याकडे सारखे पहात रहावे असे वाटत होते. परंतु तो गाडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला. थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टास विचारले “तो गाडीवान कोठे आहे? शंकर भट्ट म्हणाले “स्वामी तो गाडीवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला.” ते ऐकताच स्वामी म्हणाले “तुम्ही किती भाग्यवान आहात. मीच अभागी आहे. परम कारुण्य मूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवानाच्या रुपात अन्न सामुग्री घेऊन आले होते. त्यांनी तुम्हा सर्वाना दर्शन दिले.” नामानंद स्वामीना श्रीपाद प्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनांस चुटपुट लागून राहिली. त्रिकाळ ज्ञानी नामानंदानी सांगितल्या प्रमाणे सारे घडून आले. सुशीला आपल्या पती व सासूसासर्यांबरोबर आपल्या घरी गेली. श्री नामानंद स्वामींची अनुज्ञा घेवून शंकरभट्ट आणि दोघे ब्राम्हणांनी कुरुगड्डीस जाण्याचे प्रस्थान ठेवले || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय १८
गावी त्यांना एका असाह्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची आर्त स्वरात विनंती केली. दोन बलिष्ठ पुरुष तिच्या मागे काठ्या घेऊन येत होते. त्यावेळी शंकर भट्ट त्या महिलेस म्हणाले “माते तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उभी रहा.” शंकरभट्टाचे ते आत्मविश्वासाने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते दोन राकट पुरुष आश्चर्य चकित झाले. ते म्हणाले “अरे ब्राम्हणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू बऱ्या बोलाने दूर हो.” त्या दुष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर भट्टाच्या अंतरंगात एका अद्भूत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले “अरे ब्राम्हण कुलात जन्म घेऊन निर्ल्लज्जपणे गायीचा वध करून, गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनाना माझ्या सारख्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे कांहीच कठीण नाही. परंतु तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ट रोगाने त्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा महाभयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात.” शंकर भट्टाचे हे वक्तव्य ऐकून ते दोन दुष्ट आपले सर्व धाडस हरवून बसले आणि निस्तेज झाले. शंकर भट्टाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्याने केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा धृढ विश्वास झाला. त्यांनी आपल्या चुका कबुल करून शंकर भट्टाची क्षमा मागितली. शंकर भट्ट म्हणाले “बाबानो, तुम्हाला आपल्या वाईट कर्मांचा पश्चाताप झाला आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु एक शुभ वार्ता सांगतो,त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले श्री दत्तप्रभू सध्या मानव रुपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील.” त्या असाह्य स्त्रीचे नांव सुशीला होते आणि तिला तिच्या सासू, सासऱ्यांनी एका दुष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरुन घरातून घालवून दिले होते. शंकरभट्ट, ते दोन पुरुष आणि सुशीला असे चौघेजण कुरुगड्डीस जाण्यास निघाले. मार्गात त्याना नामानंद स्वामींचा आश्रम लागला. तेथे या चौघाजणांनी प्रवेश केला. स्वामिनी सर्वांचे स्वागत करून त्याना खाण्यास फळे दिली. फलाहार झाल्यानंतर सर्वानी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले. नानानंदानी श्रीपाद प्रभूंच्या अनेक दिव्य लीलांचे वर्णन करून सांगितले. शेवटी “सिद्ध मंगल स्तोत्राचे” गायन होऊन प्रभूंची आरती केली. त्या परम मंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि उष:काळ केव्हा झाला हे कळलेच नाही. नामानंद स्वामी प्रात:कालच्या साधनेत मग्न झाले. थोड्याच वेळात अन्न सामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली, गाडीवान खाली उतरला त्याने सर्व भांडी पात्रे, खाद्य सामुग्री, खाली उतरवून आत आणून ठेवली. तो गाडीवान सुशीलेस म्हणाला “ बाईसाहेब, थोड्याच वेळात तुमचे पती, सासू, सासरे, दुसऱ्या बैल गाडीने येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक आगळे-वेगळे माधुर्य होते. तो इतर गाडीवाना प्रमाणे नव्हता, त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विलसत होते. सर्वाना त्याच्याकडे सारखे पहात रहावे असे वाटत होते. परंतु तो गाडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला. थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टास विचारले “तो गाडीवान कोठे आहे? शंकर भट्ट म्हणाले “स्वामी तो गाडीवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला.” ते ऐकताच स्वामी म्हणाले “तुम्ही किती भाग्यवान आहात. मीच अभागी आहे. परम कारुण्य मूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवानाच्या रुपात अन्न सामुग्री घेऊन आले होते. त्यांनी तुम्हा सर्वाना दर्शन दिले.” नामानंद स्वामीना श्रीपाद प्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनांस चुटपुट लागून राहिली. त्रिकाळ ज्ञानी नामानंदानी सांगितल्या प्रमाणे सारे घडून आले. सुशीला आपल्या पती व सासूसासर्यांबरोबर आपल्या घरी गेली. श्री नामानंद स्वामींची अनुज्ञा घेवून शंकरभट्ट आणि दोघे ब्राम्हणांनी कुरुगड्डीस जाण्याचे प्रस्थान ठेवले || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय १८
अहंकारी महा पंडिताचा गर्व हरण
रविदास नांवाचा एक रजक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता. तो प्रभूंचे
कपडे धुवून, वाळवून आणून देत असे. या
शिवाय आश्रमाच्या अंगणाची स्वच्छता, पूजेसाठी फुले आणणे ही त्याची विशेष आवडीची
कामे होती. श्रीपाद प्रभू स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना मोठ्या
श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार करीत असे आणि तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत. एकदा
रविदास आपल्या नावेमध्ये एका वेदसंपन्न पंडितास घेऊन कुरुगड्डीस येत होता. अस्पृश्य
जातींच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत ते पंडित एकटेच बसले. नाव
सुरु झाली. ते रविदासला म्हणाले “मी एक पंडित आहे. मला श्रीपाद प्रभुनी बोलाविले
आहे, तेच तुला नावेचे भाडे देतील.” राविदासाने होकारार्थी मान डोलावली. बोलण्याच्या
ओघात त्या पंडिताला कळाले की रविदासला पौराणिक, ऐतिहासिक कथेची माहिती नाही. ते पंडीत
रविदासला म्हणाले “अरे रविदासा तुला
पुराण आणि इतिहासाचे कांहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालविलेस.”
हे ऐकून रविदास निराश झाला. नाव मार्गक्रमण करीत असताना पाण्याचा वेग एकदमच
खूप वाढला. त्या वेगाने नावेस एक छिद्र पडले आणि त्यातून नावेत पाणी
शिरू लागले. रविदास त्या पंडिताला म्हणाला “महाराज आपणास पोहता येते का?” ते पंडित
म्हणाले “मला तर पोहता येत नाही.” रविदास म्हणाला “महाराज मला पोहता येते परंतु
तुम्हाला पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले
पाणी पाहून राविदासाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली.तितक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी
एक दिव्य कांती दिसली. रविदासाने त्या कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला.
त्याच वेळी एक महद आश्चर्य घडले. एक अदृश
हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोचली
आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. रविदासने प्रभुना ज्यावेळी नमस्कार
केला त्यावेळी त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले परंतु त्या पंडीताकडे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्र
चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडेना.श्रीपाद प्रभू
त्या पंडिताला म्हणाले “अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे
कळेनासे झाले आहे.तू विव्दान असून सुद्धा सद्गुणांचा संचय करण्या ऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास.
आपल्या सुशील पत्नीचा छळ करून, एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून
परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे. हे पापकर्म केल्यावर तू
माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिके प्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे. आज
पासून मी तुला तीन वर्षांचे आयुष्य वाढवून देत आहे. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन
विसरून चांगले आचरण कर. तुझ्या विव्दत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले
तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे. त्या पंडिताच्या तोंडातून एक
शब्दही निघेना. श्रीपाद प्रभुनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याला तीन वर्षाचे
वाढविलेले आयुष्य दिले. ते म्हणाले “तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पळवून आणून
दासी केलेस. परंतु पुढील जन्मात ते रजक दांपत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद
घेतील, त्यावेळी तू त्या रजक पत्नीचा दास
होऊन त्यांची सेवा करशील. या तीन वर्षात कांही सत्कर्म केल्यास तुला अन्न,वस्त्रास
कमी पडणार नाही. परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगाव्या लागतील. मृत्यू पासून वाचवून
माझ्याकडे घेऊन आलेल्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या
फलस्वरूप तो माझी सेवा करील. तू तत्काळ या पुण्य भूमीतून निघून जा.” प्रभूंच्या आदेशानुसार पंडित तत्काळ तेथून निघून
गेला.
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.
*******************************************************************************
अध्याय १९वा
रविदास रजकास पुढील जन्मी राज्यपद मिळण्याचा
श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद
एकदा रविदास रजक कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उभा होता. त्यावेळी एका
मोठ्या आणि सजविलेल्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जल-विहार करीत
होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पहात होता. त्याच वेळी श्रीपाद प्रभू कृष्णा
नदीत स्नान करून बाहेर आले. रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्य
परीपाठा प्रमाणे प्रभूंना नमस्कार केला नाही. श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या
खांद्यावर हात ठेऊन प्रेमाने विचारले “ काय पहात होतास रे रजका? त्यांच्या त्या मधुर
वाणीने रविदास गोंधळला, परंतु तत्काळ स्वतःला सावरीत त्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. प्रभू म्हणाले “त्या राजाच्या
वैभवाकडे पहात होतास ना? रविदासाने होकारार्थी मान हलविली. ते पुढे म्हणाले “तुला
राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा (सध्याचे बिदर नगर)
राजा होशील. त्यावेळी मी नृसिंह सरस्वती रुपात तुला दर्शन देईन.” तो रजक म्हणाला
“प्रभो, मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव
मिळावी.” (श्रीपाद प्रभुनी रविदासाची ही
इच्छा पूर्ण केली. तो मृत्यू नंतर यवन कुलात जन्मास आला आणि यथाकाळी विदुरा नगरीचा राजा झाला. राज्य वैभवाचा उपभोग
घेतल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी त्यास
नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले.
त्यांच्याच कृपेने त्यास पूर्व जन्माची स्मृती झाली आणि तो स्वामींच्या चरणी
नतमस्तक झाला. त्याने स्वामीना आपल्या राजधानीत नेऊन त्यांचा मोठा सन्मान केला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय २०वा खिरीने भरलेले अक्षय पात्र
श्रीपाद प्रभूंची सर्व भक्त मंडळी बसली असताना तेथे एक तरुण
ब्राम्हण आला. त्याचे नांव वल्लभेश्वर
शर्मा असे होते. तो पिठीकापुरमहून आला होता. श्रीपाद प्रभुनी त्याला आपल्या माता,
पिता, नातेवाईक आणि स्नेहसंबंधी यांचे क्षेम, कुशल मोठ्या आस्थेने विचारले.
त्रिकाळ ज्ञानी असलेल्या श्रीपाद प्रभूंचा हा आवडता छंदच होता. गुरुदेवा समवेत
सत्संगात वेळ कसा गेला ते भक्त मंडळीना कळलेच नाही. मध्यान्हीची वेळ झाली होती.
शिष्यांनी भिक्षा मागून आणली होती. त्याच वेळी श्रीपाद प्रभुनी आपला हात कांहीतरी
घेण्यासाठी वर केला आणि त्या दिव्य हातात एक चांदीचे भांडे आले, ते खिरीने भरलेले
होते. प्रभूंच्या आदेशानुसार ती खीर सर्व भक्ताना वाटून दिली. सर्वाना पोटभर
दिल्यानंतर सुद्धा ते पात्र अत्यंत मधुर अशा खिरीने भरलेलेच होते. शिष्यांनी
आणलेली भिक्षा कृष्णेच्या पाण्यातील जलचराना देण्याच्या, प्रभूंच्या, आदेशानुसार,
रविदास ती भिक्षा घेऊन नदीचे किनारी गेला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय २१वा वल्लभेश्वराचा
विवाह
श्रीपाद प्रभूंच्या भक्तमंडळी मध्ये सुब्बन्ना शास्त्री नांवाचे एक
कर्नाटकी ब्राम्हण आले होते.त्यांच्या बरोबर एक गरीब ब्राम्हण आला होता. त्याने
श्रीपाद प्रभूंना आपल्या मुलीच्या विवाहाबद्दल विचारले. प्रभू म्हणाले “मी असताना
तुम्हास काळजी कशाची? हा वल्लभेश्वर तुझा
जावाई होण्यास योग्य आहे. सुब्बन्ना शास्त्री त्याला पौरहित्य शिकवीत आहेत.
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “पिठीकापुरममध्ये मल्लादि लोक, वेंकटप्पा श्रेष्ठी, आणि
वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले होते, तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून
दिला आहे. ब्रम्हराक्षस, महापिशाच्च, बाधेने पिडीत असलेल्या लोकांनि या प्रसादाचा स्वीकार केल्यास त्यांची त्या
बाधेतून मुक्तता होते तसेच दारिद्रय, दुःख याने पिडीत लोकांनी हा प्रसाद खाल्ल्यास
त्यांना संपदा आणि अभिवृद्धी लाभते.” यानंतर सद्गतीत झालेल्या कंठाने प्रभू
म्हणाले “या तीन वंशांशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने
मी त्यांच्या अंकित होतो. मला कोठेही जेवण न मिळाल्यास मी सूक्ष्म रुपाने जाऊन
तेथे यथेच्च जेवण करतो. जे कोणी वात्सल्यपूर्ण भावाने माझी सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात
खेळत असतो. माझ्या पाउलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित
होतो.” प्रभू पुढे म्हणाले “माझे दर्शन, स्पर्श, व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे
अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून तुम्ही माझ्याकडे येता, तुम्ही आनंदाने नाम
रुपाला ओलांडून पुढे जाल” श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वक्तव्यानंतर सुब्बन्ना शास्त्री, तो गरीब ब्राम्हण, वल्लभेश्वर आणि शंकर
भट्ट हे चोघे त्या ब्राम्हणाच्या गावी गेले. कन्येच्या पित्याच्या घरासमोर
वधू-वरास बसवून सुब्बन्ना शास्त्रींच्या पौरहित्याखाली विधिवत विवाह संपन्न झाला.
कन्येचा पिता निर्धन असल्याने आणि पती गरीब असल्याने मंगळसुत्रा ऐवजी हळकुंड
दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले. विवाहोपरांत नववधु , वर, आणि कन्येचे
माता,पिता श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. प्रभूंनी त्या नव दाम्पत्यास तोंड भरून
आशीर्वाद दिले. सर्व भक्त मंडळी बसली असताना श्रीपाद प्रभू म्हणाले “श्रीपाद
श्रीवल्लभाचा हा माझा अवतार फळ देणारा महान अवतार आहे. माझे स्मरण केल्याविना कोणताच
अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त
करण्यासाठी माझे नामस्मरण करतात.” प्रभू पुढे म्हणाले “अरे वल्लभेश्वरा| तुझे
माता,पिता लवकरच निवर्तले. तुझ्या नातेवाइकानी तुला दुर्मार्गाला लाऊन तुझी सर्व
संपत्ती हिरावून घेतली आणि तुला भिकारी केले. ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर
होतील. तू कालांतराने एक मोठा व्यापारी होशील आणि कुरुगड्डीस सहस्त्र ब्राम्हण
भोजनाचा संकल्प करशील. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी धन घेवून जात असताना ते चोर
तुझे धन घेऊन तुला तुला मारून टाकतील. त्यावेळी मी प्रकट होऊन आपल्या त्रिशूलाने
तीन चोरांचा वध करीन, चौथ्या शरण आलेल्या चोरास जीवदान देईन. तुला जिवंत करून नंतर
अंतर्धान पावीन.” श्रीपाद प्रभूंचे हे बोलणे ऐकल्यावर त्या नववधूच्या नेत्रात
अश्रू दाटून आले. ते पाहून श्रीपाद म्हणाले “हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास
जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती मातेचेच दर्शन होते. त्या महान मातेच्या
कुशीत आम्ही सदैव बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव. तुला
या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल आणि तू अखंड सौभाग्यवती राहशील” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “तुम्ही पहात
असलेली ही घंटा एके काळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पाने अनेक
प्रदेश फिरून, अनेक आकार धारण करून पुन्हा येथे आली आहे. आमच्या आजोबांच्या
स्वत:च्या घरात माझ्या महा संस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खुण म्हणून
ही जय,जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठीकापुरमला पाठवीत आहोत.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
********************************************************************************
अध्याय २२वा
श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप
गणपती शास्त्री नांवाचा एक
युवक वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर (
सध्याचे काकीनाडा) या नगरात आपल्या गुरुग्रही राहत होता. त्याच्या घराजवळच गुरुदेवांचे शेत होते. गायी, वासरे होती. गणपती त्यांना चरावयास रानात
घेऊन जात असे तसेच त्यांचे दुध काढून त्याचे वाटप करण्याचे काम सुद्धा करीत असे.
एके दिवशी तो गायींना घेऊन रानात गेला असताना त्याला दहा वर्षाचा अत्यंत तेजस्वी
बालक दिसला. तो गुरुदेवांच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राम्हणच असावा असा गणपतीचा धृढ विश्वास झाला. त्याने त्या सुकुमार बालकास
विचारले “ तुझ्या गळ्यात जानवे दिसते, तू कोण आहेस? त्यावर तो बालक म्हणाला मी,
मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत. सर्वाना आधारभूत असणारा तो
मीच आहे. माझ्यातील ब्राम्हणाची लक्षणे पाहून मला ब्राम्हण समजल्यास हे कांही चूक नाही परंतु हे पूर्ण सत्य नाही.
माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रीय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते सर्व सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही
परंतु पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शुद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शुद्र समजल्यास ते खोटे नाही
परंतु ते संपूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेहि पूर्ण सत्य नाही. मी
सर्व सीमांच्या अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत
आहे. परंतु मी त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परम सत्य आहे. ते अवधुताना ज्ञात
आहे माझा धर्म हा परमधर्म आहे. तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधार सुद्धा आहे.
हेच माझे परम प्रिय तत्व आहे. हे सृष्टीतील जीवात असणाऱ्या तत्वापेक्षा सुमधुर
आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. अर्धनारी नटेश्वर या दोन रुपानी एकत्र
असलेला मी, मन, वाचेस अगोचर असून
दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण
अशा रुपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या दिव्य बालकाचे हे वक्तव्य
ऐकताच गणपती शास्त्रीच्या अंगात कापरे भरले. कारण त्याच्या जन्म पत्रिकेत या काळात
त्याची दयनीय स्थिती दाखविली होती. परंतु श्रीपाद प्रभुनी शनिदेवाशी बोलून, एका
दिव्य बालकाच्या रुपात येऊन, गणपती
शास्त्रीचे कर्म फळ गाईच्या दुधाच्या रुपात ग्रहण करून त्याला कर्म बंधनातून मुक्त
केले. तो बालक गाईचे दुध पिऊन तृप्त होऊन
एका आंब्याच्या झाडाखाली बसला. गणपतीने त्याच्याकडे पहिले त्याच्याबरोबर एक दहा
वर्षाची कन्या होती. दिसावयास दोघे अति सुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे
ऐकावेसे वाटत होते. बोलताना होणारे त्यांचे हाव भाव अत्यंत नयन मनोहारी होते.
त्याच वेळी वेंकटप्पा श्रेष्ठी घोडागाडीतून उतरले. त्यांच्या बरोबर एक दहा वर्षाचा
तेजस्वी बालक होता. ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले.
श्रेष्ठीना त्या दिव्य बालका बरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या
दोघांनी श्रीपाद प्रभुना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठीना
म्हणाले “आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले? आजोबा म्हणाले “त्या
दोघांकडे बघ किती नयन मनोहारी दृश्य आह.” श्रीपाद म्हणाले बघणारा आणि जे बघावयाचे
ते दृश्य दोन्ही एकच आहेत.” आजोबा म्हणाले “श्रीपादा, यातील वेदांत विषय मला समजत
नाही.” तेंव्हा श्रीपाद म्हणाले “आजोबा यात वेदांत काय आहे? श्रीहरी सुद्धा
अपरिमित, निर्गुण, निराकार असून आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही
सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा
सृष्टीचाच एक नियम आहे.” श्रीपाद श्रेष्ठीना म्हणाले “आजोबा, जो पर्यंत तुमच्या
घरातील लोक मला विसरणार नाहीत तो पर्यंत माझा, सर्व शक्तीसहित अदृश्य रुपाने
तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पाउलांचा आवाज ऐकू
येत राहील.” असे म्हणून श्रीपाद प्रभुनी
श्रेष्ठींना अनघा समवेत असलेल्या अनघ
स्वरुपात दर्शन दिले. ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले. श्रीपाद प्रभू
पुढे म्हणाले “आजोबा, सर्व भक्तगणाना
माझ्या आचरणाने, लीलेने, महिम्याने ज्ञानबोध करणे, हा सुद्धा माझ्या अवतार
कार्याचाच एक भाग आहे.” प्रभू असे बोलत असतानाच त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या
झाडाकडे पहात असतानाच त्या सुंदर बालिकेची आणि त्या बालकाची कांती दैदिप्यमान होऊन
ते श्रीपाद प्रभूंच्या रुपात विलीन झाले.
त्या आंब्याच्या झाडास एकच आंबा होता, तो कच्चा होता. परंतु प्रभूंच्या
हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला. तो श्रीपाद प्रभुनी आपल्या हातानी अत्यंत
प्रेमाने श्रेष्ठीना खाऊ घातला.
प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठीच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले
“मालीन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलावीत असतो. मालिन्य
रहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीव हा
सुपीक भूमीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टी चक्रात
येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव
देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरपी परमात्म
स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च
आनंदाचा आस्वाद घेतात. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयं प्रकाशाने
चमकणारे मुल तत्व मीच आहे. प्रत्येक जिवाच्या इच्छा, आकांक्षा यांना अनुसरून त्या,
त्या मार्गाने त्या, त्या स्थितीला
अनुसरून चालविणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य
अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवतांच्या स्वरुपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे.
त्यामुळे त्या, त्या स्वरुपाव्दारे पूजा,स्तोत्र या उपचारांच्गा स्वीकार करणारा
मीच आहे. सर्वाना बोध करणारा मीच आहे. कलीपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतातील
सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच
स्वरूप आहे, असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील.
त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम “सत्य” नंतर “ज्ञान”आणि त्यानंतर “ब्रम्ह” असे वर्णन
आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रम्ह स्वरूप आहे. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे.
जो साधक माझी निर्मल भाव-भक्तीने आराधना करतो,जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून
मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवितो. श्रीपाद प्रभू
पुढे म्हणाले “माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना “अभिष्ट सिद्धी” प्राप्त होईल. पिठीकापुरम या
क्षेत्रातिल माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या
भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन. पिठीकापुरम क्षेत्री “चित्रा” या माझ्या
जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करीन.
कुमारीकाना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील. असा माझा आशीर्वाद
आहे. श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिठीकापुरम
या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चीत्रगुप्ताकडून
महापुण्य लिहिले जाईल.” श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले. || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय २३वा.
श्रीशंकर
भट्टास कुरुगड्डी क्षेत्री श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन
शेकडो मैलांचा प्रवास करून, अनेक अडचणीना तोंड देऊन, अंती शंकर भट्ट
कुरुगड्डी या दिव्य स्थानी येऊन पोचले. त्यांनी सकाळीच श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले.
त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे शंकर भट्टास जाणवले.
प्रभूंच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान, ज्योती स्वरुपात ओसंडत
होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा व प्रेम यांची प्राप्ती
कांही प्रयास न करता होत असे. इहलोकात ते एकमेव
प्रभूस्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रुपाने मानवाकार घेऊन
डोळ्यासमोर दिसल्याने शंकर भट्ट भाव विभोर झाले. श्रीपाद प्रभूंच्या अनुग्रहामुळेच
त्याना प्रभूंच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य लाभले होते. प्रभूंच्या
मुखाकडे पाहताच शंकर भट्टास एक अलौकिक शांती, वात्सल्य आणि प्रेम त्यांच्या
अंतरंगात व्यापून त्यांचे मन,शरीर आणि हृदयास एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली.
त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या चरणाना अत्यंत श्रद्धा भावाने स्पर्श केला आणि त्या
स्पर्शाने त्यांचे शरीर हलके हलके झाल्या सारखे वाटत होते. शंकर भट्टाच्या
शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार
धारण केला. तो अगदी शंकर भट्टाच्या शरीरा सारखाच होता. श्रीपाद प्रभुनी मंद हास्य
करीत विचारले “तुझ्या सारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का?” शंकर भट्ट
उत्तरला “प्रभू, तो आकार मी पहिला. तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही. श्रीपाद प्रभू म्हणाले “ अरे
शंकर भट्टा, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पाप पुरुष होता. आता तुझ्या
शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्य पुरुष आणि
एक पाप पुरुष असतो. या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेंव्हा निघून जातो तेंव्हा तीच मुक्तीची अवस्था असते.
ब्राम्हण कुळात जन्म घेतल्या नंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या
पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मानी उद्धार करावा. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले
“ब्राम्हणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना, आपल्या
उपजीवेकेपुरतेच धन घ्यावे. आमचे आजोबा बापन्नाचार्युलू , पिताश्री, अप्पलराज शर्मा
हे दोघे सद्ब्राम्हण असून माता सुमती महाराणी आणि आजी राजमंबा या दोघी परम पवित्र स्त्रिया आहेत. यांचे केवळ
स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात.” यानंतर श्रीपाद प्रभुनी आपल्या उजव्या
हाताच्या बोटांनी भूमीस स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा
एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. त्यात कांही मधुर
फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, थोडी चांदी,नवरत्नाचा हार आणि दिव्य अग्नि प्रकट झाला. शंकर भट्टाच्या
शरीरातून निघालेला पाप पुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी
त्याला नेत्रानीच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून
भस्मसात झाला. परंतु शंकर भट्टाच्या
शरीरात अग्नीचा भडका उडाला. तो “स्वामी मला वाचावा” अशी आर्त स्वरात विनंती करू
लाला. त्यावेळी प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून शंकर भट्टास स्पर्शून
गेला. त्या स्पर्शाने शंकर भट्टाचे शरीर शीतल झाले. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत
झाल्यासारखे वाटले, नाडीचे स्पंदन थांबल्या सारखे होऊन ते समाधी अवस्थेत गेले. समाधी
अवस्थेतून ज्यावेळी शंकर भट्ट बाहेर आले त्यावेळी माध्यान्हांची वेळ झाली
होती. तो गुरुवारचा दिवस होता, श्रीपाद प्रभू स्नान संध्या आटोपून भक्तांच्या मेळाव्यात
येऊन बसले होते. भक्त गणांनी समर्पित केलेल्या भिक्षान्नाला श्रीपादानी आपल्या
दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले.
भिक्षेतिल थोडे अन्न काक-बळी साठी काढून ठेवले. प्रभुनी शंकर भट्टास अत्यंत मधुर
अशा सुरात हाक मारली. त्यांच्या हातात चांदीचे पात्र होते त्यात हलवा भरलेला होता.
त्यातील थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला, तो नभो मंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद
त्यांनी भूमातेस अर्पण केला तो भूमातेने स्वीकार केला. नंतर तो प्रसाद सर्व
भक्ताना वाटण्यास शंकर भट्टाकडे दिला. सर्वाना दिल्यानंतर सुद्धा त्या पात्रात
अजून हलवा भरलेलाच होता. प्रभूंच्या आदेशाप्रमाणे तो प्रसाद चांदीच्या पात्रासह
कृष्णेच्या प्रवाहात सोडून दिला.
|| श्रीपाद राजम शरणं
प्रपद्ये. || *******************************************************************************
अध्याय २४ वा
विश्वावधानी याना पाप कर्माचे फलस्वरूप
काटेरी झाडाचा जन्म
पिठीकापुरम क्षेत्री विश्वावधानी नांवाचे एक ब्राम्हण राहत होते.
त्याना श्रीपाद प्रभू हे श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे मान्य नव्हते. ते
उपहासाने म्हणत स्वयंभु दत्तात्रेय बापन्नाचार्युलू यांच्या नातवाच्या रुपाने
अवतरित झाले आहेत असे म्हणणे म्हणजे केवढा हा देवद्रोह.| श्रीपाद प्रभू, माता
सुमती, भगिनी राधा, सुरेखा, विद्याधरी दोघे ज्येष्ठ बंधू वेंकट सुब्बय्या
श्रेष्ठी, नरसिंह वर्मा यांचे घरी मोठ्या प्रेमभावाने भोजन करीत असत. हे
वर्तन कर्मठ विश्वावधानी याना आवडत नसे. ते क्रोधाने म्हणत माल्लादि आणि घंडीकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट
करणाऱ्या लोकांना ब्राम्हण समाजातून
बहिष्कृत करा. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आहेत याचे प्रमाण काय?
असे तर्क, वितर्क करणाऱ्या विश्वावधानीचा कालांतराने देहांत झाला आणि त्याना पुढील
जन्म श्रीपाद प्रभूंच्या अंगणातील एका काटेरी वृक्षाच्या रुपात मिळाला.विश्वावधानी यांची मृत्यू नंतर करावयाची
उत्तर क्रिया त्यांच्या नातवाने व्यवस्थित पणे न केल्यामुळे आणि त्यांचा पाप भार
अति झाल्यामुळे त्याना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाडास
श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालत असत . एके दिवशी
बापन्नाचार्युलूनि श्रीपाद प्रभुना विचारले “अरे श्रीपादा| तुला हे काट्याचे झाड प्रिय
का आहे? तू या झाडास श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी हे झाड वाढणारच आहे.
त्यावर श्रीपाद म्हणाले “आजोबा, आपल्या घराण्यातील विश्वावधानी आजोबा, त्यांच्या
मृत्यूनंतर या काटेरी झाडाच्या रुपाने जन्मले आहेत.’” याच वेळी गुरुचरण नांवाचे एक दत्तभक्त श्रीपाद
प्रभूंच्या दर्शना साठी आले. त्याना आत घेऊन येत श्रीपादप्रभू, गुरुचरणास म्हणाले
“आता तुला एक गम्मत दाखवितो, ती तू बघ.”
त्यांच्या बरोबर बापान्नाचार्युलू सुद्धा होते. श्रीपाद प्रभू सर्वाना त्या काटेरी
झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले “ हे विश्वन्ना आजोबा| तुमच्या मुलाने श्रद्धारहित
श्राद्धकर्म केल्याने आणि बापन्नाचार्युलू सारख्या महापुरुषाची अकारण निंदा
केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म प्राप्त झाला. हा गुरुचरण तुमचा पूर्व
जन्मीचा पुत्र आहे. त्याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करवून
घेईन. यासाठी तुमची संमती आहे ना?” हे प्रभूंचे वक्तव्य ऐकून सर्वजण आश्चर्य चकित
झाले. त्या काटेरी झाडास आच्छादिलेला विश्वावधानीचा प्रेतात्मा म्हणाला “श्रीपाद
प्रभू, या पेक्षा मोठे भाग्य ते कोणते?”
श्रीपादानी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून त्यास अग्नी देण्यास सांगितले. गुरुचराणाने ते काटेरी
झाड उपटून त्याचे दहन केले आणि नंतर स्नान केले. त्यानंतर प्रभुनी त्यास विभूती
लावण्यास सांगितली. अशा प्रकारे श्रीपाद प्रभुनी त्यांच्यावर दोषारोपण करणाऱ्या
विश्वावधानीवर सुद्धा कृपा करून त्याना सद्गती मिळवून दिली. खरोखरी श्रीपाद
प्रभूंच्या लीला अगम्य असतात.
|| श्रीपाद शरणं शरणं प्रपद्ये. ||
****************************************************************************
अध्याय २५ वा
दंडीस्वामींचा गर्व हरण
एकदा श्रीपाद प्रभूंचे अनेक शिष्य जगन्नाथपुरी क्षेत्री दर्शनास गेले
होते. त्याच वेळी दंडीस्वामी नांवाचे एक महान तपस्वी आपल्या एकशे आठ शिष्यांसह तेथे
आले. श्रीपाद प्रभूंच्या शिष्यांनी त्या महात्म्याच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार
केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्याना कांही बोलता येईना.
श्रीपाद प्रभूंच्या सर्व शिष्यांनी दंडी स्वामीना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद
प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्या फलस्वरूप थोड्याच वेळात
दंडी स्वामीना त्यांची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य कुतर्काने म्हणू
लागले “श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडी
स्वामींची वाचा जावी असे असे त्यांनी केले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने
त्यांची वाचा परत आली आणि ते स्वस्थ झाले.
आमचे गुरु दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनते समोर आणतील. ते पिठीकापुरम
क्षेत्री जाऊन श्रीपादांशी शास्त्र चर्चा करून त्याना पराभूत करून विजय पताका घेऊन
येतील, यात शंकाच नाही.” कांही दिवसांनी
दंडी स्वामिनी पिठीकापुरम क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी कुक्कटेश्वराच्या
मंदिरात जाऊन सर्व देव-देवतांचे दर्शन घेतले. स्वयंभु दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन
ते म्हणाले “येथे असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे. ते
पुढे म्हणाले त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे.” त्या
दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुंकुम, विभूती सारखे पदार्थ निर्माण
करून आपल्या भक्तांना देण्यास सुरवात केली. गावातील ब्राम्हणांनी दंडी स्वामींचा
यथा योग्य संम्मान केला. श्री दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभुनी दंडी स्वामींची
तपस्या जाणून त्याना साष्टांग नमस्कार केला. अप्पलराज शर्मा यांनी दंडी स्वामींचे
दर्शन घेऊन त्याना आपल्या घरातील काळ्या पाषाणाची श्रीदत्तात्रेयांची मूर्ती अर्पण
केली. श्री बापन्नाचार्युलू यांनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती
पत्करली. कांही दिवस पिठीकापुरी मुक्काम
करून दंडी स्वामी शिष्यांसह गावाबाहेर जाण्यास निघाले. ते एका मागून एक असे चालत
जात होते. त्याना तेथील जमीन वाढत असल्या सारखी वाटत होती. ते किती तरी वेळ चालत
होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते. या प्रमाणे या क्रियेत बराच वेळ
गेला. त्याच वेळी दंडीस्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले.
स्वामीना मात्र आपल्या शरीराचेच दोन तुकडे झाल्या सारखे वाटले. त्याना
आतापर्यंतच्या अनुभवा वरुन कळून चुकले
होते की श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या
पेक्षा कैकपट अधिक शक्तीसंपन्न आहेत.
त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल.
अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची चिंता त्याना लागून राहिली होती. श्रीपाद
प्रभूंची अकारण निंदा केल्याने दंडी स्वामीना त्यांच्या मृत्यूनंतर पिशाच्च योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने
आपल्या लेखात लिहिले होते. परंतु दयाघन श्रीपाद प्रभुनी तो निर्णय रद्द करून
त्यांच्या पापाचा परिहार अत्यंत थोड्या शिक्षेतुन केला. श्रीपाद प्रभुनी दंडी
स्वामीना हिमालय पर्वतावर जाऊन तपाचरण करण्याचा आदेश दिला. त्याना शिष्य संघटनेची
आवश्यकता नसल्याचे सुद्धा बजाऊन सांगितले. अशाप्रकारे श्रीपाद प्रभुनी अहंकारी
दंडीस्वामींचा गर्व मोठ्या लीलेने हरण केला.
एकदां श्रीपाद प्रभू आपल्या
आजोबांच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. बापान्नाचार्युलू,
अप्पालराज शर्मा, आणि श्रेष्ठी हे तिघे बाळ श्रीपादच्या मुखारविन्दाकडे पाहत
त्यांच्या अगदी जवळ बसले होते. श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभुना भूक
लागली होती. प्रभूंची आजी राजमंबाने एका चांदीच्या भांड्यात दहीभात कालवून आणला
होता. श्रीपाद प्रभुनी तो मोठ्य्या आवडीने खाल्ला. याच वेळी कुक्कटेश्वराच्या
मंदिरात एक आश्चर्य घडले. स्वयम्भू श्री दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दहीभाताची शिते
दिसू लागली. पुजाऱ्याने ती शिते आपल्या वस्त्राने पुसून टाकली. परंतु कांही
क्षणांतच तेथे पुन्हा भाताची शिते दिसू लागली. ती पुजाऱ्याने दोन,तीन वेळा पुसली
तरी तेथे येत होती. अशा प्रकारची श्रीपाद प्रभूंची अद्भूत लीला होती.
एकदा श्रीपाद प्रभू आणि नरसिंह वर्मा त्यांच्या शेतात गेले होते. शेतात फिरून पहाणी केल्यावर दोघे एका झाडाखाली
विश्रांती घेण्यास बसले. थोड्याच वेळात वर्माना गाढ निद्रा लागली. त्यांनी आपले
शीर श्रीपाद प्रभूंच्या मांडीवर ठेवले होते. तितक्यात तेथे दोन नाग आले श्रीपादानी
त्यांना मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले. थोडा वेळ होताच तेथे अत्यंत मोठ्या आकाराच्या
मुंग्या आल्या त्या चावून वर्मांची झोपमोड होऊ नये म्हणून प्रभुनी त्या सर्व
मुंग्याना मारून टाकले. मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीग जमला होता. थोड्याच
वेळात वर्मा झोपेतून जागे झाले. त्या मेलेल्या मुंग्याना पाहून त्याना द्या आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू
स्मित करून म्हणाले “राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते. हा प्रकृतीचा
नियम आहे. या अद्भूत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भूत जादुगार आहे.” तेवढ्यात
तेथे पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्या
पेक्षा मोठी व कांतिमान मुंगी आली. ती त्या मुंग्यांची राणी होती. तिने मेलेल्या
मुंग्याभोवती एक प्रदिक्षणा घातली आणि आश्चर्य असे की, साऱ्या मेलेल्या मुंग्या
जिवंत झाल्या आणि निघून गेल्या. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले “या मुंग्यांच्या राणीला संजीवनी
शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले.” तितक्यात वर्मांचे लक्ष
मरून पडलेल्या दोन नागांकडे गेले. त्यांना
पहून चकित झाले. ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच
लीला असल्याचे त्यांनी जाणले. श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि
दुसऱ्यास आपला दिव्य पाय लावला. ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभुना एक
प्रदक्षीणा घालून निघून गेले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
*************************************************************************
अध्याय २६ वा
श्रीपाद प्रभूंची शिवय्यावर कृपा
पिठीकापूरम क्षेत्रात नरसिंह वर्मांच्या घरी शिवय्या नांवाचा एक सेवक
होता. एके दिवशी त्याने श्रीपाद प्रभुना पाहिले आणि आश्चर्य असे की तत्काळ
त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा, आहार सोडला. तो असंबद्ध बोलू लागला.
“मी सृष्टी,स्थिती, आणि लय यासाठी कारणी भूत आहे. मीच सर्व सृष्टीचे आदीमुळ आहे.
ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे, माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय
पावणार आहे.” असे बोलणे ऐकून नरसिंह वर्माना शिवय्याची अत्यंत द्या आली. त्यांनी
श्रीपादाना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्यास
स्मशानात घेऊन गेले. त्याच्या बरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची
एक वाळलेली फांदी स्मशानात ठेऊन
शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. यामुळे शीवय्याची त्या विचित्र
मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंह वर्माना हे सर्व अत्यंत आश्चर्यकारक वाटले.
श्रीपाद प्रभू म्हणाले “आजोबा, यात आश्चर्य करण्या सारखे काही नाही. वायसपूर गावात
एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला
परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे? तो सृष्टी, स्थिती, आणि लय यांचा
कारक आहे म्हणे, हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि
स्वतःच्या कर्मामुळे ब्रम्हराक्षस झाला. हा शिवय्या, एका जन्मी त्याचा अल्पऋणी
होता. मी योग काळ कल्पून स्मशानात योगादेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने
वाळलेल्या फांदीचे दहन करून त्या
ब्रम्हराक्षस तत्वातून त्या पंडिताची सुटका केली.
त्या मुळे आपल्या शिवय्याची त्या ब्रम्हराक्षसाच्या पंज्यातून सुटका झाली.”
श्रीपाद प्रभूंचे हे
वक्तव्य ऐकून नरसिंह वर्मांची मती गुंग
झाली.
श्रीपाद प्रभुनी कल्पना केलेल्या शास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या
घटना ते आताच घडवू शकतात. म्हणून योग काळ तेच ठरवितात. दूर घडणारी घटना सुद्धा ते
आपल्या जवळ घडवू शकतात. संघटना सर्व देश कालात ते घडवू शकतात. श्रीपादाना देश काळ
त्यांच्या इच्छेनुसार बदलता येतो. एकदा श्रेष्ठीच्या देवाना नारळ फोडताना स्वत:
श्रीपाद प्रभुनी तो फोडला. त्या नारळाचे तुकडे,तुकडे केले. श्रीपाद म्हणाले
“आजोबा, आज तुमचा मृत्यू योग होता परंतु मी नारळाचे तुकडे, तुकडे करून तो टाळला.” श्रेष्ठींनी
मोठ्या प्रेमाने श्रीपादाना मांडीवर घेवून त्यांचे खूप कोड-कौतुक केले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
**********************************************************************************
अध्याय
२७ वा.
श्रीपाद प्रभूंची शिव योगीवर कृपा.
पिठीकापुरम क्षेत्री एकदा एक विव्दान शिवयोगी आला
होता. तो केवळ करतल भिक्षाच घेत असे. तो आपल्याजवळ झोळी, भांडे, थाळी असे कांहीच
ठेवीत नसे. तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषा
प्रमाणे दिसे. तो एके दिवशी कुक्कटेश्वराच्या मंदिरा जवळ आला. त्याचे
धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला अर्चकानी मंदिरात येऊ दिले
नाही. तो देहाचे भान नसलेला अवधूत होता. तो सतत “ओम नमो शिवाय” या शिव
पंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता. त्याच वेळी
अनेक भक्त गण मंदिरात आले आणि त्यांच्या मागोमाग त्या शिवयोग्याने सुद्धा मंदिरात प्रवेश केला. त्या योग्याबरोबर
दोन नागसर्पहि आत आले. ते पाहून त्या अर्चकाच्या तोंडचे पाणी पळाले. तो शिवयोगी
म्हणाला “अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू
नका. ही शिवाची आभूषणे आहेत. पुत्र ज्या प्रमाणे पित्यास प्रेमभराने अलिंगन देतो,
तसेच हे नाग आपल्या पित्यास, कुक्कटेश्वराला अलिंगन देण्यास आतुर आहेत. ते आपले
स्नेही समान आहेत.आपण आपल्या स्नेह्यांना पाहून घाबरणे अथवा. पळून जाणे महा पाप
आहे. अर्चक स्वामिनी विशेष पूजा केल्याने हे नाग आकर्षित झाले होते. मंदिरातील
अर्चकांमध्ये सूर्यचंद्र शास्त्री नांवाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित अर्चक
श्रीपाद प्रभूंचा भक्त होता. तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक-चमक अत्यंत
सु-स्वरात गात होता. ते मधुर गायन ऐकून तेथे आलेले दोन नाग आपला फणा काढून आनंदाने
डोलू लागले. त्या शिवयोग्यास बरोबर घेवून सूर्यचंद्र शास्त्री बापन्नाचार्युलूच्या
घरी आले.तेथे त्याना उत्तम भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले.
श्रीपाद प्रभुनी त्याना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले. त्या दिव्य दर्शनाने तो
शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली, अशा अवस्थेतच तो
योगी तीन दिवस होता. त्यानंतर श्रीपाद प्रभुनी त्या योग्यास आपल्या हातांनी जेवू घातले. श्रीपाद प्रभू त्या योग्यास म्हणाले “ए मुला, सनातन धर्मात
सांगितल्या प्रमाणे आपले जीवन व्यतीत करुन
संसार तरुन जा.” एवढे बोलून
श्रीपाद प्रभुनी त्या शिव योग्यास निरोप दिला. || श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
श्रीपाद प्रभूंचे चिदम्बर रहस्य
श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्तीसंचार असतो आणि उजव्या भागात
शिवसंचार असतो. या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा निवास असतो. ह्र्दय हे
दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ती ऊर्ध्वचक्राकडे तसेच अधोचक्राकडे
म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. या कारणानेच ते अजून एका दिव्य चैतन्यमय
शरीराने श्रीपद्मावती आणि श्री वेंकटेश स्वामी स्वरूपात आहेत. श्रीपाद प्रभू वाणी
हिरण्यगर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत. परा, पश्यन्ति, मध्यमा, आणि वैखरी स्वरूपी वाणी
देवीचा त्यांच्या जिभेवर वास असतो. वाणी मातेचे दिव्यमानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य
मानस हे अव्दैत स्थितीत असते. वास्तविक पहाता चिदम्बर रहस्य म्हणजे, ते तीन
प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात. त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने
पाहिल्यास स्पर्श नसतो. ते वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिव-पार्वतीचे चैतन्य
शरीर, पद्मावती-वेंकटशाचे चैतन्य शरीर
याना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत, श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक
दिव्य शरीर धारण करतात. याचे वैशिष्टय असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श
नसतो.हीच प्रभूंची योगमाया, वैष्णवीमाया आणि हेच त्यांचे चिदम्बर रहस्य.
श्रीपादाना व्दैत, विशिष्ठ अव्दैत, अव्दैत आणि या
सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल कारण योगमाया अगाध आहे
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय २९ वा
श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील
कल्पनातीत दिव्य लीला.
श्रीपाद प्रभुनी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त याना पंचदेव पहाड या स्थानी
एक गवताची कुटी बांधा असा आदेश दिला होता. परंतु तो पहाडाचा प्रदेश त्या
दोघांच्याही परिचयाचा नव्हता. या शिवाय त्याच्याकडे कुटी बांधण्यास लागणारे
साहित्य गवत, बांबू, दोऱ्या आदी कांहीच नव्हते. ते दोघे काय करावे या विचारात फिरत
असताना एका शेतात गेले. तेथील मालकाने त्या दोघाना बोलावून स्वागत केले आणि भोजन दिले. त्या शेताच्या मालकाचे नांव
विरुपाक्ष असे होते. त्या शूद्राच्या घरचे
जेवण घ्यावे का नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकाऊन गेली. त्यावेळी तो शेताचा मालक
चिडून म्हणाला “आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हास
शूद्राचे जेवण घ्यावे का का नाही अशी विचित्र शंका का आली? त्या मालकाच्या
दृष्टीने ते दोघे चोर ठरले होते. सत्य
परिस्थिती सांगण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला परंतु तो मालक कांही ऐकण्यास तयारच
नव्हता. त्याने शंकर भट्ट आणि धर्म गुप्त याना, थोडा वेळ, दोरीने एका झाडास बांधून
ठेवले व नंतर त्यांना त्या बंधांतून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत
करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली. सायंकाळ पर्यंत
त्या गोशालेचे काम पूर्ण झाले. विरुपाक्षाने या दोघाना सायंकाळचे भोजन सुद्धा दिले
आणि रात्री तेथेच झोपण्याचा आदेश दिला. त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत
श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या
दिव्य लीलांचे स्मरण केले आणि नंतर निद्रिस्थ झाले. सकाळी सूर्याची कोवळी
किरणे अंगावर पडताच ते दोघे उटून बसले. आजूबाजूस
पाहिले तेथे गायी नव्हत्या काम करणारे मजूर नव्हते परंतु गोशाला मात्र
होती. आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले
की ती जागा त्यांनी किती किंमतीस घेतली त्या दोघांनी घडलेला वृतांत त्याना सांगीतला. त्यावेळी त्या
शेतकऱ्यांनी या दोघाना वेड्यातच काढले.
दुसरे दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरुपाक्ष याने
निर्माण केलेल्या गोशाळेत ध्यानस्थ बसले होते. त्याच वेळी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त
दोघेही तेथे पोचले. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ
करण्याचा तो मंगल समय होता. बघावे ते नवलच| श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत
तेज:पुंज होत होता. ते महातेज चारी दिशाना व्यापू लागले. त्यावेळी प्रभूंचे शरीर
अत्यंत तेजोमय मूर्ती प्रमाणे दिसत होते. थोड्याच वेळात प्रभू गोशालेतून बाहेर
आले. आज त्यांची नेहमी प्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडत नव्हती. त्यांची पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती. त्यांनी
सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे
वाढतच होते. थोड्याच वेळात सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्या
मध्ये विलीन झाले. त्या सूर्य बिंबात सर्वाना एका दिव्य शिशूचे दर्शन झाले. ते
बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीस लागताच कोणालाच कांही
दिसेनासे झाले. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे
पहिले, त्यावेळी सर्वाना पुन्हा सारे दिसू लागले. श्रीपाद प्रभुनी सर्वाना
सूर्याकडे पाहण्यास सांगितले. त्या लालबुंद सूर्यात सर्वाना एक अत्यंत सुंदर,
दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली. ती बालिका
हास्य मुद्रेने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच पुनरपी सर्वांची दृष्टी
गेली. त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण
नजरेने सर्वांकडे पहातच सर्वांना पूर्वी प्रमाणे सारे दिसू लागले. त्या बालिकेस
श्रीपाद प्रभुनी अत्यंत प्रेमाने, आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे
वय सोळा वर्षाचे आणि त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचे वय तीन
वर्षाचे होते.तिने अंगावर रेशमी भरजरी वस्त्र परिधान केले असून त्याना साजेल अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती. ती बालिका आणि
श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य, भय
आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होते त्याचवेळी शंकर भट्टच्या मनांत शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे
ना? ती मनांतील भावना ओळखून श्रीपाद प्रभू
म्हणाले “अरे शंकर भट्टा| हे कांही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे. ही माझी
दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पनेनेच भूमी, आकाश होते. माझ्या संकल्पानुसार
ब्रम्हा सृष्टीची निर्मिती करतात. मी ब्रम्हस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणा
आहे. या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. त्या
विष्णुना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी भिन्न,
भिन्न आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे. या देवीला प्रेरणा देणारी “महा
सरस्वती” देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची
समृद्धी, धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचेच स्वरूप आहे. महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या
स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्तीस्वरूप
“कालिका” स्वरूपच आहे. “महाकाली” ही
काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे
शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूपच
होय. महासरस्वती, महालक्ष्मी, आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य
मातृस्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा अविर्भाव.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “ हे
शंकर भट्टा| माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र
येऊन तादात्म्य स्थिती धारण करून, या तिन्हीचा आधार असणारी स्त्री शक्ती रुपिणी अनघा, हिला माझ्या वाम भागात धारण
केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे.”
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “अरे शंकर भट्टा| या पंचदेव पहाडावर
घडलेल्या लीलांचे, पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरीत्रामृतात
कर. ते भविष्य काळातील भक्तांना स्फूर्तिदायक ठरेल.नाना शंका, कुशंकाचे त्यात
समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथांव्दारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल.” या वक्तव्या नंतर श्रीपाद
प्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला.तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य
तेजाने झळकू लागले आणि त्यामधून श्री पद्मावतीदेवीचा आणि श्री वेंकटेश्वर
स्वामींचा अविर्भाव झाला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय
३० वा.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य उपदेश
कुरुगड्डी यथे श्रीपाद प्रभूंच्या सत्संगासाठी अनेक भक्त मंडळी बसली
होती. या सर्व साधकाना उद्देशून प्रभू म्हणाले “ हे श्रोतेहो, अनन्य भावाने मला
शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण
करतो. हा देश काळ माझ्या हातातील चेंडू प्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या, भूत
काळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देश कालाचा
शास्ताच आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसार तुम्हाला
माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून, तुमच्या अंतरंगातील
अंतर्यामीरूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशाप्रमाणे
कर्मांचे पालम केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवन्मुक्त करीन. केवळ
माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो त्यामुळे मीच सरस्वती रुपाने प्रसद्धि
पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकशीपू सारखा असेल. त्यांच्या समस्या, भाव आणि
आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्याना प्रकृती
विज्ञानातील अनेक संशोधनाना यश मिळून हिरण्यकाशीपू सारखे वरदानही सृष्टी मातेकडून
मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप, निरपराध भक्तांचे संरक्षणार्थ
नृसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी
“नृसिंह सरस्वती” या नाम रुपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत
प्रसिद्ध होईन.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी सर्व
साधकांना सुद्धा ध्यानात जाण्यास सांगितले
|| श्रीपाद
राजम शरणं प्रपद्ये.||
अध्याय ३१ वा.
दश महाविद्यांचे श्रीपाद प्रभुनी केलेले वर्णन.
एकदा शंकर भट्टाने श्रीपाद प्रभुना दश महाविद्येबद्दल माहिती सांगावी
अशी प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू
म्हणाले”अरे शंकर भट्टा| श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्व काळात
हयग्रीवांच्या कृपा प्रसादानेच अगस्त्य महामुनिना श्री विद्येचे ज्ञान झाले होते.
त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली. लोपमुद्रा देवीने या
विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्ती ऋषीना सांगीतला. अशा प्रकारे ते
उभयता एकमेकांचे गुरु झाले” देवीच्या
दशमहाविद्येबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “काली” हे दशमहाविद्येतील
प्रथम रूप आहे. “महाकाली” ही समस्त विद्यांची आदी देवता आहे. दशमहाविद्येतील दुसरे
रूप ‘तारा’ देवीचे आहे. ही माता मोक्षदायनि, सर्व दुःखापासून तारण करणारी आहे.
त्यामुळे हिचे तारा हे नांव प्रसिद्ध झाले. दशमहाविद्येतील तिसरे रूप “छिन्नमस्ता
देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. हिरण्यकशीपू आदि दानव या देवीचे उपासक
होते. दशमहाविद्येतील चवथे रूप “षोडशीमहेश्वरीचे” आहे. या देवीचे हृदय
लोण्याप्रमाणे अत्यंत मउ असून ती अत्यंत दयावान आहे. दशमहाविद्येतील पाचवे रूप
“भुवनेश्वरी” देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. दशमहाविद्येतील सहावे रूप “त्रिपुर भैरवी” चे
आहे. महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्ती रुपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात.
दशमहाविद्येतील सातवे रूप “धुम्रावती” देवीचे आहे. ही उग्रताराच आहे. हिला शरण
जाणाऱ्या साधकांची सर्व संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा प्राप्त
होते. दशमहाविद्येतील आठवे रूप “बगलामुखी” देवीचे आहे. ऐहिक, पारलौकिक, देश, समाजाचे
अरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते. दशमहाविद्येतील नवम रूप
“मातंगी” मातेचेच आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस
नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. दशमहाविद्येतील दहावे रूप “कमलालया” मातेचे आहे.ही सुख,
समृद्धी प्रदान करणारी देवता आहे.
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि
तिचा प्रभू अनघ (श्री दत्तप्रभू) यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती
होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा, अर्चा
करावी. या तुमच्या आराधानेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले “अरे
शंकर भट्टा| तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून, येणाऱ्या
शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस “अनघाष्टमिचे” व्रत करून अकरा गृहस्थाना जेवण द्यावे
अथवा त्याना पुरेल एवढी शिधासामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने
इच्छित फळ प्राप्ती निश्चित होते.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “श्री चरित्रामृत
हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे.
तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात
प्रवाहित होते. तुमच्या न कळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमच्या धर्मबद्ध
अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात
(देवघरात) नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात. ही स्पंदने
दुष्टशक्तीना, दुर्दैव आणणाऱ्या शक्तीना पिटाळून टाकतात.” श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या
व्यक्तीचे पुण्यफळ धर्म देवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. अशा रीतीने
श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो. अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. हा अक्षरसत्य
ग्रंथ आहे. याचे हा ग्रंथच स्वत: प्रमाण आहे. जिज्ञासु लोक याची परीक्षा घेवू
शकतात. मनांत कांही इच्छा ठेऊन या ग्रंथाचे पारायण केले तरी चालेल. आपले स्वतःचे
जीवन शुद्ध करण्या साठी अत्यंत श्रद्धा भक्तीभावाने या ग्रंथाचे पठण करावे.” एवढे
सांगून श्रीपाद प्रभुनी आपल्या वाणीस विराम दिला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
अध्याय ३२ वा
नवनाथांचे वर्णन
श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांना स्पर्श करून श्री शंकर भट्टाने प्रश्न केला
“महाप्रभू| नवनाथ या नांवाने प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्रीदत्त प्रभूंचे
अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्या विषयी सविस्तर माहिती आम्हास सांगावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना”. श्री नवनाथांचे नांव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या
दोन्ही नेत्रातून अमृत वृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे
वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य ओसंडून वाहात होते. ते अत्यंत आनंदाने
म्हणाले “श्रोत्यानो| मछेन्द्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भर्तरी,
चर्पट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. यांच्या
स्मरण मात्रानेच, शुभफल सिद्ध होते. श्रीदत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्या
भक्तांवर अपार असते.” श्रीपाद प्रभू पुढे
म्हणाले चक्रवर्ती ऋषभ महाराजाना शंभर पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने
जन्मलेल्या नउ जणाना नव नारायण असे असे म्हणतात. त्यांची नांवे १)कवी २)हरी,
३)अन्तरिक्ष ४) प्रबुद्ध ५)पिप्पलायन, ६) आविर्होत्र ७) द्रुमिल
८) चमस आणि ९) करभाजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये असलेले सिद्ध
पुरुष होते.. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्म संस्थापनार्थ नवनाथ या नाम रुपाने पृथ्वीवर
पुन्हा एकदा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा “मच्छेंद्रनाथ” या नांवाने
जन्मला.”अन्तरिक्ष” याने “जालंदर” या नांवाने जन्म घेतला. यांच्या शिष्य रुपाने
प्रबुद्ध “कानिफा” या नांवाने जन्मला. पिप्पलायन “चर्पटनाथ” नांवाने अवतरित झाला
.अविर्होत्र हा “नागेशनाथ” या नामरुपाने अवतरित झाला. द्रुमिल याने “भर्तरीनाथ” या
नांवाने जन्म घेतला. चमस हा “रेवणनाथ” या रुपात अवतरित झाला आणि करभाजन “गहनिनाथ”
या नांवाने जन्मला.” या नवनाथांच्या जन्माच्या घटना सुद्धा मोठ्या अद्भूत आणि
आश्चर्यकारक आहेत. या बद्दल सांगताना श्रीपाद प्रभू म्हणाले “श्रोत्यानो| उपरिचर
नांवाच्या एका वसूने उर्वशीला पाहिले आणि तो तिच्या रूप,सौंदर्यावर अत्यंत मोहित
झाला.त्यावेळी त्याचे वीर्य द्रवीत होऊन यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने
गिळले. त्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला भगवान
शंकरांनी क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले होते.त्या भस्मामध्ये
मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथाने ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी त्या यज्ञकुंडातून जालंदर नाथाचा अविर्भाव झाला.
नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रम्हवीर्या पासून रेवण सिद्धाचा जन्म झाला. एकदा
ब्रम्हवीर्य एका नागाच्या शिरावर पडले. ते नागिणीने खाऊन टाकले. त्या योगाने ती
नागीण गर्भवती झाली. त्याच वेळी जनमेजय राजा सर्व नाग,सर्पाना नष्ट करण्या साठी सर्प याग करीत होता.
ब्राम्हणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. यावेळी
त्या नागिणीने आपल्या अंड्यास एका मोठ्या
वडाच्या झाडाच्या बिळात सुरक्षीत ठेवून ती नागीण निघून गेली. यथा समयी त्या
अंडजातून “वटसिद्ध नागनाथ” यांचा जन्म झाला. मच्छेंद्रनाथ धर्मप्रचारासाठी संचार
करीत असताना, एके गावी त्यांचा मुक्काम होता. तेथील लोक त्यांच्या दर्शनास येऊ
लागले. त्यांत एका अपत्य रहित स्त्रीने
मच्छेंद्र नाथाना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु त्या स्त्रीने ते
दिव्य भस्म अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा
शक्तीसंपन्नतेने त्या मधून गोरक्षनाथाचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाह समयी
पौरोहित्य करणारे ब्रम्हदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि
त्यांचा विर्यस्त्राव झाला. या कृत्याची त्याना लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य
आपल्या मांडीस पुसून टाकले. त्या क्षणीच
त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्य नांवाचे साठ हजार ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला
होता, तो कचरा समजून भागीरथी नदीत टाकून दिला. तो कचरा नदीतील गाळात अडकून तेथेच
राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चर्पटनाथांचा जन्म झाला. कोलिक
मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर
ठेवले. त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले. ते महर्षीना कळले. त्यांनी ते
पात्र तेथेच सांभाळून ठेवले. त्या पात्रातूनच एका नवनाथांचा जन्म झाला. त्यांचे
नांव “भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील पर्वतावरील एका घनदाट अरण्यात एक हत्तीण झोपली
होती. एकदा ब्रम्हदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य त्या निजलेल्या
हत्तीणीच्या कानात पडले. त्या कानातून प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म
घेतला. कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नांव “कर्ण कनिफा” असे पडले. गोरक्षकाने
एकदा संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजन यास संजीवनी मंत्राच्या सहाय्याने,
जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनिनाथ या
नांवाने अवतार धारण केला. श्रीकृष्णांच्या
आज्ञेनुसार या नव नारायणांनी आपले स्थूल शरीर मंदराचल पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून
ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ या नामरुपाने
पृथ्वीवर जन्म घेतला. धर्म सुत्राना अनुसरून अंशअवताराना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूल तत्वातूनच येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे
अंशांवताराचे कार्य असते. हे मूलतत्वाकडून
अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अवतारात राग, लोभ. मद, मत्सर असे मानवी
दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्य समर्थता अंशांवतारात सुद्धा आढळते. या
कारणाने अंशांवतार आणि पूर्णावतार यात कांही फरक नसतो.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू
मौन झाले.
रमणी
आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपाद प्रभूंनी स्वतःच करविला.
श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार शंकर भट्ट आणि धर्मगुप्त दोघे
कुरुगड्डीहून पिठीकापुरम जाण्यास निघाले. कृष्णा नदी ओलांडून ते पंचदेव पहाड गावी
आले. येथे त्यांनी अल्पोपहार करुन पुढील प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या
शेतातील पायवाटेने जात असताना त्या शेताच्या मालकाने त्याना बोलाउन त्यांचे स्वागत
केले आणि खाण्यास मधुर फळे दिली. त्याचे नांव नरसिंहरायडू असे होते. त्याने या
दोघाना आग्रहाने एक दिवस त्याच्या शेतातील घरात ठेऊन घेतले. त्याने आपला विवाह
त्याच्या मामाची कन्या रमणी बरोबर श्रीपाद प्रभुनी कसा लाऊन दिला याचा वृतांत
सांगितला. तो लहान असतानाच त्याचे माता, पिता स्वर्गवासी
झाले होते, त्यामुळे तो आपल्या मामाकडेच शिक्षणासाठी रहिला होता. त्याचे मामा
चांगले होते परंतु मामी मात्र तापट स्वभावाची होती. त्यास घरचे सर्व काम करुन शेतातील काम सुद्धा करावे लागे. इतके काम
केल्यानंतर सुद्धा त्याची मामी त्याला खाण्यास शिळे पाके देत असे. मामाची एक कन्या
होती तिचे नांव रमणी असे होते. ती कधी कधी मामीच्या न कळत चांगले चांगले पदार्थ
नरसिंहला आणून देत असे. रमणी दिसावयास सुंदर होती. त्यामुळे त्यांच्या कुलातील
अनेक युवक तिच्याशी लग्न करण्याचे इच्छुक होते परंतु रमणीला मात्र नरसिंहच आवडत
होता. एकदा त्याच्या गावात एक ढोंगी साधू आला. त्याला भूत,भविष्याचे उत्तम ज्ञान
असल्याचा त्या गावात खूप प्रचार करण्यात आला होता. त्या ढोंगी साधूने नरसिंहाच्या
मामीवर जणू मोहिनीच घातली होती. त्याने घरी येऊन मामीस सांगितले की त्याच्या घरात
कालीपूजा केल्यास घरातील एका ठिकाणी अपार धन संचय मिळेल. या कथनावर भुलून मामीने
त्या साधुस काली पूजा करण्यास सांगितले.
त्याने रमणी अत्यंत भक्ती भावाने पूजा करीत असलेली श्रीकृष्णाची मूर्ती फेकून
देण्यास सांगितली. मामीने तसेच केले. बिचारी रमणी तळमळत राहिली. त्या ढोंगी साधूने
पूजेस सुरवात केली आणि कोंबड्यांचा बळी दिला. त्या रक्ताने देवघर बघवेनासे झाले
होते. त्याने घरात माणसाची कवटी आणि स्मशान सामुग्री सुद्धा आणून ठेवली होती. त्या
साधुस वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या सहायाने रमणीचे शील हरण करण्याचा
त्याचा दुष्ट हेतू होता. त्याने तसा प्रयत्न सुद्धा केला परंतु रमणीने तो जवळ
येताच त्याच्या डोक्यावर एका वजनदार वस्तूने प्रहार केला आणि आपले रक्षण केले. दुसरे दिवशी सकाळी एक गरीब ब्राम्हण त्यांच्या
घरी भिक्षेसाठी आला. त्याचे मुखारविंद अत्यंत शांत आणि तेज:पुंज होते. त्याला
भिक्षा देण्यास घरात कांहीच नाही असे मामीने बाहेर येऊन सांगितले. तितक्यात तो
ढोंगी साधू स्मशानातून मनुष्याचे कपाल
घेऊन आला. त्याच वेळी त्याना घरात
एक दिव्य प्रकाश दिसला आणि भिक्षेस आलेला तो ब्राम्हण अदृश्य झाला. त्या दिव्य
प्रकाशाने ढोंगी साधूच्या अंगाची भयंकर आग
होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर
पडताच ती पूर्वीसारखी स्वस्थ झाली. नरसिंहाचे पूर्वीचे दुर्बलत्व जाऊन त्यास अत्यंत
बलवान झाल्याची अनुभूती आली. त्या ढोंगी साधूच्या तोंडातून सारख्या रक्त धारा वाहू
लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा
नाश झाल्याने तो पळून गेला. त्या तेजोमय प्रकाशाचे एका मानवात रुपांतर झाले.ते
आर्तत्राण परायण, समस्त देवी,देवता स्वरूप, दिव्य,भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद
प्रभू होते. ते म्हणाले “काली माता मानवातील कामक्रोधादी राक्षसांचा नाश करते. ती कोंबड्या,
बकऱ्या आदी प्राण्यांचे बळी कधीच मागत नाही.” यानंतर घराची शुद्धी करण्यात आली.
नरसिंह रायडू म्हणाले “ अहो शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंनी माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ते केला. त्यावेळी रमणी बारा
वर्षाची होती. त्यांनी आम्हाला अक्षदा दिल्या होत्या आणि सांगितले होते की शंकर
भट्ट आणि धर्मगुप्त नांवाचे दोन भक्त येतील त्याना थोड्या अक्षदा दे.” या आदेशा
प्रमाणे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांनी त्या परम पावन अक्षदा नरसिंह रायडू
कडून घेतल्या आणि त्याचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासास प्रारंभ केला.
********************************************************************************************
शरभेश्वराचा
वृतांत.
शंकर भट्ट आणि धर्मगुप्त दोघे कधी बैलगाडीने, तर कधी घोडागाडीने तर
कधी पायी असा प्रवास करीत चालले होते. मार्गात त्यांचे श्रीपाद प्रभूंच्या
भक्तमंडळीकडून होणारे स्वागत स्वीकारणे चालूच होते. ही परोक्ष रुपाने प्रभूंची
लीलाच होती. जाता,जाता ते एका गावी पोचले. त्या गावात एका ब्राम्हणाच्या घरातील सर्व सामान, एक व्यक्ती,बाहेर फेकत असल्याचे
त्यांना दिसले. त्या घरातील ब्राम्हणाने सावकाराकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती. परंतू
ती रक्कम परत करण्याची मुद्दत संपल्यावर
सुद्धा तो ब्राम्हण ते ऋण परत करू शकला नव्हता. त्यामुळे सावकार त्याचे सामान
बाहेर फेकीत होता. ब्राम्हण, त्याची पत्नी आणि मुले उदास होऊन बघत होते. गावातील लोक तमाशा प्रमाणे
बघत उभे होते. कोणीही त्या ब्राम्हणाला अजून थोडी मुद्दत द्या असे साहस करुन म्हणाला नाही. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघाना त्या ब्राम्हणाची दया आली परंतु
सहाय्य करावे तर त्यांच्या कडे धन नव्हते. परंतु शंकर भट्ट साहस करून त्या
सावकारास म्हणाले “ शेठजी या गरीब दुबळ्या ब्राम्हणावर द्या करुन अजून दोन महिन्याचा अवधी त्याला द्यावा. श्रीपाद
प्रभूंच्या कृपेने त्याचे कष्ट दूर होतील. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी
आहे.” यावर तो सावकार म्हणाला “ बरे |
तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला
अजून दोन महिन्याचा अवधी देतो. माझे धन देईपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कोठे जाऊ
नये. जर याने माझे कर्ज ठरलेल्या अवधीत परत केले नाही तर मी याचे घर स्वाधीन करुन घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघाना सुद्धा न्यायालयात नेईन. त्यावेळी
न्यायाधीश जी शिक्षा देतील त्यास तुम्ही दोघे तितकेच पात्र व्हाल.” इतके बोलून तो
सावकार निघून गेला आणि ब्राम्हणाने आपले सामान घरात नेऊन ठेवले. त्याने शंकर भट्ट
आणि धर्मगुप्ताचे आभार मानले आणि त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्या दिवशी
सर्वानि मिळून “ श्रीपादराजम शरणं
प्रपद्ये” हा जप मोठ्या सुरात केला. शंकर
भट्ट हा ब्राम्हण एका महापुरुषाचा शिष्य आहे आणि तो त्याच्या दैवी शक्तीनेच त्या
गरीब ब्राम्हणाचे कर्ज फेडण्यास सिद्ध झाला आहे. असा प्रचार गावभर झाला होता. शंकर
भट्ट मात्र मनातून भयभीत झाले होते. परंतु त्याना श्रीपाद प्रभूंच्या सहायतेवर धृढ
विश्वास होता. त्या ग्रामात शभेश्वर शास्त्री नावाचे एक पंडित आणि मोठे
शास्त्रवेत्ता रहात होते. त्यांच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या
आधाराने ते भूत, भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असत. त्या गावातच शास्त्रींची
एक बहिण रहात होती. एकदा तिचे पतीदेव कामासाठी दूरदेशी गेले होते. त्यांना जाऊन
बरेच दिवस झाले होते आणि त्यांचा कांही समाचार कळला नव्हता. त्यामुळे ती काळजीत
होती. अशा अवस्थेत असताना तिला एके दिवशी प्रात:काळी एक स्वप्न पडले. त्या
स्वप्नात तिला आपल्या पतीचे निधन झाल्याचे दिसले. या स्वप्ना मुळे ती अत्यंत
घाबरून गेली आणि तिने या बद्दल आपला भाऊ शरभेश्वर यास विचारले. त्याने या बद्दल
त्या प्रेतात्म्यास विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले “तिचा पती देशांतरी
गेलेला असताना मध्येच मार्गात चोरांनी त्याला घेरले आणि सर्व द्रव्य लुबाडून
त्याला मारून टाकले.” आपल्या भावाकडून हा समाचार ऐकून ती अत्यंत दुःखी होऊन विलाप
करू लागली. त्यावेळी कांही लोकांनी तिला धीर देऊन सांगितले की त्यांच्या गावात
शंकर भट्ट नांवाचे एक महापंडित आले आहेत.त्याना घटना, घटीताचे उत्तम ज्ञान असून
श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय ते जाणून
घ्यावे. तिला शंकर भट्टाकडून सत्य जाणून घ्यावे अशी मनोमन इच्छा झाली. ती त्यांच्याकडे येऊन आपली सर्व कर्म कहाणी सांगून आर्त स्वरात म्हणू
लागली “भाऊ माझ्या मांगल्याचे रक्षण करा” शंकर भट्टाचे हृदय तिची कहाणी ऐकून
पाणी-पाणी झाले. त्याना श्रीपाद प्रभूंच्या, त्या शेतकऱ्याने दिलेल्या
मंत्राक्षदांची आठवण झाली आणि त्यांच्यात एका दिव्यस्फूर्तीचा संचार झाला. त्या
स्त्रीला बोलावून ते म्हणाले “बाई | ह्या मंत्राक्षदा घे आणि तुमच्या देवघरात
पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षीत ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल. हे सत्य
आहे त्रिवार सत्य आहे.” हे वर्तमान कांही लोकांनी शरभेश्वर शास्त्रीना
सांगितले. त्यांना आपल्या बहिणीचा खूप राग आला तिने मात्र देवाजवळ संकल्प केला
“माझा पती सुखरूप घरी परत आल्यास, मी त्या गरीब ब्राम्हणाचे देणे तर देईनच शिवाय
शंकर भट्टाना आपला गुरु करून श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आराधना करीन.” अशा प्रकारे
तीन दिवस गेले. या तीन दिवसात शेतकऱ्यांनी
आणलेल्या शिध्याने स्वयपाक करुन त्या गरीब ब्राम्हणाच्या पत्नीने सर्वाना
यथेच्च जेऊ घातले. चौथ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा पती देशाटन
करुन सुखरूप परत आला. तिच्या आनंदाला पारावारच
नव्हता. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एका
मल्लाने मध्ये पडून त्याचे रक्षण केले होते. “त्या मंत्राक्षादामुळे आज तिचे सौभाग्य टिकले” असा तिचा धृढ विश्वास झाला
होता. खरोखरी श्रीपाद प्रभूंचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शंकर भट्टाचे ज्योतिष्य
श्रीपाद प्रभूंच्या कृपेने खरे झाल्यामुळे त्या गरीब ब्राम्हणाचे ऋण शरभेश्वर
शास्त्रीनि बहिणीच्या संकल्पानुसार फेडले
होते. ही सर्व श्रीपाद प्रभुंचीच लीला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
*****************************************************************************************
अध्याय ३३ वा
पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा
पिठीकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता. कुक्कटेश्वराच्या
मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनास सर्व
जातीचे लोक येत असत. पुराणीकाच्या भोजनाची सोय बापन्नाचार्युलू यांचे घरी केली
होती. पुराण कथन करण्यापूर्वी, तो पुराणिक लक्ष्मी गवळणीने आणलेले दुध घेत असे.
श्रीपाद प्रभू सर्व हृदयांतर्यामी
असल्याने त्याना या पंडिताबद्दल सर्व कांही ज्ञात होते. हा पुराणिक एक महान योगी
सुद्धा होता. तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे
ओळखू शकत होता. त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे. दुध देणाऱ्या
लक्ष्मीस तो योगदृष्टीने पहात असे. लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्याला स्वतःचा
आत्मा दिसत असे. लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राम्हण जमीनदाराच्या घरी बाल
रूपात जन्माला होता. त्या पंडिताने
योगशक्तीने आपले शक्तीरूप कसे आहे ते पाहिले. त्याचे मूळ रूप स्त्रीसमान लक्ष्मीशी
निगडीत होते हे त्यास कळले. त्याचे स्वरूप स्त्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पहिले. थोड्याच
दिवसात आपले कर्मशेष पूर्ण होणार असल्याचे
त्यास जाणवले. पिठीकापुरम मधील कर्मऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने
पुराणीकाचा जन्म घेतला होता. लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूळतत्व पुराण पंडितात
विलीन झाले होते. हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभुना माहित होता. ते त्या पुराण
पंडिताला म्हणाले “ अरे पंडिता| ही लक्ष्मी निरागस आहे. ती कांही दिवसातच आपली
जीवन यात्रा संपविणार आहे. तू ज्ञानरूप ब्राम्हण होशील किंवा अज्ञान रुपात गवळी
होशील. त्या तुझ्या रुपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट, सुखात साथ देईल. तिच्या
प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे. ही गवळीणीच्या रुपात
असलेली ब्राम्हण स्त्री आहे. तू ब्राम्हण रूपातील गवळी आहेस. तुमचे कर्मसंबंध मला
उत्तम रीतीने माहीत आहेत. भविष्य काळात ब्राम्हणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला
पद्मावती स्वरूप देवी मानून मी तिला सुवर्ण टिळक लाऊन आशीर्वाद देईन. तिला मांगल्य
प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षीत ठेवीन. पुढील जन्मात तुम्ही आदर्श दम्पती व्हाल
आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांच्या
लीला अद्भूत आणि अगम्या असतात हेच खरे.
|| श्रीपाद राजम शरणं
प्रपद्ये.||
*****************************************************************************
अध्याय ३४ वा
नागेंद्र शास्त्रीना श्रीपाद प्रभूंच्या
पादुकांची प्राप्ती.
नागेंद्र शास्त्री नांवाचे एक
मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण असे
ब्राम्हण श्रीपाद प्रभूंचे भक्त होते. त्यांच्या घरात अनेक नाग, साप निर्भयपणे
फिरत असत. ते कोणालाही चावत नसत. शास्त्री त्या नाग, सापांना आपल्या अपत्या
प्रमाणे सांभाळीत. ते “कालनाग” नांवाच्या
मण्याच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षापासून
नागोपासाना करीत होते. ते पंधरा वर्षाचे असताना पिठीकापुरम क्षेत्री गेले होते. त्यांनी
तेथील कुक्कटेश्वराच्या मंदिराचे आणि
पादगया तीर्थाचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी स्वयंभु दत्तात्रेयांच्या नयन मनोहर
मूर्तीचे दशन घेतले. तेथे त्याना एका कालनागाचे
दर्शन झाले. त्याच्या फणीवर एक मणी होता. या मण्यामुळे मंगळ ग्रहापासून
येणारऱ्या अशुभ स्पंदनांचे निवारण होते आणि शुभप्रद स्पंदनांची निर्मिती होते.
पिठापुरी गेले असताना एकदा शास्त्री, नरसिंह वर्मा यांच्या घराजवळून जात होते.
श्रीपाद प्रभू त्यावेळी त्यांच्या अंगणात खेळत होते. नागेंद्रशास्त्री श्रीपाद
प्रभूंच्या दर्शनासाठी वर्मांच्या घरात गेले. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड
होते. त्याला भरपूर पाणी मिळावे यासाठी वर्मा जमीन उकरून त्याला आळे करीत होते. ते
करीत असताना त्यांच्या हातास श्रीपाद प्रभूंच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या. त्या त्यांनी बाहेर
काढून प्रथम शुद्ध जलाने नंतर नारळाच्या पाण्याने धुवून स्वच्छ केल्या. त्या बारा
वर्षाच्या मुलाच्या, सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या. वर्मांनी
त्या श्रीपाद प्रभूंच्या चरणकमला जवळ ठेवल्या. त्या पादुकांची पूजा करण्यास वर्मा
अत्यंत उत्सुक होते. परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प कांही निराळाच होता. त्यांनी
त्या पादुकाना मोठ्या प्रेमाने कुरुवाळले
आणि नागेंद्रशास्त्रीस बोलावून म्हणाले “
नागेंद्र शास्त्री| तू एका पिठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर. तू
“कालनागा” जवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसांपासून वाट पहात होतास. मी
तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनाग ज्या
दिव्य पाद्पद्मांची आराधना करून त्यांच्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा
करतात ते महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुका माझ्याच आहेत. त्यांचीच तू नित्य
नेमाने पूजा अर्चना करीत जा. आधी,व्याधींनी पिडीत जन तुझ्याकडे येतील त्याना तू या
पादुकांचे तीर्थ दे. ते प्राशन करताच त्यांची त्या व्याधीतून सुटका होऊन ते त्वरित
स्वस्थ होतील.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “अहो नागेंद्रशास्त्री, माझ्या या
वचनांचे तुम्ही पालन करा आणि नागशास्त्र विद्येचा उपयोग केवळ लोक कल्याणासाठीच
करा. कालांतराने शंकरभट्ट आणि धर्मगुप्त हे दोघे तुझ्याजवळ येतील आणि या दिव्य
पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्य मणी नक्की प्राप्त होईल.तोपर्यंत तू माझ्या या
दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले.
नागेंद्र शास्त्रींनी प्रभुना साष्टांग दंडवत घातला आणि अति आनंदाने त्यांचा निरोप
घेतला.
**************************************************************************
श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा वृतांत.
शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांनी श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार त्यांच्या
जवळील तो कालनाग मणी नागेंद्र शास्त्रीना दिला आणि त्याचे कडून त्या दिव्य पादुका
घेतल्या. नंतर ते दोघे अनेक प्रकारच्या वहानात
प्रवास करून त्रिपुरांतक क्षेत्री येऊन पोचले. त्यांच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या
दिव्य पादुका असल्याने त्याना प्रवास करीत असताना श्रीपाद प्रभूंचे चरण सुद्धा
त्यांच्याबरोबर चालत असल्याचा भास होत
होता. ते बोलत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखाने बोलत असल्याचे त्यांना जाणवे.
ते भोजन करीत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखव्दारे भोजन करीत असल्याचा अनुभव येत होता. त्या
उभयतांच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव
श्री प्रभूंचा स्पर्श नसतानाही अनुभवास येत होता. अशा प्रकारची लीला शंकर भट्टाने पूर्वी कधीच पाहिली अथवा ऐकली
नव्हती. त्रीपुरांतकेश्वरच्या मंदिराच्या अर्चक स्वामींचे नांव भास्कर
शास्त्री असे होते. त्यांनी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त याना मोठ्या आग्रहाने
त्यांच्या घरी ठेवून घेतले. त्या पादुका
भास्कर शास्त्रींच्या देव मंदिरात ठेवल्या त्यावेळी काय आश्चर्य घडले त्या
दिव्य पादुकांमधून श्रीपाद प्रभू अत्यंत
मधुर अशा आवाजात म्हणाले “बाळानो तुम्ही केवढे धन्य आहात. भास्कर शास्त्रींच्या
मंत्रोपासनेच्या बलाने या ताम्र धातूच्या पादुका कांही वर्षानंतर सुवर्ण रूपात
परिवर्तीत होतील. हिरण्य लोकातील कांही महापुरुषांनी
या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना
अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या. त्या पादुका घालून मी कारण
लोकात येवून येथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो. त्या नंतर हिरण्य लोकात जाऊन
तेथील महापुरुषाना आशीर्वाद देतो. त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते.
या नंतर या पादुकांची, अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन, माझ्या
जन्म स्थानी पिठापुरम क्षेत्री समंत्र
पूजा अर्चा करून जमिनीच्या तीनशे फूट खोलवर प्रतिष्ठापना करतील. तेथे स्वर्णमय
कांती असलेले दिव्य नाग प्रतिदिन यांची अर्चना करतील. यांच्या समवेत चौषष्ट हजार
योगिली असतील. त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील. मी तेथे ऋषी
संघटनेबरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून सर्वाना सत्संगाचा लाभ घडविन. या भूमीला
सलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पिठीकापूरम आहे. हे
योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभविता येते.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “माझ्या
सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होतील त्या ठिकाणीच पिठीकापुरम
प्रतिष्ठापित होईल या साठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात रहा. माझ्या संस्थानात पादुकांच्या
दर्शनासाठी भक्तजनांची मुंग्यांसारखी रांग लागेल.” ही देववाणी ऐकून शंकर भट्ट आणि
धर्मगुप्त अत्यंत आश्चर्यचकित झाले,
त्यांच्या अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून
अश्रुपात होऊ लागला. अशा स्थितीत ते किती
वेळ होते ते कळलेच नाही.
|| श्रीपाद राजम
शरणं प्रपद्ये.||
***********************************************************************
अध्याय ३५ वा
संन्यासी महाराजांकडून भक्ताना श्रीदत्त दीक्षा
एकदा एक संन्यासी कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले
होते. ते श्रीदत्त भक्त असून साधकाना दीक्षा सुद्धा देत. दत्तदीक्षा घेतल्याने आपली
नियोजित कार्ये निर्विघ्नपणे सिद्धीस जातात असे त्या संन्यासाने सांगितले
होते. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून अनेक ब्राम्हणांनी त्या संन्याशाकडून
श्रीदत्तदीक्षा घेतली. तो संन्यासी साधकांना दीक्षा देवून त्याच्याकडून गुरुदक्षिणा
सुद्धा घेत असे. या रकमेतील अल्पसा भाग तो दिक्षीत झालेल्या ब्राम्हणास देत
असे. परंतु मंदिरात आलेल्या कांही लोकात दीक्षा घ्यावी का नाही या बद्दल साशंकता
निर्माण झाली. यासाठी ब्राम्हण परिषद, क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद यांचे एक
संयुक्त सम्मेलन झाले. त्याचे अध्यक्ष श्री बापन्नाचार्युलू होते. ते म्हणाले
“श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहेत, त्यामुळे सर्वजण दत्तदीक्षा घेऊ शकतात.
परंतु त्यावेळी कांही ब्राम्हणांनी असा आक्षेप घेतला की ब्राम्हण, क्षत्रिय, आणि
वैश्य वर्णाचे लोक आचार संपन्न असल्याने ते दिक्षेस पात्र असतात, परंतु शुद्र
वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत. या आक्षेपाचे
समाधान करण्यासाठी बापन्नाचार्युलू म्हणाले, “सर्व कुळांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत
लोक हे असतातच. यामध्ये कोण आचारसंपन्न आणि कोण आचारहीन हे सांगणे कठीण असते. यासाठी सामुहिक कल्याण,
स्थैर्य, यावर दृष्टी ठेऊन आपण श्रीदत्त होम किंवा यज्ञयागादि कार्यक्रम करून
संघातील क्षेम, स्थैर्य साधू शकतो.” श्री
बाप्पानाचार्युलूचे असे निश्चित मत होते की
दक्षीणेची रक्कम इतकी जास्त आहे की समाजातील अनेक गरीब लोकाना गुरुदक्षीणा देऊन
दिक्षा ग्रहण केल्यावर त्याना अन्नावाचून कांही दिवस उपाशी राहावे लागेल. त्यांच्या
मते दक्षिणा ही ऐच्छिक असावी. पिठापुरमच्या विप्रानी बापन्नाचार्युलुना आणि श्री
अप्पलराज शर्मा याना दीक्षा घेण्याबद्दल विचारले त्यावेळी ते दोघे म्हणाले
“सामुहिक स्थैर्यांसाठी दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार आहे परंतु व्यक्तिगत क्षेम,
स्थैर्य यासाठी नाही.” श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला,
परंतु दीक्षा घेणे अथवा न घेणे प्रत्येकाच्या मनावर सोडले. श्रीपाद प्रभूंच्या भक्तगणात अनेक गरीब शेतकरी
होते. त्या सर्वात प्रमुख आणि धनवान श्री वेंकटपय्या श्रेष्ठी होते. श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या
घरी गेले आणि गरीब शेतकऱ्यांना म्हणाले “
दत्तदीक्षा मिळाली नाही म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. मी दत्तदीक्षा देतो. एवढेच
नाही तर यथाशक्ती दक्षीणा सुद्धा मीच देईन. मंडळ (४०दिवस) दीक्षेचि गरज गरज नाही.
एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे.” श्रीपाद प्रभुनी आपल्या करकमलांनी अनेकांना दीक्षा
दिली. या साधकात कांही ब्राम्हण, कांही
क्षत्रिय आणि कांही वैश्य होते
||
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
अध्याय
३६ वा
श्रीपाद प्रभूंचे श्रीदत्त स्वरुपात प्रकटन
श्रीपाद प्रभू बहुरूपी असून श्रीदत्तस्वरूपात प्रकट होण्याचा तो
मंगलमय दिवस होता. तो श्रीदत्त प्रभूंचा आवडता वार गुरुवार होता. दीक्षा दिलेल्या सर्व
भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले. सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने
श्रीदत्तप्रभूंचे भजन अर्चन केले. यानंतर श्रीपाद प्रभुनी आपल्या पुढील कार्यक्रमा
बद्दल विस्तृत माहिती सांगितली. श्रीदत्त प्रभूंचे
स्मरण करता क्षणीच ते भक्ताना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकाना पूर्ण करतात असे
त्यांनी भक्ताना सांगितले. दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू सकाळीच श्री नरसिंह वर्मा
यांच्याकडे गेले. तेथे त्यांचे मंगल स्नान झाले. स्नानोत्तर वर्मांनी प्रभुना
खाण्यासाठी अनेक फळे दिली, परंतु त्यांनी केवळ एक केळच घेतले आणि ते सुद्धा
गोमातेस दिले. यानंतर प्रभू वेंकटप्पा श्रेष्ठी यांचे घरी गेले. तेथे सुद्धा
श्रीपादाना, श्रेष्ठी कुटुंबियांनी मोठ्या प्रेमभराने मंगल स्नान घातले. यथे प्रभूंनी लोणी, दुध, आणि
सायीचा स्वीकार केला. येथे ते सर्वासमक्ष म्हणाले ‘माझे भक्त मला बोलावीत आहेत.
पिठीकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे.” असे बोलून ते आपल्या आजोळी, श्री
बापन्नाचार्युलू यांचे घरी आले.येथे सुद्धा त्यांच्या प्रेम मुर्तीस्वरूप आजीने
त्याना मंगल स्नान घातले. आजच्या दिवसाची विशेषता अशी होती की ज्या ज्या
घरी ते गेले त्या प्रत्येक घरातील मातांनी त्यांना मोठ्या प्रेमभराने मंगल स्नान घातले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा म्हटले होते “मी
प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहे आणि भक्तांची दु:खे,
पीडा, यातना, अडचणी दूर करण्यासाठी मी अवतार धारण केला आहे.” प्रभुनी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या
कार्यक्रमाची माहिती भक्तांना सांगितली.
यानंतर ते स्वगृही आले. श्रीपाद प्रभूंचा पिठीकापुरम सोडून जाण्याचा निर्णय त्या सच्छील माता-पित्यास कळला होता. त्यांनी
श्रीपादांना परोपरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते आपल्या निर्णयावर
अटळ होते. या नंतर श्रीपाद प्रभुनी आपल्या विवाहाच्या प्रस्तावा बद्दल बोलावयास
प्रारंभ केला. ते म्हणाले “माता,तात आजपर्यंत मी अनेक वेळा श्रेष्ठी आजोबाना,
वर्मा आजोबांना अनघालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतीने श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार
केलेला सर्वानी पाहिलेला आहे. हे पहा माझे अनघालक्ष्मी समवेत असलेले दिव्य
स्वरूप.” असे म्हणून प्रभूंनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ आपल्या
माता,पित्यास घडवून आणला. ते अतिमंगल स्वरूप पाहून ते माता,पिता अगदी भारावून
गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “मी अवधूत
स्वरुपात आलो असताना सांगितले होते की माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर
सोडून निघून जाईन.” एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभुनी, तेथे बसलेल्या आपल्या दोन
थोर बंधूना आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला आणि कृपापूर्ण दृष्टीने त्या
दोघांकडे पाहिले. काय ते आश्चर्य| तत्काळ अंध असलेल्या बंधूस उत्तम दृष्टी प्राप्त
झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला.त्या दिव्य
स्पर्शाने त्या दोघा बंधूना ज्ञानप्राप्ती
होऊन ते ज्ञान तेजाने तळपू लागले. हे सर्व पाहून श्रीपादांच्या
माता-पित्यास अजून एका सुखद धक्क्याचा अनुभव आला. याच वेळी श्रीपादांचे आजोबा आणि
आजी आले. त्याच्या समवेतच श्रेष्ठी आणि वर्मा दंपती सुद्धा आले. त्यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण पसरले.
श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर थट्टा,मस्करी करीत बोलत होते. सुमती महाराणी त्यावेळी
म्हणाल्या “बाळा श्रीपादा| तू सर्व
जवाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून वेंकटप्पा
श्रेष्ठींच्या घराची दुध बाकी, वत्सवाईची दुध बाकी, मल्लादिंची दुध बाकी, पूर्ण
केली नाहीस.” त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले “आई तू म्हणतेस ते खरे आहे. या तीन
वंशातील लोकाना मी कधीच विसरणार नाही. मी जरी विसरलो तरी तू मला आठवण करून दे.
त्यांच्याकडून योग्य ती सेवा घेऊन मी त्याना वर प्रदान करीन. तुझ्या माहेरच्या
कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन. परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही.
तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी अत्यंत
वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावाई असे संबोधतात. ही मानवी नाती स्वीकारून
त्यांच्या बरोबर जावायास शोभेल असे प्रवर्तन करीन.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू पित्याकडे वळले आणि
त्याना उद्देशून म्हणाले “तात, आपल्या घंडीकोटा
वंशात अनेक वर्षांपासून वेद परंपरा चालू आहे. आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू
वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहेत. ते आपली वेद परंपरा चालवतील. घंडीकोटा वंशातील लोकाना मी कधीच विसरणार नाही.” एवढे
बोलून प्रभू कांही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले “आपले श्रीधर शर्मा पुढील
एका जन्मी “समर्थ रामदास” या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास
येतील. नरसिंह वर्मा “छत्रपती शिवाजी” या
नांवाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापीत करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व
पत्करतील. या प्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरुपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ
रामदास स्वामींच्या अवतार कार्य पूर्णतेनंतर, श्रीधर शर्मा शिवग्राम (सध्याचे
शेगाव) क्षेत्रात गजानन नांवाचे महायोगी होतील. त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्राचा
महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा “श्रीधर” या नांवाने जन्म घेऊन महायोगी होतील.
श्रीधराची शिव परंपरा असलेल्या या पिठीकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण
होणार आहे. वेंकटपय्या बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच
नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोक सुद्धा येतील. येथे “सावित्र पन्नाचे
पारायण होईल.” इतके बोलून श्रीपाद प्रभू थांबले.
************************************************************************
नरसिंह
ब्राम्हणास वृश्चिक दंश
एकदा कुक्कटेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्र प्रांतातून एक वृद्ध
ब्राम्हण आला होता. त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते. त्याने कुक्कटेश्वराच्या
मंदिराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले. नंतर तो स्वयंभु श्रीदत्तात्रेयांच्या
चरणी भक्ती भावाने नतमस्तक झाला. त्यावेळी संन्यासी महाराज श्रीदत्त दीक्षा देत
असलेले त्याने पहिले आणि तो तेथे गेला. त्याने मोठ्या नम्र भावाने त्या संन्यासी
महाराजाना नमस्कार केला आणि गुरुदक्षीणेच्या रूपात त्याने आणलेली सर्व नाणीं दिली.
ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले.. त्यांनी दीक्षा घेण्यासाठी आपली ओंजळ
पुढे करण्यास त्या वृद्ध ब्राम्हणास सांगितली. त्याच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल
घालण्यासाठी आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राम्हणाच्या हातावर पवित्र जल
घातले.परंतु आश्चर्य असे घडले की त्या जलाबरोबर एक विंचू त्या ब्राम्हणाच्या हातावर पडला आणि त्याने
ब्राम्हणाच्या हातास कडकडून दंश केला. त्या प्रखर दंशाने ब्राम्हण इतक्या जोरात ओरडला की मंदिरातील सर्व
लोक घाबरून त्याच्या जवळ जमा झाले. कांही ब्राम्हणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी
करण्याचा मंत्र येत होता तो त्यांनी घातला परंतु दाह सारखा वाढतच होता. यावेळी
घाबरून तो दीक्षा देणारा संन्यासी मंदिरातील एका कोपर्यात लपून बसला. दाह कमी
होण्यासाठी अनेक मंत्र जप केले, कुक्कटेश्वराला अभिषेक करण्यात आला, स्वयंभु
दत्तात्रेयाना कर्पूर आरती करण्यात आली. परंतु कशाचाही उपयोग झाला नाही. ब्राम्हण
मूर्च्छित अवस्थेत पडून होता, त्याच्या मुखातून फेस येत होता. थोड्या वेळाने
ब्राम्हण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला सारख्या
उचक्या लागत होत्या. तितक्यात तेथे एक शेतकरी आला आणि त्या वृद्ध ब्राम्हणास
म्हणाला “महाराज, आमच्या कुलातील व्यंकय्या नांवाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद
प्रभूंच्या मंत्राक्षदा दिल्या आहेत. या तुम्ही घ्या. त्या ब्राम्हणाने मोठ्या
श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून
त्या मंत्राक्षदा हातात घेवून थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या. आणि
आश्चर्य असे की कांही क्षणातच त्याच्या सर्व वेदना नष्ट होऊन तो पूर्ववत स्वस्थ
झाला. या सर्व प्रकाराने लोकांचा त्या संन्याशावरील विश्वास उडाला. सर्व दिक्षीत
साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्यांच्याकडून परत घेतली व त्या संन्याशास पिठीकापुरम
मधून हाकलून दिले. संन्याशाकडून घेतलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा हे सर्व
साधकांनी बापन्नाचार्युलूना विचारले. तेंव्हा ते म्हणाले “त्या द्रव्याने अन्न सामुग्री आणून सर्वाना अन्नदान करावे. अन्न
दानामुळे श्रीदत्त प्रभू प्रसन्न होतील. वेगळी दत्तदीक्षेचि गरज नाही.” श्री
बापन्नाचार्युलू यांच्या सांगण्याप्रमाणे कुक्कटेश्वराच्या आवारात एक मोठा मंडप
घालण्यात आला होता. तेथे मोठ्या प्रमाणात
अन्नसंतर्पण झाले. भोजनोत्तर सर्व भक्तांनी “दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ
दिगंबरा” या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. या दिव्य
महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभुनी पूर्वी केला होती. |
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
अध्याय ३७ वा.
सुवर्ण
पिठीकापुरम वर्णन
प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे
शब्द, स्पर्श, रूप. रस, गंध या तत्वांनी बनलेले असते. योग दृष्टीने पाहता ज्या
शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पिठीकापुरम
या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होते. यावर शंकर भट्टाने श्रीपाद प्रभुना प्रश्न केला, “ आर्यावर्तातील
लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठीकापुरमला भौतिक रुपाने येतात
का?” हा प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभुनी मंद हास्य केले आणि म्हणाले “तू विचारलेला
प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पिठीकापुरम मध्ये एक सुवर्ण पिठीकापुरम आहे.
जितकी भौतिक पिठीकापुरमची व्याप्ती आहे
तेवढीच सुवर्ण पिठीकापुरमची सीमा आहे. सुवर्ण पिठीकापुरम केवळ चैतन्याने निर्माण
झाले आहे. वास्तविक पहाता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ
निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठीकापुरात वास्तव्य करीत असल्या सारखे वाटते. या
सुवर्ण पिठीकापुरम मधील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी,
तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पिठीकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य
पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पिठीकापुरम केवळ योगदृष्टी, योगचक्षु , ज्ञानचक्षू असलेल्या
साधकांनाच गोचर असते.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “सुवर्ण पिठीकापुरम प्रमाणेच एक
सुवर्ण काशी नांवाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा ईतकेच आहे.
सुवर्ण काशी चैतन्यम पदार्थांनी निर्मित आहे. “मी काशीस जात आहे आणि तेथेच
राहण्याचा विचार आहे.” असे सतत म्हणणाऱ्या
लोकाना सुद्धा काशिवासाचे फळ मिळते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि
काशीविश्वेश्वराचे दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर, मोठ्या श्रद्धा भावाने,
चिंतन केले पाहिजे.” प्रभू पुढे म्हणाले तुझ्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय
आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोषाच्या संबंधाने एक एक पिठीकापुरम आणि एक,एक काशी आहे. या आनंदमय पिठीकापुरमलाच
“सुवर्ण पिठीकापुरम” असे म्हणतात. तसेच या
आनंदमय काशीला “सुवर्ण काशी” असे म्हणतात.” एवढे बोलून प्रभू थांबले.
|| श्रीपाद राजन शरणं प्रपद्ये.||
****************************************************************
अध्याय ३८ वा.
संन्याशावर बाल श्रीपादांचा विशेष अनुग्रह
एके दिवशी एक वयोवृद्ध संन्यासी कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले होते.
त्याच वेळी बाल श्रीपाद वेंकटप्पय्या
श्रेष्ठी बरोबर त्यांच्या घोडा गाडीतून कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले.
त्यावेळी ते संन्यासी स्वयंभु दत्तमंदिरात
ध्यानस्थ बसले होते. त्यांना पाहून बाल श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले “या साधुस
मंदिरात का येऊ दिले? श्रेष्ठी हलक्या आवाजात म्हणाले “अरे बाळा, ते संन्यासी आहेत
त्यांना राग आल्यास आपणास शाप देतील.” श्रीपाद म्हणाले “म्हणजे याना सुद्धा राग
येतो तर. मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्याना का संन्यासी म्हणावे?’
तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. खरोखरीच त्यांच्या जवळ माशांचा वास येत
होता. ते खरेखुरे संन्यासी होते. त्यांनी बाल श्रीपादांकडे पहिले त्यांना मत्स्य
अवतारातील श्रीविष्णूंची आठवण झाली. तेंव्हा श्रीपाद म्हणाले “तुमच्या कमंडलूमध्ये
सुद्धा छोटे,छोटे मासे आहेत तुम्हीच पहा. त्या संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप
आश्चर्य वाटले. श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पहात होते. तितक्यात ते
संन्यासी अंतर्मुख झाले. त्यांना योग दृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्त
नलिकेतील विभिन्न द्रवातील लहान, लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले. ते थेंब
विविध प्रकारच्या अनुभूतींचे प्रदर्शन करीत होते. एक, एक थेंब जणू एका,एका,
वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत
होता. “अहा| मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय? असे आश्चर्यचकित होऊन ते
संन्यासी ओरडले. या सूक्ष्म थेंबांविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व
वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशास कळाले. संन्यासी बहिर्मुख झाले
आणि त्यांनी मंद हास्य करीत श्रीपाद प्रभूंकडे मोठ्या श्रद्धाभावाने पहिले. श्रीपाद प्रभूंनी सुद्धा स्मित करीत त्या संन्याशा कडे पहिले.
त्यावेळी ते संन्यासी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. श्रीपाद प्रभूनी मोठ्या
प्रेमभराने आपला उजवा आत त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेऊन त्यांच्यावर अनुगृह
केला. त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला आणि त्या
जागी एक दैवी सुगंध येऊ लागला. या वेळी त्या संन्याशास पराशर मुनीनि आपल्या कृपा
दृष्टीने मत्स्यगन्धेच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करुन त्या ठिकाणी
सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली. यानंतर श्रीपाद प्रभू त्या
संन्याशाला म्हणाले “तू अंतर्मुख होऊन आपल्या ज्ञानेन्द्रीये आणि कर्मेंद्रीयाना आपल्या स्वाधीन ठेवल्यास
मोठा योगी होशील. आणि तुझी सर्व बंधनातून सुटका होईल.” इतके बोलून श्रीपाद प्रभू
मंदिराच्या आवारात आले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
अध्याय ३९ वा.
श्री हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची
श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा
श्रीपाद प्रभुनी काशी नगरात अनेक महापुरूषांना आशीर्वाद दिले. त्यांना
हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषीसमुदायास उद्देशून म्हणाले
“मी नृसिंह सरस्वती नांवाने अजून एक अवतार घेणार आहे.मी पिठीकापुरी अदृश्य होऊन
काशी क्षेत्री येण्याचे कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिद्ध संकल्पांची येथे
पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी
योगमार्गाने येत असतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा
स्वीकारणार आहे. येत्या शतकात क्रिया योगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी
लोकाना बोध करण्यासाठी श्यामचरण नांवाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा
आदेश देत आहे.” या वक्तव्या नंतर श्रीपाद प्रभू ऋषीसंघाबरोबर योगमार्गाचे अनुसरण
करीत बदरीका वनात येऊन पोचले. तेथे त्यांनी नर-नारायण गुहेत अनेक शिष्यांना
क्रीयायोगाची दीक्षा दिली. तेथून ते बारा
कोस अंतरावर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ आले. ऋषीगंगेत त्यांनी स्नान केले. येथे पाच
हजार वर्षांपासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वारानंद नांवाच्या महायोग्यास
त्यांनी आशीर्वाद दिला. येथून ते नेपाळ देशात गेले. तेथे एका पर्वतावर
श्रीरामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास, श्रीराम, सीता, लक्ष्मण. भरत आणि
शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रित पणे दर्शन श्रीपाद प्रभूंनी घडविले. ते हनुमंतास म्हणाले “अरे हनुमंता| तू
रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही. इतक्या थोड्या काळात तू
रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य
झाले.” श्रीपाद प्रभू हनुमंतास पुढे
म्हणाले “तू कलीयुगात अवतरित हो. जितेंद्रिय होऊन सर्वाना वंदनीय होशील.”
हनुमंताने विचारले “प्रभू मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा.” श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले “तू
शिवांश रूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि अहा म्हणजे ती शक्ती
धारण करणारा. म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे. इतकी
वर्षे सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार
करण्या योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर.” हनुमंत श्रीपाद
प्रभुना म्हणाला “प्रभो| मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत
नाही.तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा पुत्रच आहे. होय ना?”
श्रीपादांनी मोठ्या प्रेमाने हनुमंतास
आलिंगन दिले आणि म्हणाले “हनुमंता| तू देहबुद्धी सोडून दे. तू माझाच अंश आहेस.”
हनुमंत म्हणाला “प्रभो| मी याचा अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे. मी तुमचे
कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन
जाईन तेंव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल. अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहील. ती तत्वे
ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्ती,संपदा मूळ तत्वांनी मला धरून ठेवा.”
हनुमंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले “अरे हनुमंता| तू फार बुद्धिवान
आहेस. ज्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्याच आहेत. मी नृसिंह अवतारचे अंती
श्रीशैल्याजवळील कदलीवनात तीनशे वर्षांपर्यंत योग समाधीमध्ये राहीन. त्यानंतर
प्रज्ञापूर (सध्याचे अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईन. हा
अवतार समाप्त करतेवेळी साई रुपाने तुझ्यात अवतरित होईन. त्यावेळी तू एका समर्थ
सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्धी पावशील. यानंतर हनुमंत म्हणाला “प्रभू मी तुमचा
सेवक “अल्ला मलिक है.|” असे म्हणत संचार करीन मी तुमच्या स्वरुपात आणि तुम्ही
माझ्या स्वरुपात बदलल्यास आपणातील अव्दैत सिद्ध होईल. यासाठी आपण मला दत्त
प्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या”
श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार कालपुरुष त्यांच्या समोर हात जोडून उभा
राहिला. श्रीपाद प्रभू म्हणाले “हे कालपुरुषा| हा हनुमंत कालातीत आहे. मी त्याला
माझी सायुज्यता प्रसाद रुपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आता पासुन तो साईनाथ या नांवाने संबोधन केला जाईल.
आज दत्तजयंती साजरी करू या. हनुमन्तातील
चैतन्य दत्त स्वरुपात प्रकट झाले. हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे
आश्चर्याने पाहू लागला. त्याच वेळी हनुमंताच्या शरीरातील जिवाणूंचे विघटन झाले आणि
त्यातून अनुसया माता प्रकट झाली. ती श्रीपाद प्रभुना म्हणाली “बाळा कृष्णा तू किती
उत्तम मुलगा आहेस. तुला जन्म दिला त्यावेळी सर्व साधारण मातेला होणाऱ्या प्रसव
वेदना मला झाल्या नाहीत. मातेला अशा
वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते. त्यात माधुर्याची अनुभूती येत
असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित राहिले. तू माझ्या पोटी
पुन्हा जन्म घेणार नाहीस ना? ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही.” यावर श्रीपाद
म्हणाले “माते, पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करावयाची असते. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान
आहे.त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे. एका प्रकारे सांगावयाचे
म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोड्याच वेळात तुला
तीव्र प्रसव वेदना प्रारंभ होतील. यानंतर अल्पकाळातच अनसूया मातेने तीन शिरे
असलेल्या दत्तमुर्तीस जन्म दिला. थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पावून तिच्या
मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशुला अनसूया मातेने स्तनपान करविले. ही
घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले. त्यांच्या समोर
श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेसह उभे होते. त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य दैवताचे
दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि त्याने दोघाना साष्टांग नमस्कार केला. तो सीता मातेस म्हणाला “माते| तू
मला अत्यंत प्रेमाने व वात्सल्यभावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास त्या हारातील
माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले. परंतु त्यांत
श्रीराम दिसले नाहीत म्हणून तो हार मी फेकून दिला. या महान अपराधाची मला क्षमा
कर.” यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “देवाच्या सानिध्या शिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस
जात नाही. तो माणीकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्तस्वरूप आहे यात शंकाच
नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण ओतले आहेत. तो माणीकांचा हार
गुरु स्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत आहे. ते गुरुस्वरूप माणिकप्रभूंच्या स्वरूपात
विश्वविख्यात होईल.” एवढे बोलून श्रीपाद प्रभुनी आपल्या वाणीस विराम दिला. || || श्रीपाद राजम
शरणं प्रपद्ये ||
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
अध्याय ४०
वा.
श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातुन
दिव्यलोकात प्रयाण.
नेपाळ देशात हनुमंताबरोबर दिव्य लीला केल्यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी
नांवाच्या संजीवनी पर्वतावर गेले. कांही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायात आनंदात
राहिले. तेथे असलेल्या महायोग्याना
अनुग्रह देऊन कृतार्थ केले. तेथून ते “कल्की अवतार” ज्या गावी होणार आहे त्या गावी
गेले. तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा पाहिलेला नव्हता. हिमालयात हजारो वर्षांपासून
तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत. या “संबळ” गावातील स्फटिक पर्वतावरील
शुद्ध जल श्री प्रभुनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे या जलाचे
महात्म्य आहे. या मुळेच श्रीपादांचे वय
सोळा वर्षाच्या कुमारा सारखेच राहिले. त्यांच्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही.
या नंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत, साधकांना, भक्तांना,
महापुरूषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोचले. या क्षेत्रात
प्रभू तीन वर्षे राहिले. या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन
केले. गोकर्ण क्षेत्रातुन निघून प्रभू श्रीशैल्य क्षेत्री आले. श्री
बापन्नाचार्युलुनी येथे एक महायज्ञ केला होता. याचे फलस्वरूप श्री
मल्लीकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता. येथूनच श्रीपाद
प्रभू योगमार्गाने महाअग्नी गोलका सारखे लाल तप्त होऊन सूर्य मंडळात गेले. तेथून
ते ध्रुव नक्षत्रातुन, सप्तऋषी मंडळातून, आर्द्रा नक्षत्रातुन फिरून चार
महिन्यानंतर श्री शैल्यास परत आले. त्याच्या बरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे
महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले होते.. श्री शैल्यामधील सिद्ध
पुरुषांची, ऋषींची श्रीपाद प्रभुनी एक सभा बोलावून सर्व ऋषीना, दुसऱ्या ग्रहावरून
आलेल्या महर्षीना त्या नूतन महायोगाचा,
सिद्धयोगाचा बोध केला. त्या बोधाने सर्व ऋषी , मुनिगण,अत्यंत आनंदित झाले. या
ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा
नक्षत्रातिल ऋषी स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्री शैल्याहून कांही दिवसानंतर कुरुगड्डी
या पवित्र क्षेत्री येऊन पोचले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
*******************************************************************
अध्याय ४१ वा.
श्रीपाद प्रभूंच्या भक्तांचे कुरगड्डीस प्रयाण.
श्रीपाद प्रभूंचे माता-पिता, सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा आपल्या
पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतिक्षा करीत होते. श्रीनरसिंह वर्मांच्या
धर्म पत्नीने कुरगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याचा संकल्पच केला होता.
या संदर्भात त्यांनी श्रीवेंकटप्पा श्रेष्ठी आणि श्री बापन्नाचार्युलू यांच्या
बरोबर चर्चा केली, या सर्व मंडळीनी अठरा घोडागाड्या ठरविल्या. त्यात बसून सामानासह
एका शुभ दिनी प्रात:कालीच सर्वानी प्रयाण केले. पिठीकापुराम ते कुरगड्डी हे अंतर
बरेच असल्याने प्रवासात कित्येक दिवस लागणार होते. सुमती महाराणीस आपल्या लाडक्या
पुत्राचे मुख केंव्हा पाहीन असे झाले होते. त्याच्या आठवणीने त्या मातेच्या
डोळ्यात पाणी तरळले. सर्वानी तिला आता आपण श्रीपादाना लवकरच भेटणार आहोत ना? असे
सांगून तिचे समाधान केले. सर्वांतर्यामी असलेले त्रिकालदर्शी श्रीपाद प्रभुना बसल्या ठिकाणी पिठीकापुरमहून
येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती. प्रात:काळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा
वाजेपर्यंत चालतच होत्या. अचानक एक अदभूत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळीना एकदम
मूर्च्छा आल्यासारखे झाले. त्या सर्वाना आपल्या गाड्या आकाश मार्गाने जात
असल्यासारखा भास झाला. थोड्या वेळाने ती मूर्च्छा गेल्यावर त्यांनी बाहेर पहिले तेंव्हा
त्याना एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले. गाडीवानाने खाली
उतरून ते कोणते गाव आहे ते एका
वाटसरूस विचारले. तो वाटसरू म्हणाला “महाराज हे पंचदेव पहाड गांव आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद
प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. त्या महाप्रभूंनी दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला
क्षेम-कुशल विचारून त्यांच्या आधी-व्याधी
दूर केल्या. दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था होती.” असे
सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला. पिठीकापुरमहून सकाळी निघालेल्या
गाड्या दुपारचे साडेबारा वाजेपर्यंत पंचदेवपहाड या स्थानापर्यंत कशा येऊन पोचल्या
याचे सर्वानाच आश्चर्य वाटत होते. सर्वजण
नावेत बसून नदी ओलांडून कुरगड्डीस येऊन पोचले. हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती याचाच
त्यांना भ्रम पडला होता. परंतु ती वस्तुस्थितीच होती. सर्वजण श्रीपाद प्रभूंच्या
दरबारात गेले. सुमती मातेने मोठ्या प्रेमाने श्रीपाद प्रभूंना आपल्या हृदयाशी धरले. तिच्या नयनातून आनंदाश्रू
ओघळत होते, ते श्रीपाद प्रभूंच्या पाठीवर पडत होते. श्रीपाद म्हणाले “आई तू
निर्गुण ,निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनसूया माते प्रमाणे
पतिव्रता शिरोमणी आहेस.” असे म्हणून प्रभुनी मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद प्रभू श्रीबापन्नाचार्युलुना म्हणाले
“आजोबा| तुम्ही श्रीशैल्यावर एक महान यज्ञ करून सुर्यमंडळातील तेज शक्तिपात व्दारा
आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारव्दाज मुनींनी अत्यंत आर्त
भावाने प्रार्थना केली होती. त्यांना
दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी हा अवतार धारण केला आहे.” श्रीपाद प्रभू
पुढे म्हणाले “आजोबा| तुम्ही पूर्वी लाभादि महर्षी, नंद, भास्कराचार्य, या रूपात
असताना मी प्रत्येक वेळी तुमच्यावर कृपा
केली, आता बापन्नाचार्युलूच्या रुपात आलात आणि मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या रुपात
भावविभोर होऊन आलो आहे. यात आश्चर्य वाटण्या सारखे कांही नाही.” यानंतर श्रीपाद प्रभू श्री वेंकटपय्या श्रेष्ठी
यांच्याकडे वळून म्हणाले “आजोबा| मी पूर्णप्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्म-धर्मा
प्रमाणे ज्याचे त्याला फळ देत
असतो.माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी
कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी ती तुम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच
मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेंव्हा गरज पडेल तेंव्हा मी असाधारण कार्य करू
शकतो. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वाना पिठीकापुरमहून
इतक्या थोड्या वेळात पंचदेवपहाड ग्रामापर्यंत आणण्या मागे “मी दत्तप्रभूच आहे” हे
तुम्हास कळावे हाच उद्देश होता.” श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या “अरे बाळा,
तुझा थाटामाटात साजरा झालेला विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत.तुझ्या
कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला, सर्व शृंगारानि नटलेला नवरदेव
आम्हास पाहावयाचा आहे.” श्रीपाद म्हणाले “आजी अवश्य तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मी
कल्की अवतारात शम्बळ गावात जन्म घेईन त्यावेळी पद्मावती नांवाच्या अनघालक्ष्मी
बरोबर विवाह करीन परंतु या साठी कांही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र अवश्य पूर्ण
करीन.” यानंतर वेंकटसुब्बम्मा श्रीपाद प्रभुना म्हणाली “हे कान्हा| तू माझ्या
हातांनी दुध, दही, साय,लोणी खावून खूप दिवस झाले. माझ्या हाताने खाऊ घालण्याची
तीव्र इच्छा आहे.” श्रीपाद म्हणाले “आजी तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने
खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही पिठापुरमहून येताना दुध, दही, लोणी आणणार असे मला
कळले होते. एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य
प्रेमाने बंधित होऊन अशी लीला केली की ते
जसे च्या तसे चागले रहावे. यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू. इतक्या
दुरून अठरा घोडागाड्याना पंचदेव पहाड पर्यंत आणणे सामान्य आहे का? माझे सारे अंग
ठणकत आहे. माझ्या हातावर किती वळ उमटले ते बघ.” खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या हातावर
फोड आले होते. वेंकटसुब्बम्माने अत्यंत मृदूपणे श्रीपाद प्रभूंच्या हाताना लोणी
लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या लीला मोठ्या
अगम्य होत्या. यानंतर राजमंबा म्हणाली हे कृष्ण| तुझा आवडता हलवा करून तो
चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये तुला खाऊ घालते.” श्रीपाद प्रभूंच्या
तीन आजीनी मिळून त्यांना तो अतिमधुर हलवा खाऊ घातला. परंतु त्या पात्रातील हलवा
संपतच नव्हता. नंतर श्रीपाद प्रभुनी स्वतः आपल्या हातानी तो हलवा बहिणी, बंधू,
मेहुण्याना खाऊ घातला. सर्वानी खाल्यानंतर राहिलेला हलवा गाडीवान आणि घोड्यांना
देण्यास सांगितले. यानंतर अप्पलराज शर्मा म्हणाले “बाळा | तू दत्त प्रभू असल्याचे
न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या अपराधांची क्षमा कर.” तेंव्हा श्रीपाद
प्रभू म्हणाले “तात | आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करावयाची असते
काय? तुम्ही मला पूर्वी प्रमाणेच आपला मुलगा समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा.” यावेळी
श्री वेन्कावधानी आणि त्यांच्या धर्म पत्नीच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.
त्या पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले “मामा आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ
तुमचाच जावई आहे असे नाही तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा
मी जावाईच आहे. मी माझ्या दिव्य लीलांनी तुम्हाला सुखवित जाईन. कल्की अवताराच्या
वेळी पद्मावती देवीचा वधु स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती
महाराणीचे दुःख दूर करीन, तिचा लाडका पुत्र सर्वपुत्रांप्रमाणे, नवरदेवाच्या
स्वरुपात नटलेला न पहाता, एका यतिच्या रुपात, वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी
झालेली आहे.” नन्तर श्रीपाद आपल्या मातेकडे वळून म्हणाले “आई| तू आणि अनसूया माता मला वेगळ्या वाटतच
नाहीत. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात पूर्ण करीन. आई तुझ्या
गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो. तुझ्या वात्सल्य अमृतानेच माझे भरण
पोषण झाले. माझी बहिण वासाविने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना? मला भूक लागली असताना माझे लहान बालकात
रुपांतर करून अनसुया मातेजवळ दुग्धपान
करण्यास पाठविले.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “भविष्य काळात माझा दरबार पक्क्या
इमारतीत परिवर्तीत होईल. यात गोधन सुद्धा असेल. त्यात माझ्या कित्येक लीला
प्रदर्शित होतील. हा माझ्या डोळ्यांनी
पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे.” एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. तेथे
जमलेल्या पिठापुरमहून आलेल्या सर्व
भाविकांना गाढ निद्रा लागली. थोड्या
वेळातच ते सर्व अदृश्य झाले. त्यावेळी आश्चर्याने पाहत असलेल्या शंकरभट्टास श्रीपाद प्रभू
म्हणाले “माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वाना
सुरक्षित रीतीने पिठीकापुरम नेवून पोचविले आहे. ही एक महान अनुभूती होती. मला जे ज्या भावाने भजतात
त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रतच आहे” एवढे बोलून श्रीपाद प्रभू
ध्यानस्थ झाले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
***************************************************************************
अध्याय
४२ वा.
श्रीपाद प्रभूंचे स्त्री, पुरुषाना संबोधन.
श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड या स्थानी सत्संग करीत
असत. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत
जात. त्यांची पाउले ज्याठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक कमळ विकसित होत असे.
त्या कमळावर श्रीपाद प्रभूंच्या पाऊलांचे
चिन्ह उमटत असे. ते कसे घडत असेल हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे कोडेच
होते. कृष्णा नदी ओलांडून आल्यानंतर सर्व
भक्तगण त्यांचे भव्य स्वागत करीत. सायंकाळ पर्यंत सत्संग चालू असे. नंतर ते पुन्हा
पाण्यावरून चालत नदी पार करून पैलतीरी जात, त्यावेळी सारे भाविक त्यांचा मोठ्या
श्रद्धा भावाने जय-जयकार करीत. रात्रीच्या वेळी प्रभू एकटेच कुरुगड्डी येथे रहात. श्रीपाद
प्रभू स्वतःपेक्षा मोठे असलेल्या महिलाना “अम्मा सुमती” अथवा “अम्मा तल्ली” असे संबोधन
करीत. त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना
ते “अम्मा वासवी” किंवा “अम्मा राधा आदी नांवाने बोलावीत असत, त्यांच्या पेक्षा
वयाने मोठे असलेल्या पुरुषाना ते “अय्या” किंवा “नायना” असे संबोधन करीत.
त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलाना ते “अरे अब्बी” किंवा “बंगारू” या नावाने बोलावीत
असत. त्यांच्या आजोबाचे वयाचे असलेल्या वृद्धाना ते “ताता” असे संबोधन करीत. वृद्ध
स्त्रियांना ते “अम्ममा” असे म्हणत. गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग,
प्रभूंच्या इच्छेनुसार कधी कुरुगड्डीस तर कधी पंचदेवपहाडावर होत असे. रविवारी
होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत. त्यानंतर
दर्शनाला आलेल्या भक्तांना क्षेम-कुशल
विचारून त्यांच्या अडचणी, प्रश्न मोठ्या प्रेमभराने सोडवीत आणि अभयवचन देत.
सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत. त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत.
मंगळवारचा सत्संग उपनिषदांचा बोध करण्यासाठी असे. या नंतर भक्तांच्या वैयक्तिक
समस्यांवर चर्चा होऊन त्यावर उपाय योजना सांगत. बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ
विवरण करून सांगण्यात येत असे. गुरुवारी गुरु तत्वाबद्दल विवेचन असे. यानंतर
भक्तांच्या आधी-व्याधी प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेत आणि त्याचे निराकरण करण्याचा
उपाय सांगत. या दिवशी विशेष स्वयपाक करून सर्वाना पोटभर सुग्रास भोजन असे. या
जेवणाचे वैशिष्टय असे की श्रीपाद प्रभू पंगतीत स्वतः कांही पदार्थ वाढीत. कांही
भाग्यावन्ताना त्याच्या हाताने घास मिळत असे. त्यांच्याकडे अन्न-धान्याचा किंवा
धनाचा कधीच अभाव नसे. शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि
सर्वाना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत. शनिवारी शिव अराधनेबद्दल बोध करीत.
श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्याना लाभला ते खरोखरी धन्य होत. श्रीपाद प्रभूंचे हृदय
नवनीतासम मृदू होते. त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत. त्यांच्या सत्संगात
आलेला दुःखी श्रोता घरी जाताना अत्यंत आनंदात जाई. दरबारात कोणत्याही वेळी आलेल्या
भक्तास भोजन मिळत असे. कधी जर शिजविलेले अन्न कमी असून प्रसादास आलेली मंडळी जास्त
असली तर श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत. त्यावेळी
ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या आणि इतर सर्वांच्या भोजनोत्तर सुद्धा शिल्लक
राहत. या प्रमाणे प्रभुनी अनेक लीला केल्या. रात्रीच्या वेळी अनेक देवता,
कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करून सकाळ होताच महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी
निघून जात. कांही वेळा हिमालयातून कांही योगी येत. त्यांचे देह अत्यंत कांतिमान
आणि दैदिप्यमान असत. या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः आपल्या हाताने भोजन वाढीत
असत. श्रीपाद प्रभूंचे जेवण म्हणजे मूठभरच असे. ते वऱ्याचे तांदूळ असोत अथवा
ज्वारीचा भात असो किंवा रागी असो. त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे
पोट भरल्याची संतृप्ती मिळत असे. श्रीपाद प्रभू सांगत असत की “पितरांचे विधियुक्त
श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते. अष्टादश वर्णातील सर्वाना
त्यांच्या धर्म-कर्मा प्रमाणे फळ भोगावे लागते. त्यात पक्षपात दृष्टी नसते. आज
मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण
वर्तन करावे लागेल.” भक्तगण ज्यावेळी
आपल्या गुरुदेवाना नमस्कार करतात तेंव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरुना
पोहोचवितात आणि ते त्यांच्या गुरुना ..... या प्रमाणे आपण आपल्या गुरुना केलेला एक
नमस्कार अनेक गुरुना पोचतो. प्रत्येक
शिष्यास गुरुंचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची
प्राप्ती होते. श्रीपाद प्रभू आपल्या भक्ताना सांगत “साधकानो| आपल्या हृदयामध्ये
भगवंताचे नामरूप भरून, सदाचाराने राहून, विहित कर्मे करीत रहावीत. प्रत्येकाच्या
धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापांचा क्षय करून त्यानंतर
पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभ फळ प्राप्त
होते.” श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनांचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून
सुलभतेने पैलतीरी पोचेल यात तिळमात्र संदेह नाही.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
*********************************************************************************
अध्याय ४३ वा.
नवदांपत्यास
श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद
एके दिवशी एक नवदांपत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले होते.
त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा दिली. त्या आदेशानुसार ती दोघे पती,पत्नी
पंचदेव पहाडावरील दरबारात गेली. परंतु दोन दिवसातच तो नवयुवक गतप्राण झाला. या
अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली “प्रभू आपल्या भक्तांचे
रक्षण करतात आणि त्यांची कृपा दृष्टी सर्वांवर असते असे एकले होते. परंतु आज हे
अघटितच घडले.” दुःखाने तिच्या नेत्रातील
अश्रू थांबत नव्हते. तिचे नातेवाईक, ही दुःखद बातमी कळताच, पंचदेव पहाडावर आले.
त्या मृत देहाचे दहन करावे का नाही असा प्रश्न सर्वाना पडला. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय
तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे सेवेकरी म्हणू लागले. तितक्यातच
श्रीपाद प्रभू दरबारात आले. शोक सागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना
आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले “कर्मांचे फळ
भोगणे अनिवार्य असते.” यावर ती नववधू अत्यंत श्रद्धापूर्ण भावाने म्हणाली “प्रभो|
या विश्वात आपणास अशक्य असे कांहीच नाही. माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून
सोडवा.” त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर धृढ विश्वास
होता. श्रीपाद प्रभू म्हणाले “तुझा दृढ विश्वासच फलदायी ठरेल. माझ्यावर असलेल्या
तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल. कर्म सिद्धांतांचा व्यतिरेक
न होता तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या
पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर.
चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल.” श्रीपाद प्रभूंच्या सांगण्या प्रमाणे त्या नव
वधूने आपले मंगळसूत्र विकून लाकडे आणली
आणि त्यावर स्वयंपाक करू लागली. चुलीतील सर्व लाकडे जळून जाताच तो तरुण झोपेतून
उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला. त्याला जीवित झालेला पाहून त्या नववधूच्या आनंदाला
पारावर उरला नाही. सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा उच्च स्वरात जय-जयकार
केला.
***********************************************************
एकदा एक गरीब ब्राम्हण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता. तो
परिस्थितीने इतका गांजला होता की, श्रीपाद प्रभूंची कृपा दृष्टी न झाल्यास
आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभुनी त्याचा भाव जाणला.
त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राम्हणाच्या पाठीस स्पर्श
केला. त्या जळत्या कोलीताने ब्राम्हणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळेपर्यंत
होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले “अरे ब्राम्हणा| तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला
होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या
आत्महत्येसंबंधीत सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट
झाली. आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल.” असे सांगून श्रीपाद प्रभुनी थंड
झालेले ते लाकूड त्या ब्राम्हणास देऊन आपल्या उत्तरीयात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले.
प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राम्हणाने ते लाकूड आपल्या उत्तरीयात बांधून घरी नेले. घरात जाऊन त्या उपरण्याची गाठ
सोडून पहिले तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब
ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली.
श्रीपाद प्रभुनी अनेक भक्तांची पापे अग्नी यज्ञाने दहन केली होती.
कांही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणावयास सांगत. त्या
भाज्यांच्या रुपाने भक्तांच्या पापकर्मांची स्पंदने आकर्षून घेत.अशा प्रकारच्या
भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना
खाण्यास देत. त्यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादान्च्या
दर्शनास आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला मंगळ दोष होता. श्रीपाद प्रभुनी
तिला कंद आणावयास सांगीतला. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या
कुटुंबियांनी खावी असे प्रभुनी सांगितले. त्याप्रमाणे केल्या नंतर कर्म बंधनातून
मुक्तता होऊन तिचा एका योग्य वरा बरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू कांही लोकाना
गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत. तर कांहीना गायीच्या तुपाचा दीप
देवासामोर लावण्यास सांगत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या
विवाह संबंधी कांही अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहू
काळाच्या वेळी (सकाळी १०-३० ते १२-००) अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद
प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना श्रीपाद प्रभुनी
त्याच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा
लाऊन तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको
असे त्यांना बजावून सांगितले होते. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका
भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभुनी गायीच्या
तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्याने त्याच्या घरात
लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा कितीतरी नवीन, नवीन पद्धती व्दारा श्रीपाद
प्रभुनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली. या सर्व पद्धती सामान्य
मानवाला समजून घेणे असाध्य आहे.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
************************************************************************
अध्याय ४४ वा.
नामस्मरण महिमा
एक वृद्ध ब्राम्हण पोटदुखीच्या त्रासाने कुरगड्डीस श्रीपाद
प्रभूंच्या दर्शनास आला होता. त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की
त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले. त्या
ब्राम्हणाने श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची आर्त स्वरात
प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले “अरे विप्रा| तू पूर्वजन्मी
आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखविलेस. अनेकांना आपल्या ह्र्दयभेदी कठोर
शब्दांनी घायाळ केले होतेस. त्याचे फळस्वरूपच तुला ही पोटदुखीची व्याधी जडली आहे.
तू तीन दिवस आणि तीन रात्री कुरगड्डी येथे राहून “दिगंबरा,दिगंबरा, श्रीपाद वल्लभ
दिगंबरा” असा जप कर.” प्रभूंच्या आदेशानुसार तो वृद्ध ब्राम्हण तीन दिवस आणि तीन
रात्री कुरगड्डीस राहिला आणि त्याने अत्यंत श्रद्धा भावाने जप केला. त्या ब्राम्हणाची
पोटदुखी पूर्णपणे बरी झाली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “मानवास आपल्या वाकदोषापासून मुक्त होण्याचा, या
कलीयुगात, ‘नामस्मरण’ हा एकाच मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध
होते. मी कुरगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे. त्या नामाबरोबर
“श्रीकार” ही जोडणार आहे. यामुळे चिरस्थायीपणे परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी
अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त “दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
आणि “श्रीदत्त दिगंबरा” असे मनःस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत
सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “वायूमंडलात आज
पूर्वीसारखेच वाग्जळ भरून आहे.आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व, रज,
तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन
गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो.
ही पंच महाभुते दुषित झाली की संपूर्ण अंतराळ दुषित होते. त्यामुळे मानवाकडून
पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दारिद्र्यामुळे पुन्हा पापकर्म घडते. या
पापामुळे मन दुषित होऊन दान, धर्म, लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने
पुन्हा दारिद्रय येते. हे दुष्ट चक्र असे चालूच राहते. या पासून मुक्ती
मिळविण्यासाठी काया, वाचा, मन शुद्ध असावयास हवे. यालाच त्रीकरण शुद्धी असे
म्हणतात. आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्ट भाव आणि वाणीने
अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा. आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी
पवित्र असावे. या कलीयुगात जीवन सागर तरुन जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात
“नामस्मरण” हे अत्यंत सुलभ साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते.
याच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.
***********************************************************************
कर्म विमोचन
एक क्षय रोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ
कुरुगड्डीस आला होता. त्याला मधुमेहाचा
आजार आणि अन्य व्याधी सुद्धा होत्या. त्याला पाहून श्रीपाद प्रभुना खूप राग
आला. तो पूर्व जन्मात एक कुख्यात चोर होता. त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती
हिरावून घेऊन त्याना निर्धन केले होते. एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या
विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती. ती या दुष्ट चोराने हिराऊन नेली होती.
त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही. वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य
वर मिळू शकला नाही. शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणे शिवाय विवाहास तयार झाला. या
विवाहाच्या प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येने आत्महत्या केली होती. पूर्व
जन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षय रोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपाद प्रभू जवळ आला
आणि त्याने मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभुना त्या दुर्धर व्याधीतून
सुटका करण्याची विनंती केली. दयावंत प्रभुनी त्याला पंचदेव पहाड येथील गोशाळेत
झोपण्यास सांगितले. तेथे डासांचा अत्यंत त्रास होता. तहान लागल्यास पिण्यास पाणी सुद्धा नव्हते. त्या रात्री त्या रोग्यास
एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारीत असल्याचे दिसले.
तो घाबरून उठला आणि चौफेर पाहू लागला. ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा
झोपला. त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून
त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला. या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्म
फळाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षय रोगापासून व अन्य व्याधींपासून मुक्त होऊन
निरोगी झाला. अनेक वर्षे क्षय रोगाने ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी
स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले होते. श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यमय
स्वभावास सीमाच नव्हत्या हेच खरे.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये || *************************************************************************************
अध्याय ४५ वा.
श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान
श्री शंकर भट्ट कुरुगड्डीस असताना अश्विन कृष्ण व्दादशी आली. त्या
दिवशी हस्त नक्षत्र होते. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून थोडावेळ ध्यानस्थ
बसले. ध्यानातून उठल्यानंतर त्यांनी शंकर भट्टास अजून एकदा कृष्णेत स्नान करून
येण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार शंकर भट्ट पुन्हा एकदा स्नान करून आले.
त्यावेळी प्रभू म्हणाले “अरे शंकर भट्टा| मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे.
मी कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुरुगड्डीस गुप्त रुपाने संचार करीन नंतर
नृसिंहसरस्वती नांवाने संन्यासी रुपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन. तू
लिहीत असलेला “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत,” हा महापवित्र ग्रंथ भक्तांना
कल्पतरू प्रमाणे लाभप्रद होईल. तो “अक्षर सत्य ग्रंथ असेल”. “दिगंबरा,दिगंबरा,
श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या माझ्या मंत्राचा सर्वत्र जयघोष होईल. या ग्रंथाचे
पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोक सौख्य प्राप्त होईल. या
ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद्वाक्यासमान मानला जाईल. तू लिहीत असलेला संस्कृत ग्रंथ
माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील. तेथून
निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्याना
माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल, त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या
भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत
अनुवाद केला जाईल. तो बापन्नाचार्युलू यांच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजांकडून उदयास येईल. या पवित्र
ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण
केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व कांही शुभ, मंगल होऊन त्याचे सकल व्याधीपासून रक्षण होईल. एवढे
बोलून श्रीपाद प्रभू थोडा वेळ थांबले. शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या या निर्णयाने अत्यंत दुःखी झाला. हे भगवंताचे सगुण
साकार रूप पुन्हा दिसणार नाही या कल्पनेने त्याच्या नेत्रातून आसवांची धार लागली
होती. ती प्रभूना दिसू नये म्हणून त्याने आपली मान खाली वाकविली होती. श्रीपाद प्रभू
शंकर भट्टास पुढे म्हणाले “तू माझी खूप
सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन माझ्या सेवेचे व्रत मोठ्या
काटेकोरपणे पाळलेस. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही
म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू तीन वर्षापर्यंत येथेच रहा. या तीन वर्षात मी तुला
तेजोवलय रूपात दर्शन देत राहीन. तसेच अनेक योग रहस्याबद्दल ज्ञान देईन. तीन
वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण व्दादाशीस तू रचलेला “श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृत” ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव. त्यादिवशी दर्शनास येणारे सर्व भक्त
धन्य होतील. सर्वाना माझे मंगलमय आशीर्वाद.” इतके बोलून श्रीपाद प्रभु सर्वांचा निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान
पावले. शंकर भट्ट प्रभूंच्या त्या लाकडी पादुका हृदयाशी घट्ट धरून आईपासून
दुरावलेल्या निरागस बालकाप्रमाणे स्फुंदून, स्फुंदून रडू लागले. श्रीपाद प्रभू पाण्यात
दिसतात काय ते पाहण्यासाठी शंकर भट्टाने
पुन्हा एकदा पाण्यात झेप घेतली. परंतु प्रभू त्यांना दिसले नाहीत. ते
पाण्याबाहेर येऊन ध्यानस्थ बसले असताना त्यांना मनोनेत्रासमोर श्रीपाद प्रभुनी
तेजोमय रूपात दर्शन दिले. श्रीपाद
प्रभूंच्या आदेशानुसार शंकर भट्ट कुरुगड्डीस तीन वर्षे राहिले. प्रतिदिन मध्यरात्रीचे
वेळी त्यांना श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय रूपात दर्शन होत असे आणि योगाच्या
ज्ञानाची प्राप्ती होई. शंकर भट्टाने योगाच्या अनुभूती पुस्तकाच्या रूपात
लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ती श्रीपाद प्रभूंचीच
इच्छा असेल असे शंकर भट्टास निश्चित वाटले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||
*****************************************************************************
श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृत या परम पावन ग्रंथाच्या लेखकाचे—श्रीशंकर भट्ट यांचे दिव्य अनुभव
अध्याय ४६ वा.
श्रीवल्लभेश्वराचा वृतांत
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या भव्य, दिव्य ग्रंथाचे मूळ लेखक श्री
शंकर भट्ट हे एक देशस्थ, कर्नाटकी, स्मार्त ब्राम्हण होते. ते एकदा श्रीकृष्ण दर्शनासाठी
“उडपी” तीर्थस्थानी गेले असताना तेथील नयनमनोहारी, मोरमुकुटधारी श्रीकृष्णाच्या
मूर्तीने त्याना अगदी मंत्रमुग्ध करून टाकले. येथेच त्यांना कन्याकुमारीस जाऊन
कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा झाली. या आदेशानुसार श्री शंकर भट्ट
कन्याकुमारीस गेले आणि त्रिवेणी संगमात स्नान करून मोठ्या श्रद्धाभावाने त्यांनी श्रीकन्यका
देवीचे दर्शन घेतले. देवी अंबा शंकर भट्टाकडे स्नेहपूर्ण नजरेने पहात जणू म्हणत
होती “शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तीभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरुगड्डी क्षेत्रास
जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या दर्शनाने आपले जीवन कृतार्थ कर. त्यांच्या
दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनिय असतो.” मातेचा
आशीर्वाद घेवून शंकर भट्ट कुरुगड्डीस जाण्यास निघाले आणि कांही तासानंतर “मरुत्वमलाई”
या गावी येऊन पोचले.हे एक अत्यंत रम्य स्थान होते. लंकेत श्रीराम आणि रावण
संग्रामात लक्ष्मणास इंद्रजीताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्रीहनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी
पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत
स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला. त्याचेच नांव
मरुत्वमलाई असे पडले. येथे अनेक गुहा होत्या.त्यात सिद्ध पुरुष गुप्तपणे तपश्चर्या
करीत असत. शंकर भट्टाने समस्त गुहांचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. एका गुहेत
त्यांना एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पहाताच शंकर भट्टाच्या अंगात कापरे भरले
आणि ते घाबरून जोराने ओरडले “श्रीपाद |
श्रीवल्लभ | त्या निर्जन अरण्यात त्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात
ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक
वृद्ध तपस्वी बाहेर आले. ते म्हणाले “बाबारे,तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद
श्रीवल्लभ या नांवाचा प्रतिध्वनी आला. श्रीदत्त प्रभुनी कलीयुगात श्रीपाद
श्रीवल्लभ या नांवाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी लोकाना माहित आहे. तू भाग्यवान
असल्याने या पुण्य स्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद
श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल.” ते तपस्वी पुढे म्हणाले “ गुहेच्या दाराजवळ
बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर.” शंकर भट्टाने
श्रद्धाभावाने त्या वाघास नमस्कार केला. त्यावेळी त्या वाघाने ओंकाराचा उच्चार
केला त्या आवाजाने सारा मरुत्वमलाई पर्वत दुमदुमला. त्यानंतर एक आश्चर्य घडले त्या
व्याघ्राने “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” असे सुस्वरात प्रभुना आळविले. याच वेळी
एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला.
त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग नमस्कार केला आणि क्षणार्धात आकाश मार्गाने
निघून गेला. शंकर भट्टाने अत्यंत नम्रभावाने त्या महात्म्यास साष्टांग दंडवत घातला
आणि म्हटले “हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले
होते की कुरुगड्डी क्षेत्री जाऊन श्रीपाद
श्रीवल्लभ प्रभूंचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यास निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी
महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते? तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण? या विषयी कृपया
विस्तार पूर्वक सांगावे.” त्यावेळी वृद्ध
तपस्वी सांगू लागले.ते म्हणाले “आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनींची
तपोभूमी अशा नांवाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय
ब्राम्हण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्याना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा
लाभ झाला होता. त्याचे नांव व्याघेश्वर असे ठेवले होते. तो मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या
बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. ब्राम्हण
विव्दान आणि आचारसंपन्न होता परंतु पुत्र
मतिमंद असल्याने तो दुःखी असे. यथासमयी या बालकाचा व्रतबंध संस्कार त्या सच्छील
माता-पित्यांनी केला. परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एके
दिवशी ब्रम्हमुहूर्तावर या बालकास एक स्वप्न पडले, त्यांत त्याला एका दिव्य
बालकाचे दर्शन झाले. तो बालक आकाशातून खाली येत होता. त्याचे चरण भूमीस लागताच
भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळू, हळू पाऊले टाकीत व्याघ्रेश्वराकडे
आला आणि म्हणाला “मी असताना तुला कशाचे
भय? तू हिमालयातील बदरीकारण्यात जा. तेथे तुझे सर्व शुभ होईल. एवढे सांगून तो
दिव्य बालक अंतर्धान पावला. त्याच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील
बदरीकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास श्रीदत्त कृपेने वेळेवर अन्नपाणी मिळत गेले. मार्गक्रमण करीत असता
त्यास एक कुत्रा भेटला व तो त्याच्या बरोबर बदरीवनापर्यंत सोबत होता. या प्रवासात
त्याने उर्वशी कुंडात स्नान केले. त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्यांसह उर्वशी
कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्याना साष्टांग नमस्कार केला
आणि त्याचे शिष्यत्व स्वीकारावे अशी अत्यंत नम्र स्वरात प्रार्थना केली. त्या महान
गुरुवर्यांनी व्याघ्रेश्वरास शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की
व्याघ्ररेश्वरासोबत आलेले ते श्वान तत्काळ अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा
म्हणाले “अरे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या
पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन केले आणि अंतर्धान पावले.
श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात
स्नान करू शकलास. ही नर-नारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर शर्मा म्हणाला “ गुरुदेवा,
श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली?” गुरुदेव
म्हणाले “ते साक्षात दत्त प्रभूच आहेत. त्रेतायुगात भारव्दाज महर्षींनी “सावित्री
काठक चयन” नांवाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठीकापुरम येथे संपन्न केला होता. याचे
फळस्वरूपच पिठीकापुरम येथे श्रीपाद प्रभुनी अवतार घेतला.
त्यांची तुझ्यावर कृपा आहे.” गुरुदेव पुढे म्हणाले “मी आता माझ्या गुरुदेवांच्या
दर्शनास जात आहे, पुन्हा एक वर्षाने येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान
प्राप्तीसाठी तपश्चर्या करा. असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे
गेले. व्याघ्रेश्वर गुहेत बसून ध्यान करू लागला. परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र
रुपाकडे असल्याने त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. एक वर्षाचा काळ
लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा पहिल्या आणि प्रत्येक
शिष्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. परंतु या सर्वांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर कोठे
दिसला नाही. एका गुहेत मात्र एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांनी अंतर्ज्ञानाने
ओळखले की तो वाघ अन्य कोणी नसून त्यांचा शिष्य व्याघ्रेश्वरच आहे. त्यांनी त्याला
आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला आणि “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” हा मंत्र
जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेप्रमाणे तो या मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या
रुपातच त्याने कुरुगड्डीस प्रयाण केले. यथा काळी तो कुरुगड्डी ग्रामाजवळ येऊन
पोचला. मध्ये कृष्णा नदी वहात होती. तो अलीकडील तीरावर बसून “श्रीपाद राजम शरणं
प्रपद्ये” या मंत्राचा जप करू लागला. त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसह
वार्तालाप करीत बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे असे
म्हणून नदीच्या पैलतीरावर गेले. तेथे व्याघ्रेश्वराने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य
चरणांवर आपले मस्तक टेकवून अत्यंत भक्तीभावाने नमस्कार केला. श्रीपाद प्रभुनी
अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरुवाळले आणि ते त्याच्यावर स्वार होऊन
पाण्यातून कुरुगड्डीस पोचले. प्रभू वाघावर
बसून आलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या
शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजीन (वाघाचे
कातडे) काढले आणि प्रभूंनी आसन म्हणून त्याचा
स्वीकार करावा अशी विनंती केली. नंतर तो प्रभूंच्या चरणी अत्यंत भक्तीभावाने नतमस्तक झाला. त्यावेळी
व्याघ्रेश्वराचे अष्टभाव जागृत होऊन
त्याच्या नेत्रातील आनंदाश्रूनि प्रभूंच्या
चरणकमलांवर जणू अभिषेकच केला. मोठ्या प्रेमभराने प्रभुनी त्याला उठविले आणि
म्हणाले “अरे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली मल्ल होतास. त्यावेळी तू
वाघांशी युद्ध करून त्यांना अति क्रुरतेने वागवीत होतास. त्याना वेळेवर अन्न,पाणी
देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास. या
दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव-जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु
माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घ काळ व्याघ्र रुपात
राहिल्याने तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात
कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादहि मिळतील. योग मार्गात
तू अत्यंत प्रज्ञावंत होशील.” असा प्रभुनी आशीर्वादहि दिला.
शंकर भट्टाने पाहिलेला वाघ अन्य कोणी नसून व्याघ्रेश्वर शर्माच होता.
तो गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संत, महात्म्याचे रक्षण करीत होता. तसेच त्यांचे
परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा मोठ्या आनंदाने करीत होता. ही सारी श्रीपाद
प्रभूंची लीलाच होती. शंकर भट्ट त्या वृद्ध संन्याशाचा निरोप घेऊन पुढील प्रवासास
निघाले.
|| श्रीपाद राजम शरणं
प्रपद्ये ||
********************************
अध्याय ४७ वा.
सिद्ध
योग्याचे दर्शन.
शंकर भट्ट मरुत्वमलई या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक प्रसंगाचे मनन
करीत, श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतन करीत मार्गक्रमण करीत होते. या प्रवासात अनेक
सिद्ध पुरुष, पुण्यात्मे, महात्मे यांचे दर्शन होत होते आणि त्यांच्या सत्संगाचा
लाभ होत होता. असेच मार्ग क्रमण करीत, करीत ते पांड्य देशातील कदंब वनात येऊन
पोचले. या वनात एक अतिप्राचीन असे शिवमंदिर होते. त्याचे अति श्रद्धाभावाने दर्शन घेऊन ते पुढे
जाण्यास निघाले. कांही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना सिद्ध योगींद्र यांचा आश्रम
लागला. ते एक महान तपस्वी होते. शंकर भट्टानि त्या आश्रमात प्रवेश करून त्या
महात्म्यांना अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला. त्या सिद्धानी शंकर भट्टाच्या
शिरावर हात ठेऊन “श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीरस्तु” असा आशीर्वाद दिला. ते
म्हणाले “ शंकर भट्टा तू दर्शन घेतलेले शिवमंदिर अति प्राचीन आणि जागृत आहे.
त्याची कथा मोठी रंजक आहे. एकदा देवांचा राजा इंद्र याने अनेक राक्षसाना मारून
टाकले. परंतु एक राक्षस पळून जाऊन शिवाची तपस्या करू लागला. इंद्राने तो
ध्यानावस्थेत असताना त्याचा वध केला. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप
पावून तो अगदी निस्तेज, म्लान झाला. आपली पूर्वीची कांती मिळविण्यासाठी आणि हातून
घडलेल्या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थयात्रा केल्या. परंतु कांही
उपयोग झाला नाही. शेवटी तो जेंव्हा पांड्य देशातील कदंब वनात आला तो काय आश्चर्य
तेथील शिवलिंगाच्या प्रभावाने त्यास पूर्वीचे तेज, कांती प्राप्त झाली. अति
आनंदाने इंद्राने ते वन पाहिले. तेंव्हा त्यास एक स्वयंभु शिवलिंग दिसले. त्याने
मोठ्या भक्तीभावाने त्याचे पूजन अर्चन केले आणि त्यावर एक सुंदरसे मंदिर बांधले.
तू पाहिलेले देवालय हे इंद्राने स्थापन केलेले शिवालय आहे. हे समस्त पापांचे हरण
करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांना, दत्तभक्तांना, याचे विनासायास दर्शन घडते.”
योगीन्द्रांचे हे वक्तव्य ऐकून शंकर भट्ट अत्यंत आनंदित तसेच रोमांचित झाले.
योगीन्द्रांनी शंकर भट्टास पुन्हा एकदा त्याच शिवालायाचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले.
त्यांच्या त्या आदेशानुसार शंकर भट्ट पुन्हा एकदा त्या कदंब वनात गेले. परंतु
आश्चर्य असे की तेथे एक अतिसुंदर शिवालय होते. ते मदुरा येथील मिनाक्षि
सुन्दरेश्वराच्या मंदिरा सारखे होते.शंकर भट्टाने पूर्वी पाहिलेले, इंद्राने
निर्मिलेले ते शिवालय नव्हतेच. त्या भव्य मंदिरात प्रवेश करून शंकर भट्टाने पुन्हा
एकदा त्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यांचे मन आश्चर्य, रोमांच आणि थोडी फार
भीतीने भरून गेले होते. दर्शनोत्तर ते योगीन्द्रांच्या आश्रमाकडे येण्यास निघाले.
तो परिसर जनसमुदायाने भरलेला,एखाद्या शहरा
प्रमाणे वाटत होता. ते आश्रमाचा मार्ग चुकले आणि त्यातच रात्रीचा काळोख पसरला. अशा
अवस्थेत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत ते मार्गक्रमण करीत असताना त्यांच्या
मागून तीन मणी मस्तकावर धारण केलेला एक नाग त्यांचे पथ प्रदर्शन करीत होता.शेवटी
ते कसेबसे योगीन्द्रांच्या आश्रमात येऊन पोचले. त्या सिद्धानी शंकर भट्टाचे स्वागत
करून त्याना गरम,गरम चणे प्रसादाच्या स्वरुपात खाण्यास दिले. त्यांच्या त्या
प्रेमळ स्पर्शाने शंकर भट्टाच्या हृदयाची धड,धड शांत झाली. यावेळी ते योगींद्र स्वामी
म्हणाले “अरे शंकर भट्टा, तू प्रथम पाहिलेले शिवालय आणि नंतर दर्शन घेतलेले
श्रीसुन्दरेश्वराचे मंदिर ही दोन भिन्न, भिन्न देवालये नाहीत. तुला अशाप्रकारचा
अनुभव घडवून आणावा अशी श्रीदत्तप्रभूंची अनुज्ञा होती. म्हणून कालास मागे नेऊन,
इंद्राने प्रतिष्ठापित केलेली शिवाची मूर्ती आणि शिवलिंग तसेच आसपासचा परिसर तुला
दाखविला. श्रीदत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानात बदलू शकते, तसेच भूतकाळ
वर्तमान काळात बदलू शकतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, आणि लय होतो
त्या महा संकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्रीदत्त प्रभूच आहेत. तेच सगुण रूपात
श्रीपाद श्रीवल्लभ या नामरुपाने पिठीकापुरम क्षेत्री अवतरित झाले आहेत.” ते सिद्ध
पुढे सांगू लागले “देवेन्द्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवालय धनंजय नांवाच्या
एका व्यापाऱ्याने पहिले. त्याने या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाच्या राजास –कुलशेखर
पांड्य यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
तसेच तेथे एका नगराची स्थापना केली. त्या नगरीस “मधुरा नगर” असे नांव दिले. कुलशेखर
याचा पुत्र “मलयध्वज पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ
केला होता. त्या यज्ञा कुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या प्रकट झाली
होती. तिला पाहून राजा आणि यज्ञ करणारे समस्त विप्रगण अत्यंत आनंदित झाले. ही
कन्या म्हणजेच “मिनाक्षीदेवी”. तिचा विवाह पुढे सुन्दरेश्वरा बरोबर झाला. या
विवाहात भगवान श्रीविष्णूंनी प्रत्यक्ष येऊन कन्यादान केले होते. हा लग्नसोहळा
अत्यंत थाटात साजरा झाला होता. भगवान शिवाच्या जटेतून निघालेली ‘वेगवती नदी’ मधुरा
नगरातून वहाते. तिच्यामुळे संपूर्ण परिसर सुपीक झाला आहे.” एवढे बोलून त्या महान
सिद्धानी आपल्या वाणीस विराम दिला. रात्र बरीच झाली असल्याने शंकर भट्टास त्वरितच
निद्रा लागली. सकाळी जाग आली ती सूर्याच्या उबदार किरणांनी. शंकर भट्टानि डोळे
उघडून पहिले तो आश्चर्याचा धक्काच बसला. ते ज्या आश्रमात झोपले होते तो आश्रम तेथे नव्हता,
योगींद्र स्वामी, त्यांचे शिष्य, कोणीच नव्हते. एका उंच टेकडीवर पिंपळाच्या झाडाखाली
ते निजले होते. त्यांनी आपले सामान आवरून घेतले आणि पुढच्या प्रवासास प्रारंभ
केला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
||
*******************************************************************************************
अध्याय ४८ वा.
विचित्रपुरीचा वृतांत
शंकर भट्ट दुपारपर्यंत चालल्या नंतर एक लहानसे
गांव लागले. ते गीरीजनांचे गांव होते. त्यात एक सुद्धा ब्राम्हणाचे घर नव्हते.
शंकर भट्टाना तर भुकेने व्याकुळ केले होते. त्या गावातील एका वृद्ध गृहस्थाने शंकर
भट्टास थोडा मध आणि फळे आणून दिली. ती फळे खाणार इतक्यात एक कावळा त्यांच्या
डोक्यावर येऊन बसला आणि चोचीने डोक्यास इजा करू लागला. त्यांनी त्याला हाकालण्याचा
प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ झाला. अजून चारपाच कावळे उडून आले आणि ते शंकर
भट्टाच्या हातावर, खांद्यावर बसून इजा करू लाले. त्यावेळी ती फळे आणि मध तेथेच
टाकून शंकर भट्टाने तेथून पळ काढला. कावळ्यांनी केलेल्या जखमांनी त्यांचे शरीर
रक्तबंबाळ झाले होते. कावळे त्यांचा सारखा पाठलाग करीतच होते. त्यांनी मनोमनी
श्रीपाद प्रभूंची या संकटापासून सुटका करण्याची प्रार्थना केली. थोडे अंतरावर एक
औदुंबराचे झाड दिसले. त्या झाडाखाली शंकर भट्ट विश्रांतीसाठी बसले. त्याच वेळी
त्याना जाणवले की त्यांच्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे
जवळपासच्या वारुळातून साप बाहेर आले आणि
त्यांनी शंकर भट्टास दंश करण्यास प्रारंभ केला. सापाच्या विषामुळे ते मृतप्रायच
झाले, त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. ह्रदयाचे ठोके मंद गतीने पडू लागले होते.
त्याच वेळी एक धोबी धुतलेले कपडे आपल्या गाढवावर लादून घरी घेऊन जात होता. त्याने शंकर भट्टाची दयनीय
अवस्था पहिली आणि दयाद्र बुद्धीने त्याना गाढवावर बसवून त्या गावातील वैद्याकडे
नेले. त्याने कांही मुळ्याचा रस काढून जखमेवर लावला. सर्पदंश झालेल्या जागी
पिंपळाची पाने बांधली आणि कोवळ्या पानांचा रस काढून जखमेवर लावला. तसेच कानात
पिंपळाच्या पानांचे देठ ठेवले. विष जसे जसे उतरू लागले तसे तसे शंकर भट्ट असाह्य
वेदनेने ओरडू लागले. विष पूर्णपणे उतरून गेल्यावर त्याना बरे वाटले. ती रात्र
त्यांनी त्या वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्रीदत्त प्रभूंचा भक्त होता.
त्याने आपल्या कुटुंबियांसह रात्रीचे समयी श्रीदत्त प्रभूंचे भजन सुस्वरात गायिले.
भजनाचा कार्यक्रम संपल्यावर तो वैद्य शंकर भट्टास म्हणाला “माझे नांव वल्लभदास
आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या
दर्शनास निघाला आहात. तुम्हाला
कावळ्याकडून त्रास झाला व सर्प दंश का झाला ते सुद्धा मला महित आहे. आपले
नांव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो.” वल्लभदासाचे ते वक्तव्य ऐकून शंकर भट्ट अवाकच
झाले.वल्लभदास पुढे म्हणाले “हे कावळे, ते सर्प पूर्वजन्मीचे पिठापुरम येथील महा
अहंकारी पंडित होते. त्यांनी श्रीपाद प्रभूंचे सत्य स्वरूप न जाणता अहंकाराने
त्यांचा विरोधच केला होता. त्यांनी तुझे रक्त चाखल्याने त्यांना उत्तम गती
मिळाली.” वल्लभदास पुढे म्हणाले शंकर भट्टा, तू लहान असताना विष्णूमूर्तीचे ध्यान
श्लोकाचे पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या
मित्राना सांगत होतास. तो श्लोक असा होता “शुक्लांबरधरं विष्णू चतुर्भुजम| प्रसन्न
वदनं ध्यायेत सर्व विघ्नो$पशांतये||” याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्रीदत्त प्रभुना
आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले. तुझी अशी
दुर्गती करण्यामागे श्रीपाद प्रभूंचा विनोदा बरोबर तुला कांही पाठ शिकवून
तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन प्रभूंची प्रत्येक क्षणी
आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे.”
हा हितोपदेश ऐकून शंकर भट्ट कृत कृत्य झाले. त्यांच्यातील ब्राम्हण
असल्याचा अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्यांनी वल्लभदासांच्या घरचा पाहुणचार दोन-चार दिवस घेऊन
तेथून चीदम्बर क्षेत्री जाण्यास प्रयाण केले. मार्गात त्यांना विचीत्रपूर नांवाचे
एक गांव लागले. नांवाप्रमाणेच तेथील राजा विचित्र वर्तन करणारा होता. त्याचा मुलगा मुका होता.
त्या राजास वाटत होते की ब्राम्हणांनी लोपभूइष्ट नांवाचा यज्ञ केल्यामुळे त्याचा
मुलगा मुका झाला. या कारणाने तो ब्राम्हणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून
त्याची मिरवणूक काढीत असे. शंकर भट्ट मार्गक्रमण करीत असताना राजाच्या शिपायांनी
त्यांना “तुम्ही ब्राम्हण आहात काय?” असा प्रश्न विचारला. शंकर भट्टाने
होकारार्थी मान हलविली. त्यावेळी तो सैनिक
म्हणाला आमच्या महाराजांनी तुम्हाला बोलाविले आहे. आग्रहाचे आमंत्रण आहे. आपण
आमच्या बरोबर चलावे. शंकर भट्ट घोड्यावर बसून थोड्याच वेळात राजदरबारात राजासमोर
उभा राहिले. त्यांनी मनोमन श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून अंतरंगात नामस्मरण सुरु
केले. राजाने शंकर भट्टास प्रश्न विचारला “तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती?” शंकर
भट्टाने निश्चयात्मक रीतीने उत्तर दिले
“एवढ्याला एवढेच” या उत्तराने राजाला आनंद झाला आणि तो म्हणाला “महात्मन आपण मोठे
पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो.” दुसरा प्रश्न मूक भाषे संबंधी होता.
राजगुरुनी शंकर भट्टास दोन बोटे दाखविली आणि खुणेनेच एक का दोन असे विचारले. शंकर
भट्टास वाटले की ते एकटेच आले आहेत का सोबत कोणी आहे असा प्रश्नाचा भाव आहे.
त्यांनी एक बोट दाखवून आपण एकटेच आलो आहोत असे कळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर
राजगुरुनी तीन बोटे दाखविली. तीन संख्या पाहताच शंकर भट्टास श्रीदत्त प्रभूंची
त्रिमूर्ती आठवली. त्यांना वाटले राजगुरु “तुम्ही भक्त आहात काय?” असे विचारीत
आहेत त्यांनी आपली मुठ बंद करून सांगण्याचा प्रयत्न केला की भक्ती ही गुप्त असावी.
यानंतर राजगुरुनी मिठाईचे भांडारच देत असल्याचा अविर्भाव केला. शंकर भट्टाने ते
नाकारले आणि स्वतःजवळ असलेले पुरुचुंडीतील पोहे काढून दाखविले. त्याचा भाव असा
होता की त्यांना मिठाईपेक्षा पोहेच अधिक प्रिय आहेत. शंकर भट्टाच्या समर्पक
उत्तरांनी राजगुरू प्रसन्न झाले. ते राजास म्हणाले :महाराज हा मुक्यांच्या भाषेचा
सुद्धा फार मोठा पंडित आहे. अशा प्रकारे
शंकर भट्ट दोन परिक्षेत सफल झाले होते. आता तिसरी परिक्षा शंकर भट्टास भेडसावीत
होती. त्यांनी श्रीपाद प्रभूंची अति श्रद्धेने, मनोमन प्रार्थना केली. राजगुरुनी
सांगितले रुद्राभिषेकातील चमक मधील श्लोक
वाचून त्याचा अर्थ सांगा. शंकर भट्टाने श्रीपाद प्रभूंचे ध्यान करून एक एक श्लोक
वाचला आणि त्याचा अर्थ संगीताला. तो असा होता. ‘एकाचमे’ म्हणजे एक ‘तीस्त्रश्च्मे’
म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात आणि त्याचे वर्गमूळ दोन येते. ‘पंचचमे’ म्हणजे चारात पाच मिसळले असता नउ होतात आणि
त्याचे वर्गमूळ तीन येते. “सप्तचमे” वर आलेल्या नउ संख्येत सात मिसळल्यास सोळा
येतात व त्याचे वर्गमूळ चार येते. “नवचमे” म्हणजे वरील सोळा संख्येत नउ मिसळले
असता पंचवीस येतात आणि त्याचे वर्गमूळ पाच येते. अशा प्रकारे शंकर भट्टाने चमकातील
प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. त्याने हे जे सांगितले ते
सर्व सृष्टीच्या परमाणुचे रहस्य होते. ते कणाद ऋषीना माहित होते. परमाणूंच्या
सूक्ष्म कणांच्या भेदामुळे विविध धातूंची निर्मिती होते. शंकर भट्टाचे हे
विव्दत्तापूर्ण वक्तव्य सर्वांनाच आवडले. राजाच्या सर्व प्रश्नाना समर्पक उत्तरे
दिल्यामुळे आणि श्रीपाद प्रभूच्या कृपेने शंकर भट्ट सुरक्षितपणे राजदरबारातून आणि विचीत्रपूर नगरीतून बाहेर पडले.
|| श्रीपाद
राजम शरणं प्रपद्ये.||
अध्याय ४९ वा.
पळणी स्वामींचे दर्शन
शंकर भट्ट विचित्रपुरहून निघून अग्रहारपूर या गावी आले.. तेथील एका
ब्राम्हणाच्या घरासमोर उभे राहून “ओम भिक्षांदेही” असे म्हणून भिक्षा मागितली. त्यावेळी त्या घरातून
एक अति क्रोधायमान झालेली महिला बाहेर आली आणि म्हणाली “भात नाही लात नाही.” शंकर
भट्ट त्या घरासमोर आश्चर्याने थोडा वेळ पहात तसेच उभे राहिले. तितक्यात त्या
घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले “माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर
मातीचे भांडे फोडले आणि त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून मला घरातून
बाहेर घालवून दिले. मी आपणा बरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागू या.” ते दोघे एका
विशाल पिंपळाच्या झाडाखाली पारावर बसले आणि श्रीपाद प्रभूंचे भजन करू लागले.
थोड्याच वेळात तेथे विचीत्रपूरच्या राजाचे दूत आले आणि म्हणू लागले “महाराज आमच्या
युवराजाना बोलता येऊ लागले आहे. राजे महाराजांनी तुम्हाला घेऊन या अशी आम्हास
आज्ञा केली आहे. तरी आपण आम्हा बरोबर राजदरबारी चलावे.” शंकर भट्ट म्हणाले मी एकटा
येणार नाही. माझ्या मित्रासही घेऊन जाणार असल्यास मी येईन.” राजाच्या दूतांनी त्या
दोघाना घोड्यावर बसवून राजवाड्यात नेले. राजाने त्या उभयतांचे उत्तम स्वागत केले
आणि म्हणाला. “पंडितजी तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी मूर्च्छित झाला.
परंतु राजवैद्याना बोलवण्या पूर्वीच तो
शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ अशा
मंत्राचा उच्चार करण्यास सुरवात केली. थोड्या वेळाने त्याने सांगितले की तो अचेतन
अवस्थेत असताना एक अति दैदिप्यमान युवा स्थितीतील
यती आले होते. त्यांनी युवराजच्या जिभेवर विभूती लावली आणि त्याच क्षणी त्याला
वाचा प्राप्त झाली. महाराजाने शंकर भट्टास विचारले “ते यती कोण होते? श्रीदत्त
प्रभूंशी त्यांचे काय नाते होते?” शंकर
भट्ट म्हणाले “महाराज युवराजाना दिसलेले ते यती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यानीच
युवराजाना वाचा प्रदान केली. ते श्रीदत्त प्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत.
त्यांच्या दर्शनासाठी मी कुरुगड्डी क्षेत्रास जात आहे.” त्यावेळी दरबारातील सर्व
लोकांनी एकमुखाने श्रीपाद प्रभूंचा जयजयकार केला. महाराजाने अति प्रसन्न होऊन शंकर भट्ट आणि त्याच्याबरोबर
आलेल्या ब्राम्हणास सुवर्ण मुद्रा दिल्या. आनंदाने शंकर भट्ट आणि त्याच्या बरोबर
आलेल्या गृहस्थाने राजाचा निरोप घेतला व ते आपल्या गांवी जाण्यास निघाले. येथील नंबुद्री नावाचा एक
ब्राम्हण श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यास शंकर भट्टाबरोबर निघाला. ते तिघे
अग्रहारपूरास येऊन पोचले. त्या गृहस्थाने आणलेल्या सुवर्ण मुद्रा पाहून त्याची
पत्नी अत्यंत आनंदित झाली. तिने या तिघांना उत्तम जेवण दिले. ती कालांतराने
श्रीपाद प्रभूंची भक्त झाली. शंकर
भट्ट आणि नंबुद्री चिदंबरमकडे जाण्यास निघाले. तेथे पोचल्यावर त्यांनी पळणीस्वामी
नांवाच्या एका सिद्ध महात्म्याचे दर्शन घेतले. स्वामिनी आपल्या वक्तव्यात कणाद
ऋषींच्या “कण सिद्धांताबद्दल विवेचन केले. तसेच कुंडलिनी शक्ती बद्दल माहिती
सांगितली. ते पुढे म्हणाले “श्रीपाद प्रभू
पिठीकापुरम या स्थानी मानव रुपात अवतरित होण्यापूर्वी १०८ वर्षे या प्रदेशात आले
होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. त्यावेळी एक आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील कांही महायोगी बद्रिकेदार
क्षेत्रात बदरीनारायणाची ब्रम्हकमळ वाहून पूजा करीत होते. ती बदरीनारायणाचे चरणी
वाहिलेली कमलपुष्पे श्रीपाद प्रभूंच्या चरणांवर
येऊन पडत होती. शंकर भट्टाच्या विनंतीनुसार पळणी स्वामिनी ब्रम्हकमळा बद्दल
सविस्तर माहिती सांगितली. नंतर ते म्हणाले “अरे शंकर भट्टा मी दहा दिवस समाधीमध्ये
असणार आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू
देता, दुरूनच त्यांना शांतपणे दर्शन घडव.. सर्प दंशाने कोणी मृत झालेले आल्यास
त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना मी समाधीत आहे असे सांगून मृत देहास नदीच्या
पाण्यात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा असल्याचे त्याना सांग.” एवढे सांगून पळणी स्वामी समाधिस्त झाले.
शंकर भट्ट आणि नंबुद्री दर्शनास येणाऱ्या भाविकांना शांतपणे दर्शन घडवून आणीत
होते. दर्शनास आलेल्या कांही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य आणून दिले
होते. ते पाहून नम्बुद्रीने स्वयंपाक करण्याचे ठरविले. सरपणा साठी उपयोगी पडेल असे
एक नारळाच्या झाडाचे वाळलेले पान अंगणात पडलेले त्याला दिसले. माधवने ते उचलुन
आपल्या खांद्यावर ठेवले. तितक्यात त्या
पानाखाली विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला. त्या सर्पाचे
विष एवढे दाहक होते की माधव नंबुद्री तत्काळ काळा-निळा होऊन मृत झाला आणि जमिनीवर
पडला. दोघांनी उचलून त्यास गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून शंकर भट्ट अतिशय घाबरून
गेले. त्यांनी स्वामींच्या आदेशानुसार एक मोठा खळगा खणविला आणि त्यात माधवाचा मृत
देह ठेवला. याच वेळी गावातील कांही लोकांनी सर्पदंश झालेल्या एका युवकास आणले. ही
दुसरी दुर्घटना पाहून शंकर भट्टास रडूच कोसळले. गावातील लोकांनी त्या गुहेजवळच एक
खळगा खणून त्यात त्या मृत युवकास निजविले. अकराव्या दिवशी ब्रम्हमुहूर्तावरच
पळणीस्वामी समाधीतून बाहेर आले आणि माधवा,
माधवा अशा हाका मारू लागले. शंकर भट्टाने अश्रूपूर्ण नेत्रांनी घडलेली घटना
स्वामीना सांगितली. त्यांनी शंकर भट्टाची
समजूत घातली. स्वामी म्हणाले “अरे शंकर भट्टा, माधवला स्थूल देहात श्रीपाद
प्रभूंचे दर्शन होणार नव्हते, त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा
दिवसांपासून कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंच्या सानिध्यात होते. त्याला पुन्हा एकदा स्थूल
शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे.”
स्वामींच्या आदेशानुसार माधवला बाहेर आणले. स्वामी ताडाच्या झाडा जवळ जाऊन
मोठ्याने म्हणाले “माधवास दंश करणाऱ्या नागराजा, श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार
पळणी स्वामींच्या जवळ ये.” स्वामिनी आपल्या पिशवीतून चार कवड्या काढल्या आणि मृत देहाच्या
चारी बाजूस ठेवल्या. कांही क्षणातच त्या कवड्या आकाशात उडाल्या आणि चारी दिशाना
गेल्या. पाच –दहा मिनिटातच उत्तरेकडून एक सर्प फूस,फूस करीत आला आणि स्वामींच्या आदेशानुसार त्याने माधवच्या शरीरातील विष शोषून
घेतले. नंतर स्वामीना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला. पळणी स्वामिनी श्रीपाद
प्रभूंना मनोमनी नमस्कार केला. थोड्याच वेळात माधवच्या शरीरात चैतन्य येऊ लागले
आणि तो शुद्धीवर आला. हे पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला. माधवाने आपले अनुभव
सांगण्यास प्रारंभ केका. तो म्हणाला “मी सूक्ष्म शरीराने कुरुगड्डीस पोचलो आणि
श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. नंतर प्रभूंच्या आदेशानुसार कुरुगड्डीच्या मध्यभागी
गेलो, तेथून भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद असल्या सारखे भासले. ते
पाताल लोकच होते. तेथे असलेले लोक नाग जातीचे होते. त्याना हवे ते रूप घेता येत
होते. तेथे मी अनेक सर्प पहिले. त्यातील कांहीना हजार फणे होते.कांहींच्या शिरावर दिव्य मणी होते.
एका सहस्त्र फण्याच्या नागावर श्रीपाद प्रभू भगवान विष्णु प्रमाणे शयन करीत होते.
त्यातील एका महासर्पाने श्रीदत्तप्रभूच्या जन्मा बद्दल आणि कार्याबद्दल विवरण करून
सांगितले. यानंतर मी पाण्यातून वर येऊन कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंचे अत्यंत
श्रद्धा भावाने दर्शन घेतले.” माधव पुढे सांगू
लागाला “स्वामी, यानंतर श्रीपाद प्रभू मला म्हणाले “वत्सा| हे दिव्य भव्य
दर्शन म्हणजेच मोठा अलभ्य योगच आहे. तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या
शताब्दीमध्ये ‘ज्योती रामलिंगेश्वर स्वामी’ या रुपाने अवतार घेतील. तुझ्याशी
बोललेला दुसरा महासर्प ‘सदाशिव ब्रम्हेंद्र’ या नावाने अवतार घेऊन अनेक दिव्य लीला
दाखवील. पिठीकापुरम येथील मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या ग्रहातच माझ्या पादुकांची
प्रतिष्ठापना होईल” माधव म्हणाला एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. असे माधवचे
वक्तव्य एकूण सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर पळणी स्वामिनी त्या दुसऱ्या मृत युवकाचा
देह खळग्यातून बाहेर आणावयाचा आदेश दिला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
*******************************************************************
अध्याय ५० वा.
कुरुगड्डीत वासंबिकेचे दर्शन
पळणी स्वामी ध्यानस्थ बसण्यापूर्वी म्हणाले “शंकर भट्टा, आज हूण
शकानुसार तारीख २५-५-१३३६ आहे. आजचा दिवस आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी माझ्या
स्थूल शरीरास येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुगड्डीस जाईन. एकाच वेळी
चार,पाच ठिकाणी सूक्ष्म शरीराने विहार
करणे मला बाल्य क्रीडा वाटते. आपण सगळेच ध्यानात बसल्यानंतर श्रीपाद प्रभूंची
आज्ञा होताच मी सूक्ष्म रुपाने कुरुगड्डीस त्यांच्या सानिध्यात जाईन. तेथे एखादी
महत्वाची घटना डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळेल. थोड्याच वेळात सर्वजण ध्यानस्थ
झाले. दहा तासांचा वेळ ध्यानावस्थेत कसा गेला ते कळलेच नाही. ध्यानातून बाहेर आल्यानंतर पळणी स्वामिनी
शिवशर्मा नांवाच्या एका विव्दान, सच्छील ब्राम्हणाची गाथा सांगितली. शिवशर्मा आपल्या
पत्नीसह- अम्बिकेसह कुरुगड्डीस रहात होते. दैवगती अशी की त्यांना संतान होत असे
परंतु ती जगत नसे. यातील एक मुलगा वाचला परंतु तो मंद बुद्धी निघाला. त्यामुळे
शिवशर्मा अत्यंत दुःखी होते. ते एकदा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले आणि
त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आर्त
भावाने प्रार्थना केली की त्यांचा पुत्र बुद्धिवान,विव्दान व्हावा.
श्रीपाद प्रभू म्हणाले “ शिवशर्मा, तुझ्या पुत्राचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून
त्याला योग्य पंडित करावयाचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करावयास
हवा. त्यासाठी तू सिद्ध असल्यास मी त्याला योग्य पंडित करीन.” शिवशर्मा
देहत्यागासाठी तयार झाले. आपला पुत्र बृहस्पती सारखा विव्दान व्हावा हीच त्यांची
इच्छा होती. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “लवकरच तुझा मृत्यू होईल. मरणानंतर तू
सूक्ष्म देहाने धीशला (सध्याचे शिर्डी गांव) नगरात निंब वृक्षाच्या पायथ्याशी
असलेल्या भूगर्भात थोडा काळ तपश्चर्या करशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र
देशात जन्म घेशील.” थोड्याच अवधीत शिवशर्मा यांचे निधन झाले. अंबिका तिच्या मुलासह
भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागली. एवढ्या विव्दानाचा पुत्र मंदबुद्धी निघाल्याने
गावातील लोकांनी त्यांना नांवे ठेवून त्यांचे जीवन असह्य करून टाकले होते. एके
दिवशी अपमानजनक जीवनास कंटाळून त्या माता-पुत्रांनी कृष्णा नदीस प्राण समर्पण
करण्याचे ठरवून ते खोल पाणी असलेल्या ठिकाणी नदीत उतरले. परंतु त्यांच्या पूर्व
पुण्याईने त्यांना तेथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. त्यांनी त्या माता-पुत्रास
समजावून सांगून आत्महत्येपासून परावृत्त केले आणि आपल्या करुणाकटाक्षाने त्या
मतिमंद पुत्रास महान पंडित केले. अम्बिकेने पुढील जन्मी श्रीपाद प्रभूसमान तेजस्वी
पुत्र व्हावा असा वर मागितला. श्रीपाद प्रभुनी “तथास्तु” असे म्हटले आणि त्या सच्छील मातेस शनी प्रदोषव्रत करण्यास सांगितले. त्यांच्या समान अन्य कोणीही पुरुष नसल्याने श्रीपाद
प्रभूंनी पुढील जन्मात अंबिकेच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला.
समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासम्बिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले
“तुझा संकल्प सिद्ध होईल. मी अजून १४ वर्षे म्हणजे या देहाला ३० वर्षे होईपर्यंत
श्रीपाद श्रीवल्लभ या रुपात राहून नंतर गुप्त होईन. त्यानंतर संन्यास धर्माच्या
उद्धारासाठी नृसिंह सरस्वती या रुपाने अवतार घेईन. या अवतारात ८० वर्षे राहीन. या
अवताराच्या समाप्तीनंतर कदली वनात तीनशे वर्षे तपोनिष्ठ राहून नंतर प्रज्ञापुरी
(सध्याचे अक्कलकोट गांव) स्वामी समर्थ या नामरुपाने अवतार धारण करीन आणि अवधूत
अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रुपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन”
एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. पळणी स्वामी शंकर भट्टास पुढे सांगू लागले
“अरे शंकरा, पिठीकापुरम हे श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या
पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तप करीत बसलेले ऋषी आहेत. या
जन्मस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, आणि श्रीदत्तात्रेयांच्या
मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातील” या वक्तव्या नंतर पळणी स्वामी थोडा वेळ मौन
राहिले. त्यांनी गुहेजवळ पुरून ठेवलेला
नवयुवकाचा देह बाहेर काढून आणण्यास सांगितला होता तो आणल्यावर प्रणवाचा उच्चार
करण्यास प्रारंभ केला. सर्वजण “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” असा जयघोष करीत
असतानाच पळणी स्वामिनी त्या नवयुवकाच्या देहात प्रवेश केला. वयोमानाने शिथिल झालेला
वृद्ध देह जवळच असलेल्या नदीस समर्पण
करण्यात आला. नवीन देहात प्रवेश केलेल्या पळणी स्वामिनी माधवास विचीत्रपुरीस आणि
शंकर भट्टास तिरुपती महाक्षेत्री जाण्याची
आज्ञा केली. त्या आदेशानुसार शंकर भट्ट तीरुपतीस जाण्यास निघाले.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
************************************************************************
अध्याय ५१ वा.
शंकर भट्टाचे तिरुपती क्षेत्री आगमन.
यथासमयी शंकर भट्ट परम पावन अशा तिरुपती क्षेत्री येऊन पोचले. येथे
त्यांना कधीही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुमला क्षेत्रातिल पुष्करणीचे
स्नान करुन श्रीवेंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले. मंदिराच्या प्रांगणात ते ध्यानस्थ
बसले असताना श्री वेंकटेश्वरांना त्यांनी स्त्री रुपात पहिले.
बालत्रीपूरसुंदरीच्या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्याच वेळात परमेश्वराच्या रूपात
बदलली. नंतर कांही क्षणातच महाविष्णूच्या रुपात दिसू लागली. ध्यानात असताना कांही
वेळाने ती मूर्ती चौदा वर्षे वय असलेल्या
अतिसुंदर काया असलेल्या बाल यतिच्या रूपात प्रकट झाली. त्या यतीची दृष्टी अमृतमय
असून त्याच्या नेत्रातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती.
त्याच वेळी त्या यती जवळ एक काळ्या रंगाचा कुरूप माणूस आला, तो त्या यतीस म्हणाला
“प्रभू आजपासून आपला भक्त शंकर भट्ट यास साडेसाती आरंभ होत आहे.या विश्वात अनेक
प्रकारची दुःखे, कष्ट आहेत. ते मी त्याच्या अनुभवास आणीन. मी आपल्या आज्ञेसाठी उभा
आहे.” यती रूपातील श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले “अरे शनैश्वरा तू तुझ्या धर्माला
अनुसरून कर्म कर. आश्रित जनाना सहाय् करणे ही माझी प्रतीज्ञा आहे. म्हणून
शंकरभट्टास त्याच्या संकट काली कशी मदत करतो ते बघ.” हे संभाषण ऐकल्यावर शंकर
भट्टाच्या ध्यान अवस्थेतून श्रीपाद प्रभू आणि शनैश्वर निघून गेले. परंतु कष्ट
काळाची सुरुवात होणार याची त्याना कल्पना
आली. श्रीपाद प्रभू आपली या कष्टातून सुटका करतील असा धृढ विश्वास शंकर भट्टास
होता. ते तीरुमलाहून खाली तिरुपती नगरात आले. येथील एका रस्त्यावरून जात असताना एक
न्हावी त्यांना बळजबरीने थांबवून म्हणाला “तू वीस वर्षांपूर्वी घरातून निघून
गेलेला सुब्बय्या आहेस ना? तुझे आई वडील काळजी करीत आहेत तुझी भार्या आता मोठी
झाली आहे. तू तिच्या बरोबर संसार करुन सुखी हो. तेंव्हा शंकर भट्ट म्हणाले “मी शंकर भट्ट नांवाचा कर्नाटकी ब्राम्हण आहे.
मी श्रीदत्त भक्त असून कुरुगड्डीस दत्तावतार
श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी जात आहे. मी माझ्या परम पावन गायत्रीची शपथ
घेऊन सांगतो की मी ब्रम्हचारी आहे. तुम्ही म्हणता तो सुब्बय्या न्हावी नाही.” परंतु
शंकर भट्टाचे ते म्हणणे ऐकणारे तेथे कोणीच नव्हते. तेथे जमलेल्या लोकांनी बळजबरीने
शंकर भट्टास सुब्बय्या नांवाच्या
गृहस्थाच्या घरी नेले. शंकर भट्टाने अनेक वेळा सांगितले की तो सुब्बय्या नाही, तो एक कन्नड देशातील ब्राम्हण आहे. परंतु
ते मानण्यास कोणी तयारच नव्हते. बळजबरीने त्यांचे क्षौर करण्यात आले. दाढी, मिशा
काढून टाकून जानवे सुद्धा त्या लोकांनी तोडून फेकून दिले. त्या लोकांनी त्यांच्या
परिचयाच्या एका भूत वैद्यास बोलाविले. त्या वैद्याने शंकर भट्टास बांधून त्याच्या
मस्तकावर चाकूने वार करुन त्यावर लिंबाचा
रस लावला. असह्य वेदना होत असताना सुद्धा शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण
करीतच होते. तिरुपतीच्या श्रेष्ठ ब्राम्हणांनी सुद्धा शंकर भट्टाच्या सांगण्याकडे
लक्ष न देता “ते सुब्बय्याच असून त्यांना एका ब्राम्हण भुताने पछाडले आहे आणि
त्याच्यावर योग्य उपचार करुन त्याना पूर्वी सारखे करावे” असे मत
व्यक्त केले. शंकर भट्टावर इलाज करणारा मांत्रिक त्यांना चाबुकाने मारीत
होता. परंतु आश्चर्य असे की चाबुकाचा मार
त्याला स्वतःलाच लागू लागला, त्यावेळी त्याने मारणे बंद केले. अशा प्रकारे सहा
दिवस गेले. एके दिवशी त्यांच्या घरी भविष्य सांगणारा माला जंगम आला. त्याच्याकडे
ताडपत्री ग्रंथ होते. त्याने शंकर भट्टास कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास
सांगितले. त्यानंतर त्याने कांही हिशोब करुन आपल्या ताडपत्रातील ग्रंथातून एक पत्र
काढून वाचण्यास प्रारंभ केला. “ प्रश्न केलेली व्यक्ती शंकर भट्ट नांवाचा कन्नड
ब्राम्हण आहे. श्रीदत्तअवतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करील.
हे रमल शास्त्र वाचल्याच्या दुसरे दिवशीच सुब्बय्या घरी येईल.” त्या भविष्य कथाना
प्रमाणेच दुसरे दिवशी खरा सुब्बय्या आपल्या घरी आला. त्याच्या माता-पित्यास आणि
पत्नीस खूप आनंद झाला. श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने शंकर भट्टाची साडेसाती
सात दिवसातच संपली. त्यांनी सुब्बय्याच्या वृद्ध माता-पित्याचा निरोप घेऊन पुढच्या
प्रवासास आरंभ केला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
***************************************************************************
अध्याय ५२ वा.
कणीपाकात तिरुमलदासांची भेट
शंकर भट्ट तिरुपतीहून निघून थोड्या दिवसांच्या प्रवासानंतर चित्तूर
जवळील “ कणीपाक” या गांवी येऊन पोचले. या ग्रामात वरदराज स्वामींचे मंदिर,
मणीकंठेश्वर स्वामींचे मंदिर, तसेच वरसिद्धी विनायकाचे मंदिर, आहे. या
तिन्ही देवालयाचे दर्शन करुन शंकर भट्ट तिरुमल दास नावाच्या एका सत्तर वर्षे
वयाच्या रजक गृहस्थास भेटले. त्यांनी शंकर
भट्टाचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत करुन आपल्या घरातील पलंगावर बसविले. शंकर भट्टास
त्यांनी सिद्धी विनायकाचा प्रसाद दिला आणि म्हणाले “शंकर भट्टा, तू आजच्या दिवशी
श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृताचा श्रीगणेशा
कर. तुला श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद कुरुगड्डीस लाभेल.” तिरुमलदासांनी स्वतःच्या
जीवनाबद्दल सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले “ अरे शंकर
भट्टा, माझा जन्म पल्यनाडू प्रांतातील मल्यादिपूर गावात झाला. याच गावात श्रीपाद
प्रभूंचे आजोबा बापन्नाचार्युलू हरीतस गोत्राचे एक महा पंडित होते. तसेच
श्रीधरावधानी या नांवाचे अजून एक महा पंडित कौशिक गोत्राचे होते. श्रीधरावधानी
यांची भगिनी राजमंबा हिचा विवाह बापन्नाचार्युलू बरोबर झाला होता. गोदावरी
मंडळातील “आईनविल्ली” या गावी एकदा गणपती महायज्ञ झाला होता. त्या
महायागास हे दोघे महापंडित गेले होते. शास्त्रा प्रमाणे यज्ञातील शेवटच्या आहुतीचा
गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करतो आणि आपले स्वर्णकांती युक्त स्वरूपाचे दर्शन
देतो असे पंडितांचे मत होते . त्या दिवशी
घडलेही तसेच. यज्ञाची शेवटची आहुती, आपल्या स्वर्णकांतीने संपन्न अशा गणपतीने, प्रकट होऊन सोंडेत स्वीकारली आणि सर्व भाविकांना
दर्शन दिले. भगवान गणपती म्हणाले “मी गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने
श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन. यज्ञास आलेले सर्वच लोक आश्चर्य चकितच झाले.
परंतु त्या लोकांमध्ये तीघे नास्तिक होते ते म्हणाले “दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे
का महेंद्र जाल आहे परंतु गणपती मात्र नाही. तसे असेल तर पुन्हा एकदा त्याने आपले
दर्शन घडवून आणावे.” त्या नास्तिक व्यक्तींचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील
विभूतीने मानवाचा आकार घेतला, त्यानंतर ती महागणपती स्वरुपात रुपांतरीत झाली. ते
दिव्य स्वरूप बोलू लागले, ते म्हणाले “अरे मुर्खानो, मी तुम्हाला शाप देत आहे.
माझे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक
आंधळा जन्मेल. सत्य स्वरुपाची प्रशंसा न करीता टिंगल केल्यामुळे एक मुका आणि एक
बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधू रुपाने जन्म घ्याल. माझ्या स्वयंभु मूर्तीचे दर्शन
घेतल्यावरच दोषरहित व्हाल.” एवढे बोलून ती दिव्य मूर्ती अंतर्धान पावली.
कालांतराने ते तिघे नास्तिक पुरुष मृत्यू नंतर कणीपूर ग्रामात तीन बंधूंच्या रुपात
जन्मले. त्याच्या पैकी मोठा आंधळा, दुसरा बहिरा आणि तिसरा धाकटा मुका होता. ते एक
एकर जमिनीत शेती करुन आपला उदर निर्वाह करीत होते. एके वर्षी त्या गावात दुष्काळ
पडला सर्व विहिरी आटून गेल्या होत्या. त्यांच्या विहिरीतील पाणी संपल्या मुळे त्या तिघा भावानी विहिरीत
उतरून जमीन उकरण्यास प्रारंभ केला. त्यावेळी त्यांची कुदळ एका दगडावर लागली आणि
आश्चर्य असे की त्यातून रक्ताची धार वर उडाली. ते रक्त मुक्याच्या हातास लागताच
त्याला वाचा प्राप्त झाली. पाणी सुद्धा विहिरीत भरू लागल्र. पाण्याच्या स्पर्शाने
बहिऱ्या भावास उत्तम ऐकू येऊ लागले आंधळ्याने त्या दगडास स्पर्श करताच त्यला
दृष्टी प्राप्त झाली. ज्या स्वयंभु विनायकाच्या मूर्तीला कुदळ लागून रक्त आले होते
ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाच्या प्रतिष्ठापनेसाठी श्रीपाद
प्रभूंचे आजोबा श्री बापन्नाचार्युलू आणि त्यांचे मेहुणे श्रीधरावधानी त्या ग्रामी
आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले होते “आईनविल्ली” येथे तुम्ही केलेल्या
महायज्ञातील भस्माचेच हे रूप आहे. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा
तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यास शक्तिपात कराल त्या दिवशीच गोकर्ण क्षेत्री, काशीमध्ये, बदरी आणि
केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल”. ते पुढे
म्हणाले “श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे.” एवढे बोलून वरसिद्धी विनायक अंतर्धान पावले. हा
वृतांत सांगून तिरुमलदास यांनी आपल्या वाणीस विराम दिला.
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.||
*****************************************************************************
अध्याय ५३ वा.
श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृत ग्रंथाचे पिठीकापुरम क्षेत्री पोचण्याचे विधान – ग्रंथाचे वैशिष्टय
श्रीशंकर भट्ट यांनी लिहिलेला “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” हा
ग्रंथ कांही दिवस श्रीपाद प्रभूंच्या
मामांचे घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात
आला. तेलगु भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो
श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोग
व्दारा पठण होत असते. शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य
पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभुना वाचून दाखविला.ऐकण्यास आलेले पाच भक्त ते
श्रवण करुन धन्य झाले. श्री
बापन्नाचार्युलू यांच्या तेहेतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलगु
भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी
श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण
करुन हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा.या ग्रंथाचे पारायण चालू
असताना, पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तीना गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला
प्रसाद मिळेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे.
|| श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो ||
|| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. ||
|| हरी ओम तत्सत ||
दिनांक २७ अगस्त २०१२.
No comments:
Post a Comment